US Election 2020 : व्हाईट हाऊसजवळ आंदोलकांची गर्दी, ट्रम्प यांना जोरदार विरोध
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसजवळ 'ब्लॅक लाईव्हज मॅटर प्लाजा' येथे जवळपास 1 हजार आंदोलनकर्ते जमा झाल्याचं पाहायला मिळालं.
वॉशिंग्टन : अमेरिकेत निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसजवळ ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर प्लाजा’ येथे जवळपास 1 हजार आंदोलनकर्ते जमा झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जोरदार विरोध करण्यात आला. दुसरीकडे वॉशिंग्टनमधील रस्त्यांवर देखील शेकडो लोकांनी मोर्चा काढला. यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबा झाल्याचंही दिसून आलं. काही ठिकाणी तर फटाके देखील फोडण्यात आले (US Election 2020 protesters gathered near White House opposing Donald Trump).
न्यूयॉर्क शहरापासून सिएटलपर्यंत अनेक ठिकाणी छोटेमोठे आंदोलनं होत आहेत. असं असलं तरी आधी वर्तवलेल्या शक्यतेनुसार आतापर्यंत अमेरिकेत कोठेही गंभीर प्रकारची हिंसा किंवा असंतोषाची स्थिती पाहायला मिळाली नाही. वाशिंग्टनमधील आंदोलनं शांतीपूर्ण पद्धतीने होत आहेत. यावेळी “हा रस्ता कुणाचा आहे? आमचा आहे!” आणि “आम्हाला न्याय मिळाला नाही तर त्यांना शांती मिळणार नाही” अशा घोषणा आंदोलकांकडून दिल्या जात आहेत. आंदोलनात सहभागी युवक नाचतानाही दिसून आले आहेत.
आंदोलकांनी “ट्रम्प नेहमी खोटे बोलतात” असं लिहिलेले मोठ-मोठे बॅनर हातात घेतले आहेत. एका ठिकाणी आंदोलकांनी आंदोलनस्थळी उभ्या असलेल्या पोलीस गाडीचे टायर पंक्चर केल्याचीही घटना घडली. संपूर्ण अमेरिकेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंसा होण्याच्या भितीने शेकडो व्यापाऱ्यांनी आपले व्यवसाय बंद ठेवण्यास प्राधान्य दिलं आहे. वाशिंग्टनच्या मेअर मुरिअल बॉऊसर म्हणाल्या, “काही लोक गोंधळ आणि अडचणी तयार करु इच्छित आहेत. दिवसाच्या वेळी इतके दुकानं बंद असलेलं मी कधीही पाहिलेलं नाही. हे पाहून वाईट वाटतं.”
दरम्यान, अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. सध्या 538 ‘इलेक्टोरल कॉलेज सीट’मध्ये बायडन यांना 227 आणि ट्रम्प यांना 213 इलेक्टोरल मतं मिळाली आहे. अमेरिकेत बहुतमतासाठी 270 इलेक्टोरल मतं आवश्यक आहे. अमेरिकेतील सर्व 50 राज्यांमध्ये एकाचवेळी मतमोजणी होत आहे.
कुणाचा कोठे विजय?
एपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, केंटकी, इंडियाना, ओकलाहोमा, टेनेसी, वेस्ट व्हर्जिनिया, नेब्रास्का, नॉर्थ आणि साऊथ डाकोटा, यूटा, नेब्रास्का, लुईसियाना, साऊथ कॅरिलोना, अल्बामा, वायोमिंग, कंसास, मिसोरी, मिसिसिपी, ओहियो, फ्लोरिडा या राज्यांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना विजय मिळाला आहे. दुसरीकडे न्यू यॉर्क, वेरमाँट, रोड आयलंड, मेसाचुसेट्स, न्यू जर्सी, मेरीलंड, न्यू मेक्सिको, कोलोराडो, कनेक्टिकट, वॉशिंग्टन, ओरेगन, कॅलिफोर्निया, इलिनोईस, हवाई, टेक्सस आणि व्हर्जिनियाच जो बायडेन यांना विजय मिळाला आहे.
संबंधित बातम्या :
US Election 2020 : ट्रम्प आणि बायडन यांचं भवितव्य ‘या’ 12 राज्यांच्या हातात
संबंधित व्हिडीओ :
US Election 2020 protesters gathered near White House opposing Donald Trump