Donald Trump | डोनाल्ड ट्रम्प यांच्या डान्सचा व्हिडीओ वायरल, आपण पाहिला का?
ट्रम्प डान्स करत असेलला व्हिडीओ फ्लोरिडा राज्यातील त्यांच्या एका सभेतील आहे. डोनाल्ड ट्रम्प डान्स करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. Donald Trump Viral Dance
नवी दिल्ली : अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला महिन्यापेक्षा कमी वेळ राहिला असताना डोनाल्ड ट्रम्प पुन्हा चर्चेत आले आहेत. कोरोना विषाणूवरील वक्तव्ये, मास्क न घालणे, चीनला धमकी, विरोधकांवर टीका या कारणांमुळं ट्रम्प चर्चेत होते. यावेळी ते चर्चेत आलेत त्याचं कारण वेगळे आहे. डोनाल्ड ट्रम्प एका सभेत डान्स करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे. (US President Donald Trump dance viral on social media)
Donald Trump dances almost as bad as he Presidents.
— Mrs. Krassenstein (@HKrassenstein) October 14, 2020
विलेज पीपलच्या YMCA या प्रसिद्ध गाण्यावर डोनाल्ड ट्रम्प डान्स करताना व्हिडीओत पाहायला मिळतात. ट्रम्प यांचा हा डान्स पाहिल्यानंतर अनेकांना त्यांचे हसू रोखता आले नाही. ट्रम्प डान्स करत असेलला व्हिडीओ फ्लोरिडा राज्यातील त्यांच्या एका सभेतील आहे.
Donald Trump dancing ? ?
How can I unsee this?? ?pic.twitter.com/QQmI2r6Llh
— ✊? ALL BLACK LIVES MATTER ✊? (@flywithkamala) October 13, 2020
फ्लोरिडा येथील सभेत ट्रम्प यांनी कोरोनामुक्त झाल्याचं सांगितलं. कोरोनातून बरं झाल्यामुळं आता लोकांची भेट घेऊ शकतो. प्रेक्षक आणि महिलांच्या सोबत डान्स देखील करु शकत असल्याचे ट्रम्प यांनी सभेत सांगितले होते.
सोशल मीडियावर ट्रम्प यांच्या डान्सवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. नेटिझन्सनी ट्रम्प यांच्या डान्सची चेष्टा केली तर काही जणांनी ते काळजी घेत नसल्याची टीका केली आहे. #TrumpGraveDancer हा ट्रेंड सुरू असून लोक याद्वारे ट्रम्प यांच्यावर निशाणा साधताना पाहायला मिळतात. अमेरिकेत कोरोनामुळं मोठ्या संख्येने मृत्यू होऊनही ट्रम्प आनंदाने डान्स करतात यावरुन टीका करण्यात आली आहे. ट्रम्प हे बेजबाबदार राष्ट्राध्यक्ष असल्याची टीका काही वापरकर्त्यांनी केली.
दरम्यान, ट्रम्प आणि बायडन यांच्यामध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी लढत होणारआहे.
संबंधित बातम्या:
चीनला कोरोना महामारीची मोठी किंमत मोजावी लागेल; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
(US President Donald Trump dance viral on social media)