खूप श्रीमंत आहेत डोनाल्ड ट्रम्प तरी मुकेश अंबानी यांच्यापेक्षा कमीच? भारतात कितवा क्रमांक असता ?

डेमोक्रेटिक पार्टीच्या उमेदवार कमला हॅरिस यांना हरवून ट्रम्प अखेर दुसऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीत जिंकले आहेत. त्यांच्याकडे नेमकी किती संपत्ती आहे हे पाहूयात....

खूप श्रीमंत आहेत डोनाल्ड ट्रम्प तरी मुकेश अंबानी यांच्यापेक्षा कमीच? भारतात कितवा क्रमांक असता ?
Donald Trump And Mukesh Ambani
Follow us
| Updated on: Nov 06, 2024 | 6:52 PM

जगाचे लक्ष लागलेली अमेरिकेची अध्यक्षपदाची निवडणूक संपली आहे. अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला आहे. तर भारतीय वंशाच्या डेमोक्रेटिक पार्टीच्या कमला हॅरिस यांना ट्रम्प यांनी सहज हरवले आहे. ट्रम्प हे रियल इस्टेटचे व्यावसायिक असून त्यांची संपत्त 6.49 अब्ज डॉलर नोंदली गेली आहे. इतक्या संपत्तीचे मालक असूनही त्यांचा क्रमांक आपल्या येथील अंबानी आण अदानी यांच्या नंतर लागतोय….

ट्रम्प यांच्या कमाईचे मार्ग काय ?

डोनाल्ड ट्रम्प यांचे कमाईचे अनेक स्रोत आहे. ट्रम्प यांची बहुतांश संपत्ती त्यांना रियल इस्टेटमधून मिळालेली आहे. ज्यात ट्रम्प टॉवर आणि 1290 एव्हेन्यू ऑफ द अमेरिका मध्ये भागीदारी याचा समावेश आहे. तसेच ट्रम्प मिडिया एण्ड टेक्नॉलॉजी ग्रुपचाही हिस्सा आहेत. ट्रम्प मिडिया एण्ड टेक्नॉलॉजीच्या शेअरच्या किंमती मोठा बदल पाहायला मिळत आहे. तसेच ट्रम्प यांनी डिडिटल संपत्तीतून पैसे कमावले आहेत. साल 2023 मध्ये त्यांनी NFT मधून 7.2 दशलक्ष डॉलर कमावले होते. ते आपल्या नावाचे लायसन्स देऊन देखील कमाई करतात.

भारतात काय स्थान ?

ट्रम्प यांच्याकडे इतकी प्रचंड माया असून भारतीय अब्जाधीशांपुढे त्यांची डाळ शिजणार नाही. भारतीय अब्जाधीशांच्या यादीत त्यांचा क्रमांक खूपच खाली जाऊ शकतो. ट्रम्प यांच्याकडे 6.49 अब्ज डॉलरची संपत्ती असूनही ट्रम्प भारतीय श्रीमंतांच्या यादीत चक्क 46 व्या स्थानावर येतात. फोर्ब्ज इंडियाच्या 100 श्रीमंतांच्या यादीत 119.5 अब्ज डॉलर संपत्तीमुळे मुकेश अंबानी पहिल्या क्रमांकावर आहेत. तर 116 अब्ज डॉलरच्या संपत्तीमुळे दुसऱ्या क्रमांकावर गौतम अदानी एण्ड फॅमिलीचा नंबर लागतो. बिर्ला, बजाज, हिंदूजा, कोटक, झुनझुनवाला, मुथूट सारख्या विविध अब्जाधीशांनंतर डोनाल्ड यांचा या यादीत 46 वा क्रमांक लागलो, आता बोला..काय म्हणायचं याला…

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.