‘WHO’ला चीनचा पुळका, तुमचा निधीच रोखतो, डोनाल्ड ट्रम्प यांची अरेरावी

'जागतिक आरोग्य संघटना' हा चीनबद्दल खूप पक्षपाती असल्याचे दिसते. हे बरोबर नाही. 'WHO' खूपच चीन केंद्रित आहे', असा आरोपही डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. (Donald Trump put hold on WHO Fund)

'WHO'ला चीनचा पुळका, तुमचा निधीच रोखतो, डोनाल्ड ट्रम्प यांची अरेरावी
Follow us
| Updated on: Apr 08, 2020 | 9:57 AM

वॉशिंग्टन : ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’च्या निर्यातीवरुन भारतावर ‘दादागिरी’ करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटना अर्थात ‘WHO’वर अरेरावी केली आहे. ‘कोरोना’ साथीच्या प्रादुर्भावाच्या काळात ‘WHO’ला चीनचा खूपच पुळका येत असल्याचं सांगत ट्रम्प यांनी थेट निधी रोखण्याचा इशारा दिला आहे. (Donald Trump put hold on WHO Fund)

संयुक्त राष्ट्रसंघाची आरोग्य संघटना असलेल्या ‘WHO’ ला अमेरिकेकडून सर्वाधिक निधी पुरवला जातो. मात्र या निधीवर वचक ठेवण्याचा इशारा ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. किती पैसे रोखले जातील, याविषयी त्यांनी काही माहिती दिली नाही. “मी ते करणार आहे, असे मी म्हणत नाही” असं सूचक वक्तव्य ट्रम्प यांनी काही मिनिटांनंतर केलं.

‘जागतिक आरोग्य संघटना’ हा चीनबद्दल खूप पक्षपाती असल्याचे दिसते. हे बरोबर नाही. ‘WHO’ खूपच चीन केंद्रित आहे’, असा आरोपही डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.

चीनमधून ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग सुरु झाल्याने तिथून येणारी हवाई वाहतूक कमी करण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला होता. परंतु ‘WHO’ ने त्याला विरोध दर्शवला होता. याच मुद्द्यावरुन ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेने आपल्याला अशी चुकीची शिफारस का केली? असा सवालही विचारला. सुदैवाने चीनसाठी आमच्या सीमा खुल्या ठेवण्याचा त्यांचा सल्ला मी वेळीच नाकारला, असंही पुढे ते म्हणाले. (Donald Trump put hold on WHO Fund)

वॉशिंग्टनमध्ये, विशेषत: रिपब्लिकन पक्षामधून ‘कोरोना’च्या मुद्द्यावरुन चीनला टीकेचा सामना करावा लागला आहे. चीनने कोरोना रुग्ण आणि मृत्यूबद्दल दिलेल्या आकडेवारीच्या अचूकतेबद्दलही ट्रम्प यांनी शंका व्यक्त केली.

हेही वाचा‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’च्या निर्यातीवरील बंदी उठवली नाही तर प्रत्युत्तर देऊ, ट्रम्प यांचा भारताला इशारा

स्वत: ट्रम्प यांनी ‘कोरोना’ची तुलना सामान्य फ्लूशी करत अमेरिकेमध्ये ‘कोरोना’ नियंत्रणात असल्याचा दावा केला होता. त्यानंतर त्यांना टीकेचं धनी व्हावं लागलं होतं. अखेर त्यांच्यावर राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्याची वेळ आली. (Donald Trump put hold on WHO Fund)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.