US President Joe Biden: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना कोरोनाची लागण
बायडेन यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. त्यांची कोव्हिड चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे.
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन(US President Joe Biden) यांना कोरोनाची लागण(infected with Corona) झाली आहे. व्हाईट हाऊसतर्फे एक प्रसिद्ध पत्रक सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. बायडेन यांना कोरोवनाची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. त्यांची कोव्हिड चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे. बायडेन यांनी कोरोनाच्या दोन्ही लशी घेतल्या आहेत. तरी देखील त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते नागरीकांशी झूम कॉलद्वारे संवाद साधणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगण्यात आले. खबरदारी म्हणून बायडेन यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीनी कोवीड टेस्ट करुन घ्यावी अशा सूचना देखील आरोग्य विभागातर्फे करण्यात आल्या आहेत. पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्यते वाढ होत असल्याने विशेष खबरदारी घेतली जात आहे. कोरोना टेस्टींग वाढवण्यात आल्याचेही समजते.
White House statement: President Biden tests positive for COVID-19, experiencing mild symptoms pic.twitter.com/dreBBKnTQN
— BNO News (@BNOFeed) July 21, 2022
बायडेन यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली आहेत. यामुळे ते त्यांच्या निवासस्थानीच क्वॉरंन्टाईन राहणार आहेत. मात्र, ते फोनद्वारे व्हाईट हाऊसमधील कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आहेत. ते प्रत्यक्षरित्या सर्व बैठकांमध्ये सहभागी होणार नसले तरी ते ऑनलाईन आणि झूम मिटींगच्या माध्यमातून सर्व बैठकांमध्ये सहभागी होणार असल्याचे व्हाईट हाऊलतर्फे सांगण्यात आले आहे.