अमेरिकेत स्थलांतरबंदी, नागरिकांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी डोनाल्ड यांचे ‘ट्रम्प’ कार्ड
'कोरोना व्हायरस'मुळे झालेल्या आर्थिक नुकसानाशी अमेरिका झुंजत असल्याने परदेशातील स्थलांतरावर बंदी आणण्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा होरा आहे. (Donald Trump to temporarily suspend immigration into US)
न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थलांतराला तात्पुरती स्थगिती देण्याचे संकेत दिले आहेत. अमेरिकेत कायमस्वरुपी वास्तव्य करण्यासाठी परदेशातून होणारे स्थलांतर तूर्तास थांबवण्याच्या आदेशावर स्वाक्षरी करणार असल्याचं ट्रम्प सोमवारी रात्री म्हणाले. ‘कोरोना’ संकटकाळात अमेरिकन नागरिकांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. (Donald Trump to temporarily suspend immigration into US)
‘कोरोना व्हायरस’ साथीच्या आजारामुळे झालेल्या आरोग्य आणि आर्थिक नुकसानाशी अमेरिका झुंजत असल्याने अमेरिकेत स्थलांतरावर पूर्णपणे बंदी आणण्याचा ट्रम्प यांचा होरा आहे. नुकतंच भारताने अमेरिकेला ‘कोरोना’वरील उपचारात सध्या महत्त्वाचे ठरणारे हायड्रॉक्सीक्लोरोक्विन पुरवून मदतीचा हात दिला आहे. अशात परदेशातून स्थलांतराला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय भारतातून अमेरिकेत जाण्याचे नियोजन करणाऱ्या होतकरूंना धक्कादायक आहे.
‘अदृश्य शत्रूकडून झालेला हल्ला आणि आमच्या अमेरिकन नागरिकांच्या नोकऱ्या टिकवण्याची गरज लक्षात घेता मी अमेरिकेत कायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून होणारे स्थलांतर तात्पुरते स्थगित करण्यासाठी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करणार आहे’ असे ट्वीट डोनाल्ड ट्रम्प यांनी केले.
In light of the attack from the Invisible Enemy, as well as the need to protect the jobs of our GREAT American Citizens, I will be signing an Executive Order to temporarily suspend immigration into the United States!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) April 21, 2020
(Donald Trump to temporarily suspend immigration into US)
परदेशातून होणारे कायमस्वरुपी स्थलांतर रोखण्यासाठी अमेरिका कोणती यंत्रणा वापरणार, ही स्थगिती किती काळ टिकणार किंवा सद्य ग्रीन कार्डधारकांवर याचे काय परिणाम होणार, हे अद्याप अस्पष्ट आहे.
हेही वाचा : उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उनची प्रकृती चिंताजनक, अमेरिकन वृत्तपत्रांचा दावा
अमेरिकेत निर्वासितांचे पुनर्वसन सध्या थांबले आहे, व्हिसा कार्यालये बंद आहेत, नागरिकत्व प्रदान समारंभही सध्या होत नाहीत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर परदेशातून येणे प्रतिबंधित करण्यासाठी काय करायचे आहे याविषयी ट्रम्प यांनी सोमवारी तपशील दिले नाही.
संबंधित बातम्या :
‘नरेंद्र मोदी ग्रेट!’ डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा बदलली, भारताने निर्यातबंदी उठवताच नरमाई
‘कोरोना’बाबत लपवाछपवी, चीनला गंभीर परिणाम भोगावे लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
आधी इशारा, आता आदेश, ‘WHO’च्या निधीला डोनाल्ड ट्रम्प यांची स्थगिती
(Donald Trump to temporarily suspend immigration into US)