उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग यांना तयार करण्यासाठी ट्रम्प यांच्याकडून जोरदार प्रयत्न

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्‍ड ट्रम्प (US President Donald Trump) यांनी आपला कार्यकाळ संपताना जाता जाता पुन्हा एकदा उत्तर कोरियाचे (North Korea) हुकुमशाह किम जोंग उन यांच्याकडे मैत्रीचा हात केला आहे.

उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग यांना तयार करण्यासाठी ट्रम्प यांच्याकडून जोरदार प्रयत्न
Follow us
| Updated on: Dec 10, 2020 | 8:34 PM

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्‍ड ट्रम्प (US President Donald Trump) यांनी आपला कार्यकाळ संपताना जाता जाता पुन्हा एकदा उत्तर कोरियाचे (North Korea) हुकुमशाह किम जोंग उन यांच्याकडे मैत्रीचा हात केला आहे. ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळात किम जोंग (Kim Jong Un) यांची दोनदा भेट घेत दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, मागील काही दिवसांमध्ये दोन्ही देशांमधील नवी सुरुवात पुन्हा एकदा रेंगाळल्याचं दिसत आहे. आता ट्रम्प यांनी आपल्या प्रशासनाला पुन्हा एकदा किम जोंग यांना संबंध सुधारण्यासाठी तयार करण्याची जबाबदारी दिलीय. अमेरिकेचे उप परराष्ट्र मंत्री स्‍टीफन बीगन (Stephen Biegun) यांनी नुकतंच अमेरिका उत्तर कोरियासोबतचे संबंध सुधारू इच्छितो असं म्हटलं आहे (US president Donald Trump administration trying to talk again with North Korea Kim Jong Un) .

नुकतेच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री दक्षिण कोरियाला (South Korea) गेले होते. सियोलमधील (Seoul) आपल्या एका भाषणात ते म्हणाले होते की जो बायडन यांच्या कार्यकाळातही भविष्यात उत्तर कोरियासोबतचे संबंध सुधारण्यावर भर दिला जाईल. जुन्या शत्रूंमध्ये पुन्हा एकदा मैत्री होऊ शकते, अशीही आशा त्यांनी व्यक्त केली. असं असलं तरी त्यांनी हेही मान्य केलं की मागील काळात बरेच प्रयत्न केल्यानंतरही दोन्ही देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यास यश आलेलं नाही.

प्रयत्न करुनही संबंध न सुधारल्याने अमेरिका नाराज

एशियन इंस्‍टीट्यूट रिसर्च सेंटरमध्ये बोलताना स्टीफन बीगन म्हणाले होते, “दोन वर्षे प्रयत्न करुनही दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यात आणि मैत्री करण्यात अपयश आल्याने मी दुःखी आहे की नाही असा तुम्ही विचार करत असाल. हो, मी निराश आहे. आमचे उत्तर कोरियातील सहकारी मागील 2 वर्षांपासून चर्चेत आडकाठी आणण्याचाच प्रयत्न करत आहेत याचं खूप दुःख आहे. ते चर्चा करणं कठीण कसं होईल यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत असतात.”

दोन्ही देशांकडून संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न व्हावेत

बीगन यांनी नुकताच उत्तर कोरियाचा 4 दिवसीय दौरा केला. पुढील महिन्यात आपल्या परराष्ट्र मंत्रिपदाचा कार्यकाळ संपणाऱ्या बीगन यांनी किम जोंग उन यांच्यासमोर पुन्हा एकदा चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे. ते म्हणाले, “आम्ही केवळ उत्तर कोरियाकडूनच प्रतिसादाची वाट पाहत नाही. सर्व काही उत्तर कोरियानेच करावं असं आम्हाला वाटत नाही. आम्ही देखील पुढाकार घेण्यास तयार आहोत. दोन्ही देशांना संबंध सुधारण्यासाठी एक आराखडा तयार करावा लागेल आणि हे संबंध पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.”

हेही वाचा :

जग कोव्हिड वॅक्सिनची वाट बघतंय, किम जोंगचे सहकुटुंब लसीकरण झाल्याची चर्चा

किम जोंगनं कोरोनाच्या भीतीनं चीनसोबतची मैत्री तोडली, चीनसोबतच्या व्यापारात मोठ्या प्रमाणावर घट

अमेरिकेने गायब केल्याचा आरोप, हुकूमशाह किम जोंगचा पुतण्या हान सोल कोण आहे?

US president Donald Trump administration trying to talk again with North Korea Kim Jong Un

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.