US Election 2020 LIVE : विरोधकांकडून मतदान प्रक्रिया प्रभावित, ट्रम्प यांचा आरोप, ट्विटरकडून शिक्षा
निकाल प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जात आहे, निवडणुका संपल्यानंतरही मतदान कसे?' असा आरोप ट्रम्प यांनी केला होता.
2020 US election results | वॉशिंग्टन : अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालाकडे (US President Election) सर्व जगाचं लक्ष लागलं आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन (Joe Biden) आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार असलेले विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यात कांटे की टक्कर आहे. मतमोजणी सुरु असतानाच, ट्रम्प यांनी बायडन यांच्यावर मतदान प्रक्रिया प्रभावित केल्याचा आरोप ट्विटरवरुन केला, त्यानंतर ट्विटरने तात्काळ ट्रम्प यांचे ट्विट ‘फ्लॅग’ केले. (US President Election Live Update Twitter Flags Donald Trump’s Tweet Alleging Democrats Trying To Steal Election)
‘मी आज रात्री संबोधित करणार, एक मोठा विजय’ असे ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी मतमोजणी प्रक्रिया सुरु असताना केले होते. त्यानंतर ‘आम्ही निवडणुकीत अग्रेसर आहोत. निकाल प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण आम्ही हे होऊ देणार नाही. निवडणुका संपल्यानंतरही मतदान कसे?’ असा आरोप ट्रम्प यांनी ट्विटरवर केला होता.
We are up BIG, but they are trying to STEAL the Election. We will never let them do it. Votes cannot be cast after the Polls are closed!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) November 4, 2020
ट्रम्प यांच्या ट्विटची ट्विटरने तात्काळ दखल घेतली आणि ते ‘फ्लॅग’ केले. “या ट्विटमध्ये शेअर केलेला काही किंवा सर्व मजकूर वादग्रस्त आहे आणि कदाचित निवडणूक किंवा अन्य नागरी प्रक्रियेबद्दल दिशाभूल करत आहे” असा मेसेज त्या ट्विटला जोडण्यात आला. ट्रम्प यांच्या अकाऊण्टवरुन हे ट्विट हटवले, डिलीट किंवा ब्लॉक केलेले नाही. परंतु ते ट्विट पाहणाऱ्या युजर्सना सतर्कतेची सूचना दिली जाते. (US President Election Live Update)
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोपांना डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडन यांनी प्रत्युत्तर दिले “या निवडणुकीत विजयी उमेदवार घोषित करणे माझे किंवा डोनाल्ड ट्रम्प यांचे काम नाही, हा मतदारांचा हक्क आहे.” असे ट्विट बायडन यांनी केले.
It’s not my place or Donald Trump’s place to declare the winner of this election. It’s the voters’ place.
— Joe Biden (@JoeBiden) November 4, 2020
संबंधित बातम्या :
दोन विशाल राज्य गमावूनही ट्रम्पना विजय शक्य, 2016 च्या रणनीतीची पुनरावृत्ती होणार?
ट्रम्प आणि बायडन यांचं भवितव्य ‘या’ 12 राज्यांच्या हातात
ट्रम्प यांच्याशी कडवी झुंज; जाणून घ्या कोण आहेत जो बायडन?
(US President Election Live Update Twitter Flags Donald Trump’s Tweet Alleging Democrats Trying To Steal Election)