US Election Result 2024 : अमेरिकेत रणधुमाळी, ट्रम्प की कमला हॅरिस ? नवा राष्ट्राध्यक्ष कोण ?

संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं असून डेमोक्रॅट कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रंप यांच्यात चुरशीची लढत आहे. डोनाल्ड ट्र्म्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनणार की नवा इतिहास रचत कमला हॅरिस अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनणार याकडे जगाचं लक्ष लागलं आहे.

US Election Result 2024 : अमेरिकेत रणधुमाळी, ट्रम्प की कमला हॅरिस ? नवा राष्ट्राध्यक्ष कोण ?
ट्रम्प वि कमला हॅरिस थेट लढत
Follow us
| Updated on: Nov 06, 2024 | 9:01 AM

संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं असून डेमोक्रॅट कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रंप यांच्यात चुरशीची लढत आहे. उपराष्ट्रपती आणि माजी राष्ट्राध्यक्ष यांच्यात थेट लढत असून कोण बाजी मारतंय याकडे जगाचं लक्ष एकवटलं आहे.  डोनाल्ड ट्रम्प ही निवडणूक जिंकले, तर ते दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनतील. मात्र कमला हॅरिस यांचा विजय झाला तर त्या नवा इतिहास रचत अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनतील.

निवडणूक प्रचारादरम्यान दोन्ही प्रतिस्पर्ध्यांचे संपूर्ण लक्ष स्विंग स्टेटवर होते. या स्विंग स्टेट्सपैकी पेनसिल्व्हेनिया किंगमेकर बनू शकते. जगातील या सर्वात गुंतागुंतीच्या निवडणूक प्रक्रियेत, राष्ट्रपती होण्यासाठी बहुमताचा आकडा 270 आहे.

भारतीय वंशाच्या कमला हॅरीस व डोनाल्ड ट्रम्प या दोघांनाही अध्यक्षीय निवडणुकीसाठीच्या जनमत चाचणीमध्ये जवळपास समान विजयाची संधी असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यामुळे आधी मतदान आणि आता निवडणुकीच्या निकालाकडे फक्त अमेरिकेचच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मतमोजणीचे ट्रेंड वेगाने बदलत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी आता 101 इलेक्टोरल मतं घेऊन आघाडी घेतली आहे. कमला हॅरिस यांच्याकडे 71 इलेक्टोरल मतं आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यासाठी 270 इलेक्टोरल मतं गरजेची आहेत.. डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे चिन्ह असलेला हत्ती आता वेगाने धावू लागला आहे. त्याचवेळी कमला हॅरिस यांच्या डेमोक्रॅट पक्षाचे चिन्ह असलेले गाढव हळूहळू पुढे सरकताना दिसत आहे.

अमेरिकेतील निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना इलेक्टोरल कॉलेजचे ट्रेंड समोर येत असून सातत्याने बदलत आहेत. यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रेंडमध्ये कमला हॅरिस यांना मागे टाकले होते, आता या दोघांमध्ये कडवी टक्कर पहायला मिळत आहे. काही वेळापूर्वी डोनाल्ड ट्रम्प 101 इलेक्टोरल कॉलेजमध्ये आघाडीवर होते तर कमला हॅरिस 71 जागांवर आघाडीवर होत्या.

अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणूक निकालांच्या अनुषंगाने सर्वात महत्त्वाच्या जॉर्जिया राज्यात डोनाल्ड ट्रम्प व कमला हॅरीस यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. आत्तापर्यंतच्या मतमोजणीत ट्रम्प यांच्याकडे 52.7 टक्के मत असून कमला हॅरिस यांना 46.7 टक्के मतं मिळाली आहेत.

या निवडणुकीत कमला हॅरिस की डोनाल्ड ट्र्म्प , कुणाचाही विजय होवो, पण भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होणार असल्याचं बोललं जात आहे.

निवडणुकीत अनेक चढ-उतार

अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शर्यत अंतिम टप्प्यात पोहोचत असताना, ट्रम्प आणि हॅरिस यांच्यात चुरशीची लढत असतानाही ट्रम्प यांच्या कॅम्पने आधीच विजय घोषित केला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वाऱ्याच्या दिशेने बदल झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले. मतदानाच्या काही आठवड्यांपूर्वी अचानक ट्रम्प यांना पाठिंबा वाढू लागला आणि त्यामागे अनेक कारणे होती.

खरंतर गेल्या 6 महिन्यांत अमेरिकेच्या निवडणुकीच्या शर्यतीत चढ-उतार झाले आहेत. आधी राष्ट्राध्यक्षपदाची लढत बायडेन वि. ट्रम्प यांच्यात होणार होती.मात्र बायडेन यांनी पुन्हा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेकला आणि कमला हॅरिस यांना उमेदवारी देण्यात आली. यापूर्वी, ट्रम्प पुढे दिसत असताना, कमला हॅरिस राजकीय लढाईत सामील होताच परिस्थिती बदललीते. अनेक सर्वेक्षणांनी कमला हॅरिस यांना आघाडीवर दाखवलं पण हे फार काळ टिकू शकले नाही.

यातील सर्वात महत्वाची भूमिका बजावली ती एका घटनेने, ती म्हणजे ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न. यामुळे केवळ त्यांचे समर्थकच एकजूट झाले नाहीत तर जनतेच्या दृष्टिकोनातही बदल दिसून आला. त्यांचा प्रचार संघ आणि समर्थकांनी अशा प्रकारे प्रचार केला की ट्रम्प हे एक मजबूत नेते आहेत, मात्र बहुचर्चित ‘डीप स्टेट’ त्यांना मारायचा प्रयत्न करत असल्याचा प्रचार करण्यात आला.

पण याचदरम्यान कमला हॅरिस अनेक मुद्द्यांवर गोंधळलेल्या दिसल्या. बेकायदेशीर इमिग्रेशनसारख्या मुद्द्यांवर ट्रम्प यांच्या आक्रमकतेचा मुकाबला करण्यात त्या अपयशी ठरल्या. त्याशिवाय गाझा युद्धाबाबत त्यांनी इस्रायलविरुद्ध मोजके आणि काहीसे कठोर शब्द वापरताना दिसली, ज्यामुळे त्यांची प्रतिमा आणखी खराब झाली. कमला हॅरिस, या निर्भीडपणासाठी, ठामपणे मुद्दे मांडण्यासाठी प्रसिद्ध आहेत मात्र या मुद्यांवर त्या काहीशा बॅकफूटवर दिसल्या. याच कारणांमुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांची बाजी पलटताना दिसली. असे अनेक मुद्द आहेत, ज्यामुळे या निवडणुकीच्या शर्यतीत ट्रम्प यांना पुढे जाण्यास मदत झाली.

सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.