Russia Ukraine war : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी युक्रेनविरुद्ध युद्ध जाहीर केल्यानंतर रशियन सैन्याचे हल्ले तीव्र झाले आहेत. रशियन सैन्य युक्रेनमधील शहरांमधील लष्करी तळांना लक्ष्य करून हल्ले करत आहे. यासोबतच त्यांनी युक्रेनची हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त केल्याचा दावा रशियाकडून केला जात आहे. गुरुवार 24 फेब्रुवारी रोजी सकाळी झालेल्या पहिल्या हल्ल्यापासून सोशल मीडिया (Social media) प्लॅटफॉर्मवर अनेक व्हिडिओ (Video) व्हायरल (Viral) होत आहेत. यातच एक इमोशनल (Emotional) व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्याला पाहून तुम्हीही भावुक झाल्याशिवाय राहणार नाहीत. आपण सर्व जाणतो, की युद्ध ही एक विद्ध्वंसकारी प्रक्रिया आहे. जिथे लोकांचे केवळ प्राण जाऊ शकतात. त्यातून कोणाचेही भले होत नसते. स्वतःचे प्राण वाचवणे आणि कुटुंबातील सदस्यांचे प्राण वाचवणे हे यातील एक अवघड काम असते. रशिया-युक्रेन युद्ध आणि यासंबंधीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की एक वडील बसमध्ये बसून आपल्या मुलीचा निरोप घेत आहेत. या वेळी वडील आणि मुलीचे डोळे पाणावले आहेत. @lil_whind नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. ज्याला तीन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओसोबत कॅप्शन लिहिले आहे, की युक्रेनियन बाप आपल्या कुटुंबाला अलविदा म्हणतो, तर तो रशियनांशी लढण्यासाठी मागे राहतो.’ यासोबतच लोक या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी भावनिक कमेंट केल्या. एका यूझरने लिहिले, ‘देव या पित्याचे आणि युक्रेनचे रक्षण करो.’ तर दुसऱ्या यूझरने लिहिले, ‘देव या माणसाची त्याच्या कुटुंबाशी लवकरच भेट घडवून देवो.’ दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘हे खरोखरच हृदयद्रावक आहे. याशिवाय अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
A Ukrainian father says goodbye to his family, while he stays behind to fight the Russians?#Ukraine #StopWar pic.twitter.com/g3DuFKM5Op
— Lil (@lil_whind) February 24, 2022