US Election Result 2024 : डोनाल्ड ट्रम्प की कमला हॅरिस ? 40 वर्षांत ज्याची भविष्यवाणी कधीच चुकली नाही, त्याने सांगितलं विजेत्याचं नाव…
US Election Result 2024 : अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. त्याची मतमोजणी सुरु आहे. मतमोजणीचे कल वेगाने बदलत आहेत. इलेक्टोरल कॉलेजध्ये डोनाल्ड ट्रम्प हे 198 जागांवर आघाडीवर आहेत, तर कमला हॅरिस या नर्वस 99 वर अडकल्या आहेत.
अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं असून आता मतमोजणीला सुरूवात होऊन सुरूवातीच कल हाती येऊ लागले आहे. रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प ही निवडणूक जिंकून दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनणार की डेमोक्रॅट पक्षाच्या कमला हॅरिस नवा इतिहास रचत अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. पुढल्या चार वर्षांसाठी अमेरिकेची कमान कोणाच्या हातात सोपवली जाणार याचा निकाल थोड्याच वेळात लागणार आहे. दोघांपैकी कोण जिंकणार याच कयास मतदारांकडून सतत लावला जात आहे. आता याच दरम्यान एका मोठ्या भविष्यवाणीमुळे माजी राष्ट्रपती ट्रंप यांना मोठा धक्का बसला आहे.
या निवडणुकीत ट्रम्प यांना कमला हॅरिसकडून पराभवाला सामोरे जावे लागू शकते, असा अंदाज अमेरिकन लेखक आणि राजकीय अंदाजकार ॲलन लिक्टमॅन यांनी व्यक्त केला आहे. लिक्टमॅन यांना अमेरिकेचे नॉस्ट्रॅडॅमस म्हटलं जातं. ते गेल्या अनेक दशकांपासून निवडणुकीच्या निकालाबद्दल अंदाज व्यक्त करतात. आत्तापर्यंत त्यांची भविष्यवाणी कधीच चुकीची ठरलेली नाही.
एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीशी बोलताना लिक्टमॅन यांनी अमेरिकेतील निवडणुकीसंदर्भात भाष्य केलं. कमला हॅरिस या आघाडी मिळवत ट्रम्प यांच्या पुढे जातील अशी भविष्यावाणी त्यांनी यावेळी बोलताना केली. ‘ सगळ्या ओपनियन पोल्सना आग लावायला पाहिजे. मी म्हणतोय, की आपल्याकडे कमला हॅरिसच जिंकतील. त्या देशातील पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनतील ‘ असा विश्वास लॅक्टमन यांनी व्यक्त केला.
आत्तापर्यंतचे कल काय ?
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. त्याची मतमोजणी सुरु आहे. मतमोजणीचे कल वेगाने बदलत आहेत. इलेक्टोरल कॉलेजध्ये डोनाल्ड ट्रम्प हे 198 जागांवर आघाडीवर आहेत, तर कमला हॅरिस या नर्वस 99 वर अडकल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टीच चिन्ह हत्ती वेगाने पळतोय, तेच कमला हॅरिस यांच्या डेमोक्रॅटिक पार्टीची निशाणी गाढवाची चाल मात्र मंदावली आहे.
स्विंग स्टेटसपैकी पेंसिल्वेनियामध्ये कमला हॅरिस यांनी विजय मिळवला आहे. CNN च्या सर्वेनुसार इथल्या मतदारांनी अबॉर्शन नीती अंतर्गत कमला हॅरिस यांचं समर्थन केलं आहे.