Russia-Ukraine war: ‘या’ मुद्यावरुन तुम्हाला कळेल रशिया आणि युक्रेनमध्ये का युद्ध सुरु आहे ते?

| Updated on: Feb 24, 2022 | 6:52 PM

युक्रेन आणि रशिया या राष्ट्रांच्या सीमारेषा या एकमेकाशेजारी आहेत. त्यामुळे युक्रेन या देशालाही आपली ताकद दाखवण्यासाठी नाटोमध्ये सामील व्हायचे होते. त्यामुळे युक्रेनने आपल्या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेत आपल्यालाही नाटोचे सदस्य बनवण्याची मागणी अमेरिकेकडे सुरू केली.

Russia-Ukraine war: या मुद्यावरुन तुम्हाला कळेल रशिया आणि युक्रेनमध्ये का युद्ध सुरु आहे ते?
Ukraine Russia world War
Image Credit source: PTI
Follow us on

Russia Ukraine war: जगातील महाबलाढ्य अशा रशियाने जेव्हा युक्रेनवर (Ukraine) क्षेपणास्त्रांचा (Missile) मारा सुरु केला तेव्हा त्यावेळी दोन्ही देशातील लोकांच्या मनात युद्धाचीच भीती दाटून आली, मात्र काही वेळानं दोन्ही देशातील लोकांना समजून आले की, हे युद्धच आहे. त्यामुळे USSR (Union of Soviet Socialist Republics) भाग असलेल्या युक्रेनवर राष्ट्रपती पुतिन यांनी का हल्ला केला ते या दहा मुद्यावरुन समजून घ्या.

रशियाने युक्रेनवर हल्ला का केला रशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी एक पाऊल पुढे टाकताच सगळं जग भीतीच्या छायेखाली का आलं? रशियाला युक्रेनकडून काय अपेक्षित आहे.? एकमेका शेजारी असणारी ही राष्ट्रं का बनली एकमेकांची दुश्मन का बनली? अखेर युक्रेनने असे काय केले की रशिया, अमेरिका आणि नाटोचे सदस्य असणाऱ्या देशांबरोबरची नाराजी घेऊन युक्रेनवर क्षेपणास्त्रे डागायला का सुरुवात केली? असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत आणि ते जाणून सगळं जग या दोन्ही राष्ट्रांच्या भूमिकांकडे पाहत आहे. आम्ही तुम्हाला तेच सांगणार आहोत की पूर्व युरोममधील या राष्ट्राने युद्ध करण्याचा का निर्णय घेतला आहे.?


एकमेकांची शेजारील राष्ट्रं

ज्या प्रकारे स्वतंत्र भारत आणि पाकिस्तान ही राष्ट्रं एकाच दिवसात अस्तित्वात आली आहेत, तशीच आणि त्याच प्रकारे रशिया आणि युक्रेन ही राष्ट्रं एकाच दिवशी जन्मला आली आहेत. ज्या दिवशी या राष्ट्रांची निर्मिती झाली तो दिवस होता, 25 डिसेंबर 1991. या दिवशी सोव्हिएत रशियाचे (युएसएसआर) विघटन झाले आणि नव्या 15 देशांची निर्मिती झाली. याच 15 देशांमध्ये ही दोन राष्ट्रं होती रशिया आणि युक्रेनही. 1991 पूर्वी, सोव्हिएत रशिया जगातील दोन ध्रुवीय प्रणालीमध्ये कम्युनिस्ट गटाचे नेतृत्व करत होता आणि सोव्हिएत रशिया अमेरिकेशी जोरदार स्पर्धा करत होता. सोविएत रशिया आणि अमेरिका या दोन देशांमध्ये कट्टर शत्रूत्व होते, त्यामुळे हे दोन्हीही देश अनेकदा एकमेकांसमोर युद्धासाठी उभे राहिले होते. 1945 ते 1991 पर्यंतचा हा काळ खरं तर शीतयुद्धाचा समजला जातो. मात्र या युद्धमैदाना भांडवशाली अमेरिका विजयी होत आली आहे. 25 डिसेंबर 1991 मध्ये मात्र Union of Soviet Socialist Republics हे 15 देशांमध्ये विभागले गेले. USSR हे 15 देशात विभागल्या गेल्यानंतर अमेरिका जगाचे नेतृत्व करु लागली.


सोव्हिएत समाजवादी प्रजासत्ताक संघ

1991 सोव्हिएत समाजवादी प्रजासत्ताक संघ पंधरा देशात विभागला गेल्यानंतर रशियातील काही नागरिकांनी हा झालेला अपमान सहन केला. कारण रशियन प्रजासत्ताक हा युएसएसआरमध्ये सामील असलेल्या 15 प्रजासत्ताक राष्ट्रांचा प्रमुख बनला होता. आणि हेच त्यांच्या दृष्टीने त्यांना त्रासदायक होते. त्यावेळी रशियाची परिस्थिती कमकुवत होती, आणि त्यामुळे त्यांना आपल्या राष्ट्राचा अपमान गपगुमान सहन करावा लागला होता. सोव्हिएत समाजवादी प्रजासत्ताक संघ विभागला गेला तरीही अमेरिकेकडून रशियावर नेहमीच दबाव तयार करण्यात आला.

नाटो (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन) या लष्करी संघटनेच्या माध्यमातून अमेरिकेने यूएसएसआरपासून विभक्त झालेल्या सगळ्यांना देशांना आपल्या अधिपत्याखाली घेण्यास सुरुवात केली.

युक्रेनला नाटोचे सदस्य बनायचे होते, मात्र पुतिन नाराज होते…

युक्रेन आणि रशिया या राष्ट्रांच्या सीमारेषा या एकमेकाशेजारी आहेत. त्यामुळे युक्रेन या देशालाही आपली ताकद दाखवण्यासाठी नाटोमध्ये सामील व्हायचे होते. त्यामुळे युक्रेनने आपल्या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेत आपल्यालाही नाटोचे सदस्य बनवण्याची मागणी अमेरिकेकडे सुरू केली. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष गेल्सिन्की यांच्या या हालचालीमुळे पुतिन प्रचंड नाराज झाले. त्यामुळे त्यांनी आपले सैन्य युक्रेनच्या सीमेवर पाठवण्यास सुरुवात केली. आणि हेच रशिया-युक्रेनच्या तणावाचे तात्कालिक कारण आहे असल्याचे म्हटले जाते.

संबंधित बातम्या

Ukraine Russia War: रशियाचा युक्रेवर हल्ला, युद्ध आणखीन पेटण्याचा धोका, असंख्य बेघर, शेकडो जखमी!

Russia Ukraine War : आम्हाला संरक्षण सामग्रीची मदत करा, रशियाच्या हल्ल्यानंतर यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची विनंती

Russia Ukraine Crisis: युक्रेनच्या 10 शहरांवरती रशियाचा बॉम्ब हल्ला, 300 लोकांचा मृत्यू