अमेरिकेत अध्यक्षांच्या निवडणुकीचा निकाल नोव्हेंबरमध्ये, शपथविधी 20 जानेवारीला, काय परंपरा?

अमेरिकेत अध्यक्षांच्या शपथविधीचा सोहळा 20 जानेवारीला संपन्न होतो. (US President oath ceremony)

अमेरिकेत अध्यक्षांच्या निवडणुकीचा निकाल नोव्हेंबरमध्ये, शपथविधी 20 जानेवारीला, काय परंपरा?
Follow us
| Updated on: Dec 16, 2020 | 2:01 PM

वॉशिंग्टन: अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी रिपब्लिकचे डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला आहे. बायडन यांच्या अध्यक्षपदावर इलेक्ट्रोलच्या बैठकीत शिक्कामोर्तब झालं आहे. जो बायडन आणि उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचा शपथविधी सोहळा कॅपिटल हिलसमोर होणार आहे. अमेरिकेत अध्यक्षांच्या शपथविधीचा सोहळा 20 जानेवारीला संपन्न होतो. या दिवसाला अध्यक्षांच्या कार्यकालाचा पहिला दिवस मानला जाते. अमेरिकेत ही परंपरा 1937 पासून सुरु आहे. यावर्षाच्या शपथविधी सोहळ्यावर कोरोना ससंर्गामुळे मर्यादा येणार आहेत. (US President oath ceremony)

अमेरिकेत 1937 पासून अध्यक्षांची शपथ 20 जानेवारीला होते. शपथविधी सोहळा आणि स्वागत समारंभात माजी अध्यक्षांसह, मावळते अध्यक्ष आणि फर्स्ट लेडी यांच्यासह उपस्थित असतात. अध्यक्षपदावर निवडून आलेली व्यक्ती पहिल्यांदा अध्यक्ष होत असेल किंवा दुसऱ्यांदा विजयी झाली असेल, 20 जानेवारीला शपथविधीचे आयोजन केले जाते. अमेरिकेत निवडणुकीचे निकाल आणि शपथविधी यामध्ये 72 ते 78 दिवसांचे अंतर असते. 1933 पूर्वी अध्यक्षांच्या शपथविधीचा कार्यक्रम 20 जानेवारीला होत असे. 1933 मध्ये अमेरिकेच्या राज्यघटनेत 20 वी घटनादुरस्ती करण्यात आली. त्यानुसार शपथविधी 20 जानेवारीला करण्याचे निश्चित करण्यात आले. नव्यान निवडून आलेल्या सिनेट आणि इलेक्ट्रोल्सला 3 जानेवारीला सदस्यत्वाची शपथ दिली जाते. 23 जानेवारी 1933 ला ही घटनादुरुस्ती लागू करण्यात आली. (US President oath ceremony)

नव्या अध्यक्षांच्या स्वागताला मावळते अध्यक्ष

अमेरिकेत नवनिर्वाचित अध्यक्ष आणि फर्स्ट लेडी यांचे स्वागत मावळते अध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी करतात. शपथविदी कार्यक्रमाच्या ठिकाणी नवनिर्वाचित आणि मावळते अध्यक्ष पोहोचतात.त्यानंतर अध्यक्ष शपथ घेतात आणि मावळत्या अध्यक्षांना निरोप दिला जातो. मरीन वन सुप्रीम कमांडर मावळत्या अध्यक्षांना कार्यकाळ संपल्यानंतर जिथे जायचे असेल तिथपर्यंत सोडण्यासाठी जातात.

अध्यक्षांच्या स्वागताचा कार्यक्रम 1981 पासून कॅपिटल हिलबाहेर आयोजित केले जाते. शपथविधी कार्यक्रम रविवारी झाल्यास स्वागताचा कार्यक्रम सोमवारी होतो. 1937 पासून तीनवेळा असं घडलं आहे. अध्यक्षांच्या स्वागताचा कार्यक्रम झाल्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष देशाला संबोधित करतात. या कार्यक्रमाचे प्रसारण करणे अमेरिकेतील सर्वा माध्यमांना बंधनकारक असते. (US President oath ceremony)

संबंधित बातम्या:

Breaking : अमेरिकेतही फायझर लसीच्या आपत्कालीन वापरास मंजूरी

बायडन आता फक्त एक पाऊल दूर !.

(US President oath ceremony)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.