या सुंदर देशाला समुद्र गिळत सुटला आहे, काय नाव आहे या देशाचे ?

जगातील एक सुंदर देशाकडे आता खूपच वेळ कमी आहे. येत्या काही वर्षांत हा छोटासा देश समुद्रात बुडणार असल्याची चिंता संशोधकांनी व्यक्त केली आहे. हा देश कुठे आहे आणि त्याचे नाव काय आहे ?

या सुंदर देशाला समुद्र गिळत सुटला आहे, काय नाव आहे या देशाचे ?
small country disappearing in
Follow us
| Updated on: Nov 09, 2024 | 8:24 PM

प्रशांत महासागराच्या हवाई आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान एक सुंदरसा देश आहे. या देश बेटापासून बनला असून त्याला पोलिनेशियाई द्वीपीय देश म्हणतात. येथे राहाणाऱ्या लोकांकडे जास्त वेळ नाही कारण हा देश बुडत चालला आहे. हा देश 9 छोट्या – छोट्या द्वीप समुहांपासून तयार झालेला आहे. या देशाचे मुख्य द्वीपाचा आकार एका चिंचोळ्या पट्टी सारखा आहे.ज्यावर लोकसंख्या वसलेली आहे. या देशाचे नाव तुवालु असे आहे. हा जगातील तिसरा कमी लोकसंख्या असलेला देश आहे. या पेक्षा कमी लोकसंख्येच्या देशात केवळ व्हेटीकस सिटी आणि नारु देशांचा समावेश आहे.

जगातला चौथा सर्वात लहान देश

या बेट असलेल्या देशाचे क्षेत्रफळ केवळ 26 चौरस किमी इतके आहे.त्यामुळे क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातला हा चौथा सर्वात लहान देश आहे. केवळ व्हेटीकन सिटी (0.44 चौरस किमी), मोनाको (1.95 चौरस किमी) आणि नारु (21 चौरस किमी) याहून छोटे देश आहेत.

कोणे एकेकाळी ब्रिटीशांच्या ताब्यात होता

हा छोटा देश 19 व्या शतकापर्यंत युनायटेड किंगडमच्या म्हणजे ब्रिटीशांचा अमलाखाली होता. साल 1892 पासून साल 1916 पर्यंत हा ग्रेट ब्रिटनचे संरक्षित क्षेत्र होता. आणि 1916 ते 1074 हा देश गिल्बर्ट आणि इलाइस आयलॅंड कालोनीचा हिस्सा होता.साल 1974 मध्ये स्थानिकांनी ब्रिटीशांचा अमलाखाली रहाण्याविरोधात मतदान केले आहे. त्यामुळे 1978 मध्ये तुवालू राष्ट्रकुलचा संपूर्ण स्वतंत्र देश बनला.

हे सुद्धा वाचा

या देशात 11 हजार लोक रहातात

तुवालूची अकरा हजाराची लोकसंख्या प्रशांत महासागरात पसरलेल्या नऊ बेटांवर रहाते. यांच्याकडे आता कमी वेळ उरला आहे. नासाच्या संशोधकांनूसार या साल 2050 पर्यंत मुख्य फुनफुटीचा अर्धा भाग समु्द्रात जलमग्न होईल. या भागात तुवालूची 60 टक्के लोकसंख्या राहते. येथील शहर चिचोंळ्या भूभागावर वसलेले आहे.

हा देश दिसायला सुंदर आहे. परंतू या ठिकाणच्या लोकांचे समोर अनेक आव्हाने आहेत. एक तर हा देश बुडत चालला आहे. तसेच येथे पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे. तुवालूवासी भाज्या उगवण्यासाठी पावसाच्या पाणी साठवलेल्या टाक्यांवर विसंबून आहेत. कारण खारे पाणी भूजल नष्ट करीत आङे. त्यामुळे शेती नष्ट होत आहे.

भिंत बांधण्याचे काम सुरु

हा देश बुडण्यापासून वाचण्यासाठी फुनाफुटी येथे निसर्गाच्या रौद्ररुपापासून बचाव होण्यासाठी समुद्राचे पाणी रोख्यासाठी भिंत बांधत आहे. तुवालुने 17.3 एकरची कृत्रिम जमीन तयार केलेली आहे. याशिवाय आणखी कृत्रिम भूमी तयार करण्याची योजना आखली आहे. त्यामुळे समुद्राच्या भरती रेषे पेक्षा ही जमीन उंच असणार आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.