US Election 2020 : मी राष्ट्रध्यक्षपदाचं कर्तव्य नक्की पूर्ण करेन, अंतिम निकालाआधीच जो बायडन यांचा विजयी नारा

अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे अंतिम निकाल समोर येण्यास बराच वेळ आहे. कालपासून सुरु असलेल्या मतमोजणीनंतर आता निकालाचं चित्र काही प्रमाणात स्पष्ट होऊ लागलं आहे.

US Election 2020 : मी राष्ट्रध्यक्षपदाचं कर्तव्य नक्की पूर्ण करेन, अंतिम निकालाआधीच जो बायडन यांचा विजयी नारा
Follow us
| Updated on: Nov 05, 2020 | 7:37 AM

वॉशिंग्टन : अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे अंतिम निकाल (US Presidential Election 2020) समोर येण्यास बराच वेळ आहे. कालपासून सुरु असलेल्या मतमोजणीनंतर आता निकालाचं चित्र काही प्रमाणात स्पष्ट होऊ लागलं आहे. डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन (Joe Biden) हे विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचे पाहायला मिळत आहे. बायडन यांनी विस्कॉन्सिन आणि मिशिगनसारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये विजय मिळवला आहे. (US Election 2020 : Joe biden says I campaigned as democrat but will govern as American President)

विजयासाठी 270 इलेक्ट्रोल व्होट्सची गरज आहे, तर बायडन यांनी आतापर्यंत 264 इलेक्ट्रोल व्होट्स मिळवले आहेत. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्य यांना 214 इलेक्ट्रोल व्होट्स मिळाले आहेत. यादरम्यान डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी अंतिम निकालापूर्वीच आपणच विजयी होणार असल्याचा दावा केला आहे. तसेच बायडन म्हणाले की, मी माझं निवडणूक कॅम्पेन डेमोक्रॅट नेता म्हणून केलं असलं तरी पुढील कामं ही अमेरिकन अध्यक्षाप्रमाणे करेन. अंतिम निकालानंतर विजय आपलाच होईल. तर दुसऱ्या बाजूला विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मतमोजणीत घोटाळा झाल्याचा आरोप करत आहेत.

बायडन म्हणाले की, राष्ट्रध्यक्षपद हे कोणत्याही पक्षपातापासून दूर असते. हे असं पद आहे जे सर्वांचा सहभाग निश्चित करतं. त्या पदावर राहून सर्वांची कर्तव्यं पार पाडावी लागतात, मी तसंच करेन. मी असं म्हणत नाही की, आपण जिंकलोय, परंतु अंतिम निकालानंतर तुम्ही पाहाल की, विजय आपलाच झालेला असेल.

पेन्सिलव्हेनियामधील निकाल अद्याप बाकी

विजयासाठी 270 इलेक्ट्रोल व्होट्सची गरज असताना बायडन यांना आतापर्यंत 264 इलेक्ट्रोल व्होट्स मिळले आहेत. तर विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना 214 इलेक्ट्रोल व्होट्स मिळाले आहेत. त्यामुळे बायडन विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र त्यांचा विजय अद्याप निश्चित नाही, कारण, अद्याप नेवादा आणि पेन्सिलव्हेनियासारख्या महत्त्वाच्या राज्यांमधील निकाल समोर आलेले नाहीत. या दोन्ही राज्यांमधील निकाल दोन्ही नेत्यांच्या भवितव्याचा फैसला करणार आहेत.

मिशिगन, न्यू जर्सी आणि न्यूयॉर्कमध्ये बायडन विजयी

न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार माजी उपराष्ट्राध्यक्ष बायडन यांनी कोलोरॅडो, कनेक्टिकट, डेलावेयर, इलिनोइस, मेसाचुसेट्स, न्यू मेक्सिको, वरमोन्ट आणि वर्जिनियामध्ये विजय मिळवला आहे. तसेच महत्त्वाचं म्हणजे बायडन यांनी मिशिगन, विस्कॉन्सिन, न्यू जर्सी आणि न्यूयॉर्कमध्येदेखील विजय मिळवला आहे. न्यूयॉर्कमध्ये बायडन यांना 22 लाख मतं तर ट्रम्प यांना 12 लाख मतं मिळाली आहेत.

संबंधित बातम्या

US Elections 2020 : अमेरिकेत दोन्ही पक्षांच्या सारख्याच जागा निवडून आल्यास काय? ‘या’ पद्धतीने राष्ट्राध्यक्ष निवड होणार

US Election 2020 : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक मतमोजणीत अडथळा, हँड सॅनिटायझरमुळे बॅलेट स्कॅनर खराब

US election 2020: काल रात्रीपर्यंत मी अनेक राज्यांत आघाडीवर होतो, पण आता सगळंच बदललंय; डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक आरोप

(US Election 2020 : Joe biden says I campaigned as democrat but will govern as American President)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.