जेव्हा अमेरिकेच्या अध्यक्षाचं ट्विटही हटवलं जातं..
अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना ट्विटरने मोठा झटका दिला आहे. ट्विटरने त्यांचे अकाऊंट कायमस्वरुपी बंद केले आहे. (Donald Trump twitter account)
वॉशिंग्टन : अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना ट्विटरने मोठा झटका दिला आहे. ट्विटरने त्यांचे अकाऊंट (twitter account) कायमस्वरुपी बंद केले आहे. चुकीची माहिती आणि ट्विटमुळे दंगल भडकण्याची शक्यता या गोष्टी लक्षात घेऊन हे पाऊल उचलल्याचे ट्विटरने सांगितले आहे. ट्रम्प समर्थकांनी गुरुवारी (7 जानेवारी) अमेरिकेची संसद कॅपिटल हिल भवनमध्ये (US Capitol Violence) मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि तोडफोड केल्याचा प्रकार घडला. या हिंसाचारात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर ट्विटरने हा निर्णय घेतला. (twitter administration permanently suspended the twitter account of Donald Trump)
डोनाल्ड ट्रम्प यांचं अकाऊंट बंद केल्यानंतर ट्विटरने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विट्सची आम्ही समीक्षा केली. त्यांच्या ट्विट्समुळे अमेरिकेत दंगे भडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचे अकाऊंट बंद करण्याचा निर्णय घेतला असे ट्विटरने सांगितले आहे. राष्ट्राध्यक्षपदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीचा निकाल त्यांना अमान्य आहे. तेव्हापासून ते गुरुवारी अमेरिकन संसदेवर हल्ला झाल्यानंतरसुद्धा डोनाल्ड ट्रम्प चिथावणीखोर ट्विट करत होते. फेसबुकच्या माध्यमातूनसुद्धा ते अमेरिकन जनतेला भडकवत असल्याचा आरोप होतोय. ट्रम्प समर्थकांनी अमेरिकन संसदेवर केलेल्या हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
After close review of recent Tweets from the @realDonaldTrump account and the context around them we have permanently suspended the account due to the risk of further incitement of violence.https://t.co/CBpE1I6j8Y
— Twitter Safety (@TwitterSafety) January 8, 2021
अमेरिकन संसदेवर ट्रम्प समर्थकांचा धुडगूस
अमेरिकेन संसदेच्या परिसरात अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) यांच्या समर्थकांनी गुरुवारी (7 जानेवारी) प्रचंड धुडगूस घातला. कॅपिटल हिलवर (Capital Hill) झालेल्या या हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. जगातील सर्वात बलाढ्य लोकशाही असलेल्या अमेरिकेच्या संसदेवर हल्ला झाल्याने संपूर्ण जगात खळबळ उडाली होती. अमेरिकेतील जॉर्जिया राज्यातील मतमोजणीवरुन डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक आक्रमक झाले होते. ट्रम्प समर्थकांनी मतमोजणी रोखण्याचा प्रयत्न करत कॅपिटल बिल्डींगमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्यांना थाबवण्याचा प्रयत्न केला असता ट्रम्प समर्थक आक्रमक झाले आणि हिंसेला सुरुवात झाली होती. या घटनेत आतापर्यंत 5 जणांना जीव गमवावा लागला आहे. दरम्यान वॉशिंग्टनमधील वातावरण तणावपूर्ण असल्यामुळे 15 दिवसांसाठी आणीबाणी लावण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प समर्थकांचा धुडगूस, पोलिसांच्या गोळीबारात चौघांचा मृत्यू
US Violence: आधी समर्थकांचा धुडगुस, अखेर ट्रम्प यांची खुर्ची सोडण्याची तयारी
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताशी मैत्री राखली, जाता-जाता पाकिस्तानसह तुर्कीला मोठा झटका!
(twitter administration permanently suspended the twitter account of Donald Trump)