Independence Day: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी अमेरिकाही भारतासोबत;महात्मा गांधींच्या तत्वांचा बिडेननी केला गौरव
युनायटेड स्टेट्समधील भारतीय,अमेरिकन समुदायामुळे, या सर्वांमुळे राष्ट्र अधिक नाविन्यपूर्ण, सर्वसमावेशक आणि मजबूत बनले असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. अमेरिका-भारत सहसंबंधाबद्दल विश्वास व्यक्त करताना जो बिडेन यांनी सांगितले की, दोन्ही देश नियम- कायद्याच्या आदेशाचे संरक्षण करण्यासाठी एकत्र काम करतील.
वॉशिंग्टन: आज भारतभर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव (Azadi ka Amrit Mohostav) साजरा होत असतानाच जगभरातूनही या भारतावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन (US President Joe Biden) यांनीही भारताला 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय आणि अमेरिकन नागरिकांकडून त्यांनी शुभेच्छा व्यक्त करताना ते म्हणाले की भारतातीलही आणि अमेरिकेतीलही नागरिकांनी आपापल्या देशाला अधिक नाविन्यपूर्ण, सर्वसमावेशक आणि मजबूत राष्ट्र बनवण्यात आले आहे, आणि त्यासाठी प्रयत्नही केले जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. भारताच्या स्वातंत्र्यादिनानिमित्त (Independence Day) ज्याप्रमाणे जगभरातील सुमारे 40 लाख भारतीय आणि अमेरिकन नागरिक 15 ऑगस्ट रोजी भारताच्या स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन साजरा करत आहेत. त्यामुळे युनायटेड स्टेट्स भारताच्या लोकशाही प्रधान देशाच्या प्रवासाचा गौरव करण्यासाठी भारतीय नागरिकांसोबत आम्ही आहोत असंही त्यांनी म्हटले आहे.
महात्मा गांधींच्या सत्य, अहिंसा या तत्त्वावर आणि त्यांनी दिलेल्या मार्गावरुन वाटचाल सुरू असल्याचेही बिडेन यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
राजकीय संबंधांचाही 75 वा वर्धापन दिन
यावर्षी भारत आणि अमेरिका ही दोन्ही राष्ट्रं राजकीय संबंधांचाही 75 वा वर्धापन दिन साजरा करत आहेत. भारत-अमेरिका अपरिहार्य भागीदार असल्याचे सांगत असताना त्यांनी ते म्हणाले की, त्यांची धोरणात्मक भागीदारी, कायद्या सुव्यवस्था आणि मानवी स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठेच्या संवर्धनासाठी आपण वचनबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
दोन्ही देशांकडून कायद्याचे संरक्षण
आपल्या देशातील नागरिकांसोबत असलेल्या सहसंबंधामुळे दोन्ही देशातील भागीदारी आणखी मजबूत झाली आहे. युनायटेड स्टेट्समधील भारतीय,अमेरिकन समुदायामुळे, या सर्वांमुळे राष्ट्र अधिक नाविन्यपूर्ण, सर्वसमावेशक आणि मजबूत बनले असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. अमेरिका-भारत सहसंबंधाबद्दल विश्वास व्यक्त करताना जो बिडेन यांनी सांगितले की, दोन्ही देश नियम- कायद्याच्या आदेशाचे संरक्षण करण्यासाठी एकत्र काम करतील. आपल्या नागरिकांसाठी शांतता, समृद्धी आणि सुरक्षितता वाढवी म्हणून आम्ही एक मुक्त आणि मुक्त इंडो-पॅसिफिक ही भावना घेऊन जगासमोरील आव्हानांनाही तोंड देऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सर्व भारतीयाना शुभेच्छा
दरम्यान, परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनीही 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशामध्ये म्हटले आहे की, 75 वर्षांचे हे राजकीय सहसंबंध “अर्थपूर्ण” असल्याचे त्यांनी सांगितले. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्यावतीने, मी भारतीय नागरिकांना 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना सर्व भारतीयाना शुभेच्छा देत आहोत. या महत्त्वाच्या दिवशी, भारतीयांनी ज्या लोकशाही मुल्यांचे जतन केले आहे, त्याबद्दल आम्ही भारतातीय नागरिकांचा गौरव करतो. या लोकशाहीमुळेच भारत आपले उज्ज्वल भविष्य घडवत असल्याचेही त्यांनी सांगितले.