US Elections 2020 : अमेरिकेत दोन्ही पक्षांच्या सारख्याच जागा निवडून आल्यास काय? ‘या’ पद्धतीने राष्ट्राध्यक्ष निवड होणार
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनेक वळणं येताना दिसत आहेत. या निवडणुकीत कोण निवडून येणार याकडे जगाचं लक्ष लागलेलं असताना अमेरिकेत मात्र अनिश्तिततेचं वातावरण आहे. सध्या मतमोजणीत डेमॉक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन आघाडीवर आहेत. मात्र, असं असतानाही डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण जिंकल्याची घोषणा केलीय. यावर डेमॉक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी मतमोजणी थांबवण्याचा प्रयत्न झाल्यास […]
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनेक वळणं येताना दिसत आहेत. या निवडणुकीत कोण निवडून येणार याकडे जगाचं लक्ष लागलेलं असताना अमेरिकेत मात्र अनिश्तिततेचं वातावरण आहे. सध्या मतमोजणीत डेमॉक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन आघाडीवर आहेत. मात्र, असं असतानाही डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण जिंकल्याची घोषणा केलीय. यावर डेमॉक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी मतमोजणी थांबवण्याचा प्रयत्न झाल्यास कोर्टात जाण्याचा इशारा दिलाय. त्यामुळे हा निकाल पेचात अडकण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या निकालात ट्रम्प आणि बायडन यांचे सारखेच इलेक्टर निवडून आल्यास मोठी अडचण होणार आहे. अशा स्थितीत अमेरिकेत एका विशिष्ट पद्धतीने राष्ट्राध्यक्षांची निवड होणार आहे (US elections 2020 result Donald Trump Vs Joe Biden when will result come tie supreme court).
सध्या सुरुवातीच्या मतमोजणीत जो बायडन आघाडीवर असले तरी अंतिम निर्णय बाकी आहे. बायडन आणि ट्रम्प यांच्या कडवी झुंज होत असून बायडन यांची आघाडी कायम राहणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही राज्यांमध्ये ट्रम्प यांचा रिपब्लिक पक्ष आघाडीवर आहे, तर काही राज्यांमध्ये बायडन यांचा डेमॉक्रेटिक पक्ष आघाडीवर आहे. अशात ही निवडणूक टाय होण्याची म्हणजेच बरोबरीत अडकण्याची शक्यता आहे. या शक्यतेनुसार दोन्ही उमेदवारांना 269-269 असे इलेक्टोरल मतं मिळाल्यास मोठा राजकीय पेच तयार होणार आहे.
दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना सारखेच इलेक्टोरल मतं मिळाल्यास यावरही अमेरिकेत पर्याय आहे. यावेळी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह सर्वात आधी उपराष्ट्रपतींची निवड करते. त्यानंतर पुन्हा मतदान होऊन पूर्ण सिनेट शेवटी राष्ट्राध्यक्षांची निवड करते. मात्र, ही प्रक्रिया खूप वेळखाऊ आणि दीर्घ असल्याने अशा स्थितीत हा निकाल येण्यास डिसेंबर महिना उजाडण्याची शक्यता आहे.
अमेरिकेत मतदानातून इलेक्टर्स निवडले जातात, ते पुढे राष्ट्राध्यक्षाची निवड करतात. 14 डिसेंबरला अमेरिकेच्या सिनेटचं मतदान होईल. या ठिकाणी 538 नवनियुक्त इलेक्टर्स नव्या राष्ट्राध्यक्षांची निवड करतील. यात बहुमतासाठी 270 इलेक्टर्सची मतं आवश्यक आहेत.
दोन्हीपैकी एका उमेदवाराने निकाल अमान्य केल्यास अंतिम निकाल सिनेट किंवा न्यायालय करणार
ट्रम्प यांच्या एकूणच आक्रमक भूमिकेवरुन मतमोजणीत पराभव झाल्यास डोनाल्ड ट्रम्प हा निकालच अमान्य करण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील नियमांनुसार दोन्ही पैकी एका उमेदवाराने जरी निकाल अमान्य केला, तरी निवडणुकीतील जय पराजयाचा निकाल सिनेट किंवा न्यायालय करते. अमेरिकेच्या इतिहासात अशी स्थिती कधीही आलेली नाही, यावेळी असं झाल्यास पहिल्यांदाच राजकीय संकटावरील वेगळे पर्याय अवलंबले जाणार आहेत.
संबंधित बातम्या :
US Election 2020 : व्हाईट हाऊसजवळ आंदोलकांची गर्दी, ट्रम्प यांना जोरदार विरोध
US Election 2020 : ट्रम्प आणि बायडन यांचं भवितव्य ‘या’ 12 राज्यांच्या हातात
संबंधित व्हिडीओ :
US elections 2020 result Donald Trump Vs Joe Biden when will result come tie supreme court