US Election 2020 Live Update: अमेरिकेत निकालापूर्वी हिंसाचाराच्या घटना, हजारो आंदोलक रस्त्यांवर
अमेरिकेतील रस्त्यांवर हजारो प्रदर्शनकर्ते उतरले असून काही ठिकाणी हिंसा झाल्याची माहिती आहे. (US election result 2020 protest violence in different cites across the America)
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु अजूनही सुरु आहे. मतमोजणीमध्ये सुरुवातीला जो बायडन यांनी मोठी आघाडी घेत ते विजयाच्या जवळ पोहोचले आहेत. आतापर्यंतच्या माहितीनुसार जो बायडन यांना 264 इलेक्ट्रोल वोट्स मिळाले तर डोनाल्ड ट्रम्प यांना 214 वोट्स मिळाले आहेत. मात्र, अमेरिकेतील रस्त्यांवर हजारो प्रदर्शनकर्ते उतरले असून काही ठिकाणी हिंसा झाल्याची माहिती आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर मतमोजणी दरम्यान हिंसाचाराच्या घटना होऊ शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. (US election result 2020 protest violence in different cites across the America)
अमेरिकेच्या विविध भागात रस्त्यांवर हजारो प्रदर्शनकर्ते उतरले आहेत. प्रत्येक मताची मोजणी झाली पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे. बहुतांश प्रदर्शनकर्ते जो बायडन समर्थक आहेत. अमेरिकेतील काही ठिकाणी हिंसा झाल्यांनतर अनेकांना अटक करण्यात आली आहे.
पोर्टलँड, ओरिलँड, फिलाडेल्फियास, शिकागो आणि न्यूयॉर्कमध्ये प्रदर्शने सुरु आहेत. प्रत्येक मताची मोजणी झाली पाहिजे ही त्यांची प्रमुख मागणी असून त्यासोबत इतर मुद्यांवर आंदोलनाला सुरुवात झाली आहे. न्यूयॉर्कमधील मॅनहॅटनमध्ये पोलिसांनी 20 जणांना अटक केली आहे. प्रदर्शनादरम्यान आग लावणे, कचरा आणि अंडी फेकणे असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.
मंगळवारी रात्री अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान व्हाईट हाऊस परिसरात हजारांपेक्षा जास्त आंदोलक जमले होते. आंदोलनादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात होती. आंदोलनादरम्यान वॉशिंग्टनमधील रस्त्यांवरुन मार्च काढून वाहूतक रोखण्यात आली.
जो बायडन आघाडीवर
जो बायडन यांना विजयासाठी 6 मतांची गरज असून ते नेवादामधून आघाडीवर असून या राज्यात 6 इलेक्ट्रोल वोटस आहेत. ही आघाडी कायम राखत नेवादा राज्यात बायडन यांनी विजय मिळवल्यास ते अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात.
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे 214 इलेक्ट्रोल वोटस असून ते पेन्सिल्वेनिया, जॉर्जिया आणि नॉर्थ कॅरोलिनामधून आघाडीवर आहेत. जॉर्जियामध्ये जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या काटें की टक्कर पाहायला मिळत आहे.
दरम्यान, राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडूण येण्यसाठी अमेरिकेत 270 इलेक्ट्रोल वोटसची गरज असते. जो बायडन यांच्याकडे 264 इलेक्ट्रोल वोटस तर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे 214 मतं आहेत. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण होणार याचा निकाल पेन्सिल्वेनिया, जॉर्जिया, नॉर्थ कॅरोलिना आणि नेवादा या राज्यांवर अवलंबून आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जॉर्जियामधील मतमोजणी थांबवण्याची मागणी केली आहे.
संबंधित बातम्या :
(US election result 2020 protest violence in different cites across the America)