जगावर वाढत्या स्फोटकांच्या वापराचा धोका, संयुक्त राष्ट्राकडून वेळीच पावलं उचलण्याचं आवाहन

जगभरात स्फोटकांच्या (IED) वापराचा धोका वाढलाय. यावर संयुक्त राष्ट्राने (United Nations) या स्फोटकांच्या स्थितीवर काळजी व्यक्त केलीय.

जगावर वाढत्या स्फोटकांच्या वापराचा धोका, संयुक्त राष्ट्राकडून वेळीच पावलं उचलण्याचं आवाहन
Follow us
| Updated on: Apr 09, 2021 | 4:45 PM

United Nations on IED : जगभरात स्फोटकांच्या (IED) वापराचा धोका वाढलाय. यावर संयुक्त राष्ट्राने (United Nations) या स्फोटकांच्या स्थितीवर काळजी व्यक्त केलीय. तसेच हा धोका कमी करण्यासाठी जगभरातील देशांना एकत्र येऊन प्रयत्न करण्याचं आवाहन केलंय. संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंतोनियो गुतारेस (Antonio Guterres) म्हणाले, “सशस्त्र गट शहरांमध्ये सक्रीय होत आहेत. या ठिकाणी त्यांचा प्रभाव वाढतोय. त्यामुळे या भागात स्फोटकांच्या वापराचं प्रमाणही वाढण्याचा धोका आहे (United Nations on IED Use). त्यामुळे जगभरातील देशांनी या शस्त्रास्त्रांसोबतच गाडलेले भूसुरुंग स्फोटकं आणि युद्धातील जुनी शस्त्रास्त्रं यांच्यापासूनचा धोका कमी करण्यासाठी एकत्र येऊन प्रयत्न करायला हवा (United Nation comment on International Treaty Against Land Mines and risk of IED).”

संयुक्त राष्ट्र प्रमुखांनी गुरुवारी (9 एप्रिल) सुरक्षा परिषदेसमोर बोलताना सांगितलं, “मागील 3 वर्षांमध्ये संयुक्त राष्ट्राने दिलेल्या निधीतून अफगाणिस्तान आणि इराकपासून कंबोडिया आणि कोलंबियामधील प्रमुख केंद्रांच्या 560 चौरस किलोमीटर भाग आयईडीपासून सुरक्षित करण्यात आला आहे (UN on International Treaty Against Land Mines). हा भाग मॅनहॅटनच्या क्षेत्रफळाच्या 10 पटीपेक्षा जास्त आहे. आता याचा उपयोग इमारती, शेती, शाळा आणि रस्त्यांच्या कामासाठी करता येईल. संयुक्त राष्ट्र आणि इतर संघटनांकडून केलेल्या प्रयत्नांनंतरही सध्याची ‘आव्हानं’ मोठी आहेत. हे प्रयत्न कोविडमुळे प्रभावित झालेत.”

“कोविड-19 च्या जगातिक साथीरोगामुळे भूसुरुंगांना हटवण्याच्या मोहिमांना मर्यादा आल्या आहेत. सोमालिया आणि माली या दोन्ही देशांमध्ये आयईडी स्फोटकांमुळे आफ्रिकी संघाच्या शांतीरक्षकांना सर्वात मोठा धोका आहे. भूसुरुंग आणि युद्धातील अन्य स्फोटकांचे अवशेष दक्षिण सूडानमधील संयुक्त राष्ट्राच्या शांतीरक्षकांच्या प्रवासाला अडथळे करत आहे. मध्य आफ्रिका प्रजासत्ताक आणि कांगोमध्ये नव्याने स्फोटकांचा धोका वाढतो आहे. 1997 मध्ये भूसुरुंगांविरुद्ध आंतरराष्ट्रीय करार झाला आहे ( 1997 International Treaty Against Land Mines). यावर जगातील 164 देशांनी स्वाक्षरी केलीय,” असंही त्यांनी नमूद केलं.

भूसुरुंगांविरुद्ध आंतरराष्ट्रीय करार काय आहे?

या करारानुसार मोठ्या प्रमाणात भूसुरुंगांचा साठा करणं, उत्पादन करणं, हस्तांतरण करणं यावर निर्बंध आहेत. मात्र, अनेक देश या प्रकरणात बेजबाबदारपणे वागत आहेत.

कंबोडिया, लाओस आणि व्हिएतनाममध्ये चिंताजनक स्थिती

संयुक्त राष्ट्राच्या या सुरक्षा परिषदेचं अध्यक्षपद व्हिएतनामकडे (Vietnam) होतं. त्यांनीच या सुरक्षा परिषदेची व्हर्च्युअल बैठक आयोजित केली. व्हिएतनामचे परराष्ट्र मंत्री बुई थान्ह सन यांनी अध्यक्षपद भुषवलं. यावेळ सन म्हणाले, ‘दरवर्षी अफगानिस्तान, लिबिया आणि यमेन सारख्या देशांमध्ये भूसुरुंगांचा स्फोट होऊन, युद्धातील स्फोटकांचे अवशेष आणि इतर स्फोटकांचा वापर होऊन 10 हजार लोकांचा जीव जातोय. यात बहुतांश सर्वसामान्य नागरिक आणि लहान मुलांचा समावेश आहे. अशा घटना कंबोडिया, लाओस आणि माझा स्वतःचा देश व्हिएतनाममध्ये चिंताजनक स्थिती आहे. या देशांमध्ये अनेक दशकांपूर्वी युद्ध झालेले आहेत.”

हेही वाचा :

धक्कादायक, अफगाणिस्तानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या पथकावर जीवघेणा हल्ला, 5 जणांचा मृत्यू

‘शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार, त्यांना अडवू नका’, संयुक्त राष्ट्राकडूनही मोदी सरकारला कानपिचक्या

जगातील वर्षातील सर्वात मोठी अत्याचाराची घटना, नायजेरियात 110 नागरिकांची हत्या

व्हिडीओ पाहा :

United Nation comment on International Treaty Against Land Mines and risk of IED

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.