मनातलं वादळ, चेहऱ्यावरचे हावभाव, आपण पुन्हा भेटण्यासाठी जिवंत असू की नाही, पुन्हा भेट होईल की नाही? एकमेकांपासून दूर होण्याआधी एकमेकांशी नेमकं काय काय बोलावं? एकमेकांना कसं समजवावं? या आणि अशा हजारो प्रश्नांसह ते दोघे रेल्वे स्टेशनवर एकमेकांशी बोलत उभे होते. कसं व्यक्त व्हावं, मनातली घालमेल डोळ्यात स्पष्टपणे जाणवत होती. एक युद्ध दोन देशांत तर सुरु होतच, पण त्याच युद्धानं प्रेम करणाऱ्या दोन जीवांची एकमेकांशी होणारी ताटातूट जास्त जीवघेणी होत होती. एक फोटो कित्येक हजारो शब्दांप्क्षा जास्त बोलतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या संघर्षाचे पडसाद उमटू लागले. लोकांची पळापळ सुरु होती. पण आपलंच माणूस आपल्यापासनं दुरावत चाललंय, आणि त्याची प्रचंड अस्वस्थता एका फोटोग्राफरनं (War Photography) नेमकी आपल्या कॅमेऱ्यात (Camera) टिपली आहे. युक्रेनच्या (Russia Ukraine Conflict) किव शहरातील हा फोटो एका रेल्वेस्थानकावर टिपण्यात आला. युद्धाची किव यावी, अशी प्रतिक्रिया कुण्याही संवेदनशील माणसाच्या मनात हा फोटो पाहून आल्याशिवाय राहणार नाही!
एक कपल रेल्वे स्टेशनवर धीरगंभीर होऊन एकमेकांकडे पाहतंय. या दोघांचं नातं नेमकं काय आहे, याचे फक्त अंदाज बांधले जात आहेत. पण त्याही पेक्षा महत्त्वाचं आहे, ते या दोघांच्या डोळ्यात, देहबोली एकमेकांप्रती दिसत असलेली काळजी, चिंता आणि एकपेकांपासून दूर होण्याची भीती! आता आपलं काय होणार? कसं होणार? असा प्रश्न युक्रेन मधील लोकांना पडलाय.
गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेला संघर्ष गुरुवारी चिघळला. आपण आणि आपली माणसं सुरक्षित राहावीत यासाठी लोकांचा धावपळ, पळापळ सुरु झाली. काहींनी बॅगा घेतल्या आणि शहरापासून दूर जाण्यासाठी प्रवास सुरु केला. अनेकांनी बस पकडण्यासाठी धाव घेतली. तर ज्यांना शक्य होतं ते लोक रेल्वे स्टेशनच्या दिशेनं सरसावले.
Russia-Ukrainian crisis | रहिवाशांच्या वस्तीत रशियाच्या हेलिकॉप्टरची दहशत#Russia #Ukrain #Crisis #War #RussianHelicopter
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/PXbmIaH1Qy pic.twitter.com/IKo7kPitkO
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2022
आपली जागा, आपली माणसं, आपला संसार सोडून लोकांना पळ काढावा लागतोय. रशियाच्या एका निर्णयामुळे युक्रेनची जनता होरपळतेय. अनेक निष्पापांचे जीव घेतले जात असल्याची टीका सुरु झाली आहे.
कित्येक जण बेघर झालेत. अनेकांची घरं नेस्तनाबूत झालीत. शेकडो जखमी झाल्याचं वृत्त हाती येतंय. मृतांचा आकडा किती असेल, याची निव्वळ कल्पना केलेली बरी! पण प्रेमाच्या आड येणाऱ्या युद्धानं सत्ता गाजवता येईलही कदाचित, पण माणसं जिंकायची असतीलतर प्रेमच करावं लागेल, हे वैश्विक सत्य विसरुन चालणार नाही.
PIC OF THE DAY.#Kyiv #UkraineRussie #RussiaUkraineConflict pic.twitter.com/l2y8HM102W
— Rohit Raj (@Rohitraj8480Raj) February 24, 2022
Video | Russia Ukrain War च्या ग्राऊंड झिरोवरुन LIVE परिस्थिती | Russia Ukraine Conflict #UkraineRussie #Ukrainia #RussiaUkraineConflict #RussiaUkraine
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/PXbmIaH1Qy pic.twitter.com/vtVwcu9WXm— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2022
Russia-Ukraine war: ‘या’ मुद्यावरुन तुम्हाला कळेल रशिया आणि युक्रेनमध्ये का युद्ध सुरु आहे ते?
Ukraine Russia War: रशियाचा युक्रेवर हल्ला, युद्ध आणखीन पेटण्याचा धोका, असंख्य बेघर, शेकडो जखमी!