पाकिस्तानने चीनमधील मुस्लिमांची काळजी करावी : अमेरिका

चीनमध्ये (muslim atrocities china Xinjiang conflict) 10 लाखांपेक्षा जास्त तुर्की बोलणारे आणि उईगर मुस्लिमांना नजरकैदेत ठेवण्यात आलंय, त्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान शांत का आहेत, असा सवालही एलिस वेल्स यांनी केला.

पाकिस्तानने चीनमधील मुस्लिमांची काळजी करावी : अमेरिका
Follow us
| Updated on: Sep 27, 2019 | 4:35 PM

न्यूयॉर्क : काश्मीरप्रश्नी जगभरात मुस्लिमांचा आपल्यालाच पुळका असल्याचा आव आणत असणाऱ्या पाकिस्तानला अमेरिकेने सुनावलं आहे. पाकिस्तान काश्मीरमधील मुस्लिमांची जेवढी चिंता करत आहे, तेवढीच चिंता चीनमध्ये (muslim atrocities china Xinjiang conflict) नजरकैदेत असलेल्या लाखो मुस्लिमांची करावी, असा सल्ला अमेरिकेच्या प्रभारी सहाय्यक सचिव (दक्षिण आणि मध्य आशिया) एलिस वेल्स यांनी दिला. चीनमध्ये (muslim atrocities china Xinjiang conflict) 10 लाखांपेक्षा जास्त तुर्की बोलणारे आणि उईगर मुस्लिमांना नजरकैदेत ठेवण्यात आलंय, त्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान शांत का आहेत, असा सवालही एलिस वेल्स यांनी केला.

काश्मीरमधील मुस्लिमांच्या काळजीचा आव आणणाऱ्या इम्रान खान यांच्याबाबतचा प्रश्न वेल्स यांना विचारण्यात आला होता. पश्चिम चीनमध्ये नजरकैदेत असलेल्या मुस्लिमांबाबतही त्याच प्रकारची चिंता अपेक्षित आहे. चीनमधील मुस्लीम अत्यंत वाईट परिस्थितीत आहेत, असं वेल्स यांनी सांगितलं. पाकिस्तानने काश्मीरपेक्षा चीनमधील मुस्लिमांची चिंता करावी, कारण तिथे मानवाधिकारांचं उल्लंघन होत आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत चीनमधील मुस्लिमांच्या परिस्थितीकडे लक्ष वेधल्याचंही वेल्स म्हणाल्या.

इम्रान खान भारताविरोधात मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचा प्रचार जगभरात करत आहेत. त्यातच अमेरिकेने पाकिस्तानला आरसा दाखवण्याचं काम केलंय. प्रश्न मुस्लिमांचा असल्यामुळे काश्मीर प्रश्नी जग शांत आहे, असं इम्रान खान म्हणाले होते. पण चीनमधील मुस्लीम अत्याचारावर चकार शब्दही न काढल्यामुळे इम्रान खान यांची दुटप्पी भूमिका पुन्हा एकदा समोर आली.

नुकतंच एका मुलाखतीत इम्रान खान यांनी चीनमधील मुस्लीम अत्याचारावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता. पाकिस्तानचे चीनसोबत चांगले संबंध आहेत, त्यामुळे आम्ही वैयक्तिक पातळीवर हा मुद्दा उठवू, असं ते म्हणाले.

संयुक्त राष्ट्राच्या मते, चीनमध्ये जवळपास 10 लाख उईगर आणि इतर मुस्लिमांना नजरकैदेत ठेवण्यात आलंय. विशेष म्हणजे या नजरकैदेत ठेवलेल्या शिबिरांना चीनने प्रशिक्षण शिबिर जाहीर केलंय. या शिबिरांच्या माध्यमातून कट्टरतावाद संपवण्यासोबतच कौशल्य प्रशिक्षण दिलं जात असल्याचं चीनचं म्हणणं आहे. नुकतंच अमेरिकेच्या नेतृत्त्वात 30 पेक्षा जास्त देशांनी शिनजियांग प्रांतात होत असलेल्या या अत्याचाराचा निषेध केला होता.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.