Russia Victory day : रशियाचे शक्तीप्रदर्शन, दरम्यान युक्रेनचा रशियन हेलिकॉप्टरवर हल्ला; पुतिन युक्रेनबरोबरच्या युद्धावर बोलले
विजय दिनानिमित्त पुतिन म्हणाले की, आम्हाला हे (युक्रेनवर लष्करी कारवाई) करावं लागलं. तीच गोष्ट बरोबर होती. पुतिन पुढे म्हणाले की, युक्रेनवर कारवाई करण्याचा निर्णय सार्वभौम मजबूत आणि स्वतंत्र देशाने घेतला आहे.
Russia Victory day : युक्रेनबरोबरच्या (Ukraine) युद्धादरम्यान रशिया आज 77 वा विजय दिवस साजरा करत आहे. विजयाच्या परेडमध्ये राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (President Vladimir Putin) यांनी युक्रेनच्या प्रदेशांची नावे देऊन भाषणाला सुरुवात केली. येथे पुतिन यांनी डॉनबास, खार्किव आणि मारियुपोल यांचा उल्लेख केला. पुतिन यांनीही युक्रेनवर केलेल्या कारवाईचे समर्थन केले. तर पुतिन यांनी नाटोलाही घेरले. पुतिन म्हणाले की, नाटो आपल्या सीमेवरून रशियाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. ते पुढे म्हणाले की, युक्रेनच्या लोकांनीही अण्वस्त्रांची धमकी दिली होती. त्याचदरम्यान एक नाट्यमय व्हिडिओ समोर आला असून त्यात रशियन लष्करी हेलिकॉप्टरचा (helicopter) स्फोट झाल्याचे दिसत आहे. तर युक्रेन वेपन ट्रेकरने रविवारी ट्विटरवर हे पोस्ट केले आहे.
LIVE: Russia marks World War Two victory with parade https://t.co/0shwl9US8L
— Reuters (@Reuters) May 9, 2022
युद्धावर पुतिन काय म्हणाले?
विजय दिनानिमित्त पुतिन म्हणाले की, आम्हाला हे (युक्रेनवर लष्करी कारवाई) करावं लागलं. तीच गोष्ट बरोबर होती. पुतिन पुढे म्हणाले की, युक्रेनवर कारवाई करण्याचा निर्णय सार्वभौम मजबूत आणि स्वतंत्र देशाने घेतला आहे.
रशिया विजय दिवस का साजरा करतो?
रशियाच्या या विजय दिनाचा युक्रेन युद्धाशी काहीही संबंध नाही. वास्तविक, हा विजय दिवस दुसऱ्या महायुद्धाशी संबंधित आहे. आज, 9 मे रोजी, 1945 च्या मध्यरात्री, दुसरे महायुद्ध अधिकृतपणे युरोप आणि आफ्रिकेच्या उत्तरेकडील भागात समाप्त झाले.
1945 मध्ये दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीवर नोंदवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ रशिया आपला वार्षिक विजय दिवस साजरा करतो. 24 जून 1945 रोजी पहिली विजय दिवस परेड झाली. यादरम्यान, रशियन सैनिकांनी केवळ मॉस्कोसाठी नाझींशी लढा दिला नाही तर लेनिनग्राड आणि स्टॅलिनग्राडचा बचाव देखील केला. यानंतर त्यांनी रेड स्क्वेअरवर विजय दिवसाची शानदार परेड काढली. यंदाही विजय दिन परेड यानिमित्ताने आयोजित करण्यात आली आहे. हे मॉस्कोमधील रेड स्क्वेअर येथे आयोजित केले जात आहे. 2020 मध्ये, कोरोना महामारीमुळे विजय दिवस परेड 09 मे ऐवजी 24 जून रोजी आयोजित करण्यात आली होती.
#Ukraine: Ukrainian TB-2 drones continue to strike Russian forces on Snake Island.
This time, an Mi-8 helicopter was destroyed, just as troops were disembarking. pic.twitter.com/Y7MO4MiQRN
— ?? Ukraine Weapons Tracker (@UAWeapons) May 8, 2022
युक्रेनचा रशियन हेलिकॉप्टरवर हल्ला, ड्रोनने केले लक्ष्य
दरम्यान एक नाट्यमय व्हिडिओ समोर आला असून त्यात रशियन लष्करी हेलिकॉप्टरचा स्फोट झाल्याचे दिसत आहे. तर युक्रेन वेपन ट्रेकरने रविवारी ट्विटरवर हे पोस्ट केले आहे. त्यात रशियन सैनिक हेलिकॉप्टरमधून खाली उतरत असल्याचे एरियल व्ह्यूमध्ये दिसत आहे. मात्र काही सेंकदातच ड्रोनने त्याचा लक्ष्य घेतल्याचे दिसत आहे. यानंतर व्हिडिओमध्ये हेलिकॉप्टरमधून धूर निघताना दिसत आहे आणि ड्रोन स्नेक आयलंडपासून दूर जाताना दिसत आहे. या व्हिडीओवर कोणतीही तारीख नाही आणि स्फोटात कोणी ठार झाले की जखमी झाले हे स्पष्ट झालेले नाही. युक्रेनच्या लढाऊ विमानांनी स्नेक आयलंडवर कब्जा करणाऱ्या रशियन सैन्यावर हवाई हल्ला केला तेव्हा हे फुटेज प्रसिद्ध करण्यात आले.