साठीच्या उंबरठ्यावर बोरिस जॉन्सन यांची नवी इनिंग; गर्लफ्रेंड कॅरी सायमंडसशी बांधणार लग्नगाठ

| Updated on: May 24, 2021 | 11:56 AM

56 वर्षीय बोरिस जॉन्सन पंतप्रधान झाल्यानंतर आपल्या 33 वर्षांच्या गर्लफ्रेंडसह डाऊनिंग स्ट्रीट येथे राहत आहेत. | Boris Johnson carrie symonds

साठीच्या उंबरठ्यावर बोरिस जॉन्सन यांची नवी इनिंग; गर्लफ्रेंड कॅरी सायमंडसशी बांधणार लग्नगाठ
बोरिस जॉन्सन आणि कॅरी सायमंडस
Follow us on

लंडन: इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि त्यांची वाग्दत्त वधू कॅरी सायमंडस हे आगामी वर्षात विवाहबद्ध होणार आहेत. 30 जुलै 2022 रोजी दोघांचा विवाहसोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी आपल्या नातेवाईक आणि मित्रांना निमंत्रणं पाठवायला सुरुवात केल्याचे समजते. (UK PM Boris Johnson wedding fiancee carrie symonds)

‘द सन’ या इंग्रजी वृत्तपत्राच्या माहितीनुसार, या दोघांचा विवाह नक्की कुठे होणार, हे अद्याप समजलेले नाही. 56 वर्षीय बोरिस जॉन्सन पंतप्रधान झाल्यानंतर आपल्या 33 वर्षांच्या गर्लफ्रेंडसह डाऊनिंग स्ट्रीट येथे राहत आहेत. फेब्रुवारी 2020 मध्ये बोरिस जॉन्सन आणि कॅरी सायमंडस यांचा साखरपुडा झाला होता.

गेल्याचवर्षी या दोघांना मुलगा झाला असून त्याचे नाव विल्फ्रेड लॉरी निकोलस जॉन्सन ठेवण्यात आले आहे. यापूर्वी जॉन्सन यांनी दोनवेळा लग्न केले होते. मात्र, हे दोन्ही संसार फारकाळ टिकले नव्हते. त्यानंतर आता बोरिस जॉन्सन कॅरी सायमंडस यांच्यासोबत संसाराच्या नव्या इनिंगला सुरुवात करणार आहेत.

कोण आहे कॅरी सायमंडस?

कॅरी सायमंडस या ‘इंडिपेंडंट’ दैनिकाच्या संस्थापक मॅथ्यू सायमंडस आणि वकील जोसेफिन मॅकफी या दाम्पत्याची कन्या आहेत. 33 वर्षांच्या कॅरी यांचे बालपण लंडनमध्येच गेले आहे. त्यांनी वार्विक विद्यापीठातून कला, इतिहास आणि नाटकाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. कॅरी यांनी खासदार जॅक गोल्थस्मिथ यांच्यासोबत राजकीय क्षेत्रात कामाला सुरुवात केली होती.

2010 साली हुजूर पक्षाच्या माध्यम अधिकारी म्हणून निवड झाली. या काळात बोरिस जॉन्सन लंडनच्या महापौरपदी निवडून आले. यामध्ये कॅरी सायमंडस यांचा मोठा वाटा होता. त्यानंतर कॅरी यांनी तत्कालीन सांस्कृतिक मंत्री जॉन व्हिटिंगडेल यांच्यासोबत काम केले. पुढील काळात कॅरी सायमंडस हुजूर पक्षाच्या जनसंपर्क विभागाच्या प्रमुख झाल्या. 2018 साली ‘Oceana’ या सागरी जीवांविषयीच्या अभ्यास प्रकल्पासाठी काम करण्यासाठी त्यांनी हे पद सोडून दिले. यानंतरच्या काळात कॅरी सायमंडस या वन्यजीव संरक्षक म्हणून नावारुपाला आल्या.

संबंधित बातम्या:

Boris Johnson India visit cancel : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्णय

आमच्या घरी बाळ जन्मलं, ब्रिटीश पंतप्रधानांची घोषणा, 55 वर्षांचे बोरिस जॉन्सन पाचव्यांदा बाबा

(UK PM Boris Johnson wedding fiancee carrie symonds)