US Election 2020 : जय-पराजयाचा फैसला मी किंवा बायडन नव्हे, तर न्यायमूर्ती करणार : डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या अंतिम निकालाचं चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

US Election 2020 : जय-पराजयाचा फैसला मी किंवा बायडन नव्हे, तर न्यायमूर्ती करणार : डोनाल्ड ट्रम्प
Follow us
| Updated on: Nov 06, 2020 | 10:18 AM

वॉशिंग्टन : अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर (US Presidential Election 2020) मतमोजणीदरम्यान डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन (Joe Biden) यांची विजयी दिशेने वाटचाल सुरु आहे, तर दुसऱ्या बाजूला विद्यमान राष्ट्राद्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पिछाडीवर आहेत, त्यामुळे ते आता अस्वस्थ होऊ लागले आहेत. ट्रम्प यांनी आज (06 नोव्हेंबर) पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत निवडणुकीत फसवणूक होत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा त्यांनी याप्रकरणी कोर्टाकडे दाद मागणार असल्याचे सांगितले. ट्रम्प म्हणाले की, या निवडणुकीचा फैसला आता न्यायाधीश करतील. (US Election Live Result Update)

अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या अंतिम निकालाचं चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मतमोजणी सुरु होऊन एक दिवसापेक्षा अधिक वेळ झाला आहे, तरीदेखील अंतिम निकाल समोर आलेले नाहीत. दरम्यान आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार जो बायडन हे विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचे पाहायला मिळत आहे. बायडन यांनी विस्कॉन्सिन आणि मिशिगनसारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये विजय मिळवला आहे. विजयासाठी 270 इलेक्ट्रोल व्होट्सची गरज आहे, तर बायडन यांनी आतापर्यंत 264 इलेक्ट्रोल व्होट्स मिळवले आहेत. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना 214 इलेक्ट्रोल व्होट्स मिळाले आहेत.

जगातील सर्वात मोठं न्यायालय निवडणुकीचा फैसला करणार

डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी कोणत्याही पुराव्यांशिवाय दावा केला की, जर वैध मतांची मोजणी केली तर आम्ही खूप सहजपणे ही निवडणूक जिंकू. जर अवैध मतांची मोजणी केली तर ते जिंकतील. मी अगोदरच अनेक महत्त्वाची राज्य जिंकली आहेत. आम्ही ऐतिहासिक मतांनी अनेक राज्यांमध्ये विजय मिळवला आहे.

मी काही राज्य जिंकल्याचा दावा केला आहे, तर काही राज्य जिंकल्याचा दावा बायडन यांनीदेखील केला आहे. परंतु मला वाटतं की अंतिम फैसला न्यायाधीश करतील. मतमोजणीदरम्यान फसवणूक झाली आहे, मी हे आपल्या देशात होऊ देणार नाही.

ट्रम्प म्हणाले की, आम्ही ही निवडणूक खूप सहजपणे जिंकू. आता न्यायालयात बरेच खटले दाखल होणार आहेत, आमच्याकडे त्यासाठी पुष्कळ पुरावे आहेत. या निवडणुकीचा फैसला जगातील सर्वात मोठ्या न्यायालयात होईल. निवडणुकीत कोणत्याही प्रकारची फसवणूक आम्ही होऊ देणार नाही.

अमेरिका राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीला आता वेगळ वळण लागलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून जो बायडन यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी दर्शवली आहे. जो बायडन यांनी जोरदार मुसंडी मारत विस्कॉन्सिन,मिशिगन या राज्यांमध्ये विजय मिळवला. नेवादा या स्विंग स्टेटमध्ये त्यांना 6 मतं मिळाल्यास ते विजयी होऊ शकतात. नेवादामधून बायडन आघाडीवर आहेत.

पेन्सिल्वेनिया आणि नॉर्थ कॅरोलिनामध्ये डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर आहेत. दोन्ही रांज्यांमध्ये मिळून 35 इलेक्ट्रोल व्होटस आहेत. जॉर्जियामध्ये बायडन आणि ट्रम्प यांच्यात चुरशीची लढत होत आहे. इथेही ट्रम्प आघाडीवर आहेत. पेन्सिल्वेनिया, नॉर्थ कॅरोलिना आणि जॉर्जिया मधील सर्व मतं मिळाली तरी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव होऊ शकतो. त्यांना नेवादामधील 6 मतं मिळवण्याची गरज आहे. नेवादामध्ये बायडन आघाडीवर आहेत.

बायडन यांचा विजयाचा दावा

दोन दिवसांनतरही लाखो मतांची मोजणी सुरु आहे. बायडन यांना 7.1 कोटी मतं मिळाली आहेत. बायडन यांना मिळालेली मतं इतिहासातील सर्वाधिक आहेत. बुधवारी बायडन यांनी विजय मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला होता.

विस्कॉन्सिनमध्ये पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी

डोनाल्ड ट्रम्प यांनी जॉर्जिया, पेन्सिल्वेनिया, मिशिगन आणि विस्कॉन्सिनमध्ये पुन्हा मतमोजणी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. बुधवारी ट्रम्प यांनी विजयाचा दावा केला होता.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.