US election 2020: काल रात्रीपर्यंत मी अनेक राज्यांत आघाडीवर होतो, पण आता सगळंच बदललंय; डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक आरोप
आता अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोणते नाट्यमय वळण घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. | Donald Trump
न्यूयॉर्क: अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची बुधवारी सकाळपासून सुरु असलेली मतमोजणी अजूनही सुरुच आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्या इलेक्टोरल व्होटसमध्ये फार कमी फरक असल्यामुळे ही लढत भलतीच चुरशीची झाली आहे. अशातच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करुन मतमोजणी प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. (Donald Trump take objection on Mail In ballot dumps)
काल रात्रीपर्यंत अनेक राज्यांमध्ये मला चांगली आघाडी मिळाली होती. यामध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे सरकार असलेल्या राज्यांचाही समावेश होता. मात्र, अचानक काहीतरी जादू झाल्याप्रमाणे एकएक करुन अनेक राज्यांतील आघाडी नाहीशी झाली. याचे कारण म्हणजे बोगस मतांचीही मोजणी करण्यात आली. हा सर्व प्रकार धक्कादायक आहे, असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
How come every time they count Mail-In ballot dumps they are so devastating in their percentage and power of destruction?
— Donald J. Trump (@realDonaldTrump) November 4, 2020
त्यामुळे आता अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोणते नाट्यमय वळण घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एरवी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल काही तासांमध्ये जाहीर होतो. मात्र, यंदा मतमोजणी प्रक्रिया भलतीच लांबली आहे. बोगस मतदान होण्याचा धोका अमेरिकेतील निवडणूक तज्ज्ञांच्याही लक्षात आला नाही. त्यांनी खूप मोठी ऐतिहासिक चूक केली आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे ट्विटरनेही डोनाल्ड ट्रम्प यांच्या या ट्विटवर ‘आक्षेपार्ह मजकूर’ असे लेबल लावले आहे. त्यामुळे आता अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निकालाची उत्कंठा आणखीनच वाढली आहे.
आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार एकूण 538 इलेक्टोरल व्होटसपैकी डोनाल्ड ट्रम्प यांना 213 तर जो बायडन यांना 238 मते मिळाली आहेत. बहुमतासाठी 270 इलेक्टोरल व्होटसची गरज आहे. त्यामुळे आता अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण होणार याचा निकाल पेनिसिल्वेनिया, मिशिगन आणि विस्कॉंसिन या तीन राज्यांच्या निकालावर अवलंबून आहे.
संबंधित बातम्या:
(Donald Trump take objection on Mail In ballot dumps)