नवी दिल्ली: रशिया (Russia) आणि यूक्रेन (Ukraine) यांच्यात दहाव्या दिवशी देखील युद्ध सुरु आहे. दहाव्या दिवशी रशियाच्या टार्गेटवर बुचा आणि इतर शहरं आहेत. यूक्रेनमधील (Russia Ukraine War Video) एक व्हिडीओ आता समोर येत आहे. त्यामध्ये रशियाचं हेलिकॉप्टर यूक्रेननं पाडलं आहे. यानिमित्तानं यूक्रेन देखील रशियाला आक्रमक पणे उत्तर देत असल्याचं समोर येतंय. रशियानं यूक्रेनविरुद्ध युद्ध सुरु केल्यानंतर आतापर्यंत रशिया आक्रमक भूमिकेत पाहायला मिळाला. रशियानं यूक्रेनची अनेक शहरं बेचिराख केल्याचं समोर आलं. रशियाच्या टार्गेटवर सध्या बुचा शहर असल्याचं समोर येतंय. दुसरीकडे परदेशी नागरिकांच्या सुरक्षित सुटकेसाठी युद्ध विराम जारी करण्यात आला आहे. या दरम्यान रशियाचं हेलिकॉप्टर यूक्रेननं पाडल्याचा व्हिडीओ समोर आलाय. यामुळं यूक्रेन देखील रशिया ठोस प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येतंय.
VIDEO : Russia Ukraine War Video | पुतीनचं हेलिकॉप्टर पडत नाही? यूक्रेनच्या मिसाईलचा हा निशाणा बघाच!#RussiaUkraineWarVideo #rusiaukrainewar #helicopter
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/PXbmIaoSCq pic.twitter.com/CGlCLe86Qk
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 5, 2022
रशिया यूक्रेनची अनेक शहर उद्धवस्त करत आहे. रशियाकडून यूक्रेनच्या एका मागे एक शहरांना बेचिराख करण्याचं काम सुरु आहे. रशियन सैन्य आक्रमक असलं तरी त्यांना देखील नुकसान होतं आहे. यूक्रेनच्या सैन्यानं जारी केलेल्या माहितीनुसार 10 हजार रशियन सैनिक मारले गेले आहेत. आतापर्यंत रशियानं शस्त्रास्त्र देखील मोठ्या प्रमाणावर नष्ट करण्यात आली आहेत. 40 हेलिकॉप्टर्स, 269 टँक, 39 मिलट्री विमान, 60 इंधन टँक नष्ट करण्यात अल्याचा दावा यूक्रेनच्या सैनिकांकडून करण्यात आला आहे.
रशियन सैन्यानं 24 फेब्रुवारीपासून युक्रेनवर हल्ला सुरु केला आहे. रशियानं यापूर्वी यूक्रेनला घेरण्याची तयारी सुरु केली होती. यावर यूक्रेन वारंवार चिंता व्यक्त केली होती. युद्धाच्या दहा दिवसांमध्ये दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरु झाल्या होत्या. त्या चर्चेअंती दोन्ही देशांनी युद्धविरामावर शिक्कामोर्तब केलं आहे. यूक्रेनमध्ये अडकलेले परकीय नागरिक सुरक्षितपणे बाहेर पडावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यूक्रेननं ला नाटोनं नो फ्लाय झोन करता नकार दिला होता. यानंतर यूक्रेननं त्याचा निषेध नोंदवला आहे.
इतर बातम्या:
युक्रेनमधून परतलेल्या MBBS च्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय, भारतात इंटर्नशिप करण्याची परवानगी!