‘नरेंद्र मोदी ग्रेट!’ डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा बदलली, भारताने निर्यातबंदी उठवताच नरमाई

डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी भारत सरकारने उचललेल्या पावलांचेही कौतुक केले आहे. (Donald Trump praises Narendra Modi)

'नरेंद्र मोदी ग्रेट!' डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा बदलली, भारताने निर्यातबंदी उठवताच नरमाई
Follow us
| Updated on: Apr 08, 2020 | 12:10 PM

वॉशिंग्टन : ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’ औषधाच्या पुरवठ्यावरुन प्रत्युत्तर देण्याचा इशारा देणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा अवघ्या 24 तासात बदलली. मोदी सरकारच्या भूमिकेचे समर्थन करत ‘नरेंद्र मोदी ग्रेट’ असल्याचे उद्गार ट्रम्प यांनी काढले. ‘फॉक्स न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी भारत सरकारने उचललेल्या पावलांचेही कौतुक केले आहे. (Donald Trump praises Narendra Modi)

‘मी लाखो डोस विकत घेतले. जवळपास तीन कोटी (29 मिलिअन). मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोललो, बर्‍याच गोष्टी भारतातूनच येतात. मी त्यांना विचारले की हायड्रॉक्सीक्लोरोक्विन पुरवाल का? ते महान आहेत. खरोखर चांगले आहेत. तुम्हाला माहित असेल, भारताला आवश्यकता असल्यामुळे त्यांनी निर्यंत थांबवली होती. पण त्यातून बर्‍याच चांगल्या गोष्टी घडत आहेत. आम्ही लस तयार करत आहोत. ‘जॉन्सन एंड जॉन्सन’ला याची चाचणी घेण्याची गरज आहे. असं वाटतं, मलेरियाचा प्रादुर्भाव अधिक असलेल्या देशांना कमी फटका बसला आहे’ असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

हेही वाचा‘WHO’ला चीनचा पुळका, तुमचा निधीच रोखतो, डोनाल्ड ट्रम्प यांची अरेरावी

‘कोरोना व्हायरस’च्या रुग्णांवरील उपचारांमध्ये वापरले जाणारे मलेरियावरील औषध ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’च्या निर्यातीवरील बंदी भारताने उठवली नाही, तर प्रत्युत्तर देण्याचा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी काल दिला होता. गेल्याच महिन्यात भारत भेटीवर आलेली ट्रम्प यांनी सूडाची भाषा केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होतं.

‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा पुरवठा चालू ठेवला तर मी कौतुकच करेन. पण पुरवठा थांबला तर तुम्ही म्हणताय तसे प्रत्युत्तर द्यावे लागेल. आणि प्रत्युत्तर तरी का देऊ नये?’ असा सवाल ट्रम्प यांनी उपस्थित केला होता.

(Donald Trump praises Narendra Modi)

‘कोरोना’बाधित अमेरिकेसह शेजारी देशांना माणुसकीच्या नात्याने पॅरासिटामॉल आणि हायड्रॉक्सीक्लोरोक्विन पुरवणार असल्याचं भारताने काल संध्याकाळी जाहीर केलं.

हायड्रॉक्सीक्लोरोक्विन काय आहे?

हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे मूळ मलेरियावरील औषध आहे. मलेरियाच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी या गोळया दिल्या जातात. पण सध्या कोरोना व्हायरसवरील उपचारात हे औषध अत्यंत प्रभावी ठरत आहे. भारतात मोठया प्रमाणावर या औषधाची निर्मिती केली जाते. कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अमेरिकेला तातडीने या औषधांची गरज आहे. मागच्या महिन्यात भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या औषधाच्या निर्यातीवर बंदी घातली होती.

अमेरिकेत काल एकाच दिवशी जवळपास 2 हजार कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. एका दिवसात 1 हजार 934 ‘कोरोना’ग्रस्तांचा मृत्यू झाला असून एका दिवसातल्या सर्वाधिक बळींची नोंद झाली. अमेरिकेत काल 28 हजार 735 नवे ‘कोरोना’ रुग्ण आढळले असून कोरोनाबाधितांचा आकडा 4 लाखांच्या जवळ गेला आहे. (Donald Trump praises Narendra Modi)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.