Joe Biden | जो बायडन यांच्या कॅबिनेटमध्ये बराक ओबामांच्या सहकाऱ्यांना महत्वाच्या पदांवर संधी
बायडन यांच्या कॅबिनेटमध्ये बराक ओबामा यांच्या सहकाऱ्यांचे वर्चस्व पाहायला मिळणार आहे. | Joe Biden Cabinet
वॉशिंग्टन: अमेरिकेचे निर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांनी नवं सरकार बनवण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. जो बायडन नव्या सरकारचे कॅबिनेट बनवण्याचे काम करत आहेत. बायडन यांनी त्यांचे सहकारी एंटनी ब्लिकेन यांना परराष्ट्र मंत्री पदासाठी सूचित केले आहे. जेक सुलीवन यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नामनिर्देशित करण्यात आलेय. बायडन यांच्या कॅबिनेटमध्ये बराक ओबामा यांच्या सहकाऱ्यांचे वर्चस्व पाहायला मिळणार आहे. ओबामांच्या टीममधील 4 जण बायडन यांच्या टीमचे सदस्य असतील. (US President Joe Biden preparing Cabinet for his tenure)
एंटनी ब्लिकेन यांनी बराक ओबामांच्या सरकारमध्ये परराष्ट्र मंत्रालयात उपमंत्री म्हणून काम केले आहे. उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. बायडन यांच्या प्रचार अभियानाच्या परराष्ट्र धोरणाचे ब्लिकेन सदस्य होते. बायडन यांच्या उपराष्ट्रपती पदाच्या कार्यकाळात जेक सुलीवन त्यांचे सुरक्षा सल्लागार होते. हिलंरी क्लिंटन परराष्ट्र मंत्री होत्या त्यावेळी सुलीवन डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ म्हणून काम करत होते.
एवरिल एंस यांना गुप्तवार्ता विभागाची जबाबदारी
बायडन यांनी एवरिल एंस यांना राष्ट्रीय गुप्तवार्ता विभागच्या प्रमुख म्हणून नामनिर्देशित करण्यात आले आहे. गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख म्हणून संधी मिळणाऱ्या एवरिल एंस पहिल्या महिला आहेत. अमेरिकेच्या सीआयएमध्येही त्यांनी काम केले आहे. (US President Joe Biden preparing Cabinet for his tenure)
क्युबामध्ये जन्म झालेल्या वकील एलेजेंड्रो मेयकोरस यांना अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली आहे. एलजेंड्रो मेयकोरस हे लॅटिन अमेरिकी नागरिक आहेत त्यांना अंतर्गत सुरक्षा विभागाची जबाबदारी मिळणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात प्रवासी नागरिकांबद्दल नियम अधिक कठोर बनवले गेले होते. मात्र, बायडन यांच्या काळात यामध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जातीय.
पर्यावरणीय बदलांबाबत महत्वाच्या पॅरिस समझोत्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या जॉन कॅरी यांना बायडन यांनी महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या काळात अमेरिका पॅरिस समझोत्यामधून बाहेर पडल्याचे जाहीर केले होते. बायडन यांनी जॉन कॅरी यांच्यावर पर्यावरणीय बदलांबाबत महत्वाची भूमिका सोपवली आहे. (US President Joe Biden preparing Cabinet for his tenure)
लिंडा थॉमस ग्रीनफिल्ड यांना संयुक्त राष्ट्रांमधील अमेरिकेच्या राजदूत म्हणून निर्देशीत करण्यात आलं आहे. तर जेनेट येलेन यांना अमेरिकेच्या ट्रेजरी सचिवपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. जेनेट येलेन या 74 वर्षीय असून त्या बेरोजगारीच्या बाबतीत तज्ञ आहेत.
…अखेर डोनाल्ड ट्रम्प यांना पराभव मान्य, बायडन यांना सत्तास्थापनेसाठी निमंत्रण#DonaldTrump #JoeBiden #JoeBidenKamalaHarris2020 #USAElections2020 https://t.co/40QI3nGqco
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 24, 2020
संबंधित बातम्या:
…अखेर डोनाल्ड ट्रम्प यांना पराभव मान्य, बायडन यांना सत्तास्थापनेसाठी निमंत्रण
Joe Biden | जो बायडन ‘कमजोर अध्यक्ष’, चीनच्या सरकारी सल्लागाराची टीका
(US President Joe Biden preparing Cabinet for his tenure)