Russia Ukraine War Video: आम्ही हत्यार नाही सोडणार, देश सोडून गेल्याच्या अफवांवर यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्षाचं सडेतोड उत्तर, याला म्हणतात नीडर लीडर
रशियानं यूक्रेनवर हल्ले सुरुच ठेवले आहेत. रशियानं यूक्रेनच्या कीव आणि खारकीवमध्ये हल्ला केलाय. यूक्रेनकडून रशियाला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात येतोय.
Russia Ukraine War: रशियानं (Russia) यूक्रेनवर हल्ले सुरुच ठेवले आहेत. रशियानं यूक्रेनच्या (Ukraine) कीव आणि खारकीवमध्ये हल्ला केलाय. यूक्रेनकडून रशियाला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. रशियाच्या आक्रमक हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं यूक्रेनचे राष्ट्रपती वोलदीमीर झेलेंस्की (Volodymyr Zelensky) यांना देश सोडण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. झेलेंस्की यांना सुरक्षितपणे देश सोडायचा असल्यास त्यांना मदत करु, असा प्रस्ताव अमेरिकेनं दिला होता. मात्र, झेलेंस्की यांनी हा प्रस्ताव नाकराल आहे. मी देश सोडणार नाही, आम्हाला शस्त्रास्त्र द्या, मी कोणत्याही परिस्थिती देश सोडून पळून जाणार नाही, असं झेलेंस्की यांनी एक व्हिडीओ जारी करुन म्हटलं आहे. झेलेंस्की यांनी देश सोडून पळ काढल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. झेलेंस्की यांनी व्हिडीओ जारी केल्यानं चर्चा थांबल्या आहेत.
पाहा व्हिडीओ
Не вірте фейкам. pic.twitter.com/wiLqmCuz1p
— Володимир Зеленський (@ZelenskyyUa) February 26, 2022
अमेरिकेनं दिलेली ऑफर
अमेरिकेनं यूक्रेनचे राष्ट्रपती झेलेंस्की यांना देश सोडून न जाण्याचं आवाहन केलं होतं. झेलेंस्की यांनी हा प्रस्ताव नाकारला आहे. मी पळून जाणाऱ्यांपैकी नाही. तुम्हाला माझी मदत करायची असल्यास मला शस्त्रास्त्र द्या, गोळाबारुद द्या, असं ते म्हणाले आहेत. शत्रूंनी मला पहिलं लक्ष निवडलंय, दुसरं लक्ष माझं कुटुंब आहे. यूक्रेनवर रशिया 96 तासात कब्जा मिळवू शकतं, असं झेलेंस्की म्हणाले. यूक्रेननं स्वत: ची लढाई स्वत: लढाई असं जो बायडन यांनी म्हटलंय. त्यामुळं झेलेंस्की यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना चर्चेचा प्रस्ताव पाठवला आहे.
देश सोडणार नसल्याचा पुनरुच्चार
वोलोदीमीर झेलेंस्की यांनी यापूर्वी देखील ट्विट करुन देश सोडणार नसल्याचं म्हटलं होतं. सर्वांनी यूक्रेनला एकट पाडल असल्याचा दावा त्यांनी केला होता. रशियाच्या पहिल्या निशाण्यावर मी असून त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर माझं कुटुंब असल्याचं झेलेंस्की यांनी म्हटलं होतं. रशियन सैन्य कीव मध्ये घुसलं आहे.माझं कुटुंब गद्दार नसून मी देश सोडून पळून जाणार नसल्याच झेलेंस्की म्हणाले होते.
इतर बातम्या:
Russia च्या हेलिकॉप्टरवर Ukraine चा हल्ला; आकाशात घिरट्या घालणारं रशियाचं विमान पाडलं