अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या महामुकाबल्याला सुरुवात; सुनीता विल्यम्स यांनी केलं मतदान, स्पेसमधून कसं करतात वोटिंग?

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे.उपराष्ट्रपती कमला हॅरिस व माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे निवडणुकीच्या रिंगणात असून या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या महामुकाबल्याला सुरुवात; सुनीता विल्यम्स यांनी केलं मतदान, स्पेसमधून कसं करतात वोटिंग?
Follow us
| Updated on: Nov 05, 2024 | 9:54 PM

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे.उपराष्ट्रपती कमला हॅरिस व माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे निवडणुकीच्या रिंगणात असून या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. इंटरनॅशन स्पेस स्टेशनमधून सुनीता विल्सम्स आणि नासाच्या इतर अंतराळवीरांनी आपलं मतदान केलं आहे. अंतराळवीरांनी केवळ मतदानच केलं नाही तर तेथील नागरिकांना जास्तीत जास्त संख्येनं मतदान करण्याचं देखील आवाहन केलं आहे.

सध्या इंटरनॅशन स्पेस स्टेशनमध्ये नासाचे चार अंतराळवीर आहेत, ज्यामध्ये सुनीता विलियम्स देखील आहेत. यानामध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ते सर्वजण स्पेस स्टेशनमध्येच अडकून पडले आहेत.सुनीता विलिम्स यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्या म्हणाल्या की स्पेसमधून मतदान करणं माझ्यासाठी खरच खूप वेगळा अनुभव आहे.मतदान करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. यानामध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे सुनीता विलियम्स या पाच जूनपासून स्पेस स्टेशनमध्येच आडकून पडल्या आहेत.

स्पेसमधून मतदान करण्याची कशी असते प्रतिक्रिया?

स्पेस स्टेशनमध्ये राहणाऱ्या अंतराळवीरांसाठी त्यांना निवडणुकीत भाग घेता यावा यासाठी नासानं स्पेस कम्युनिकेशन्स आणि नेव्हिगेशन प्रोगामची सोय केली आहे. या अंतर्गत जेव्हा एखादा अंतराळवीर मोहिमेवर जातो तेव्हा त्याला मतदान करण्यासाठी आधीच नोंदणी करावी लागते. यासाठी अंतराळवीराला फेडरल पोस्टकार्ड अर्ज भरावा लागतो.निवडणुकीपर्यंत आपण अंतराळामध्येच राहू याची कल्पना सुनीता विलिम्स यांना नव्हती, त्यामुळे त्यांनी हा अर्ज भरला नाही. मात्र तरी देखील त्यांना संधी देण्यात आली आहे.

सर्व प्रथम मोहिमेवर असलेल्या अंतराळवीरांशी वेळेत संपर्क करणं शक्य आहे का? याची चाचपणी नासाकडून केली जाते. त्यासाठी आधी चाचणी मतपत्रिका पाठवली जाते, चाचणी मतदान यशस्वी झाल्यानंतर खरी मतपत्रिका स्पेसमध्ये पाठवली जाते. बॅलेट पेपर अंतराळवीरांपर्यंत पोहोचल्यानंतर तो मतदान करतो आणि त्यांची एनक्रिप्टेड आवृत्ती तेथील संगणक प्रणालीवर अपलोड केली जाते. त्यानंतर ती नासाच्या ग्राऊंड टर्मिनल्सवर पोहोचते, त्यानंतर ती मतपत्रिका ही संबंधित मतदान केंद्रावर पोहोचते.

Non Stop LIVE Update
“देवाभाऊ, जॅकेट भाऊ अन् दाढी भाऊ”, ठाकरेंच्या टीकेवर शिंदेंचा पलटवार
“देवाभाऊ, जॅकेट भाऊ अन् दाढी भाऊ”, ठाकरेंच्या टीकेवर शिंदेंचा पलटवार.
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् रासपच्या उमेदवाराकडून आत्महत्येचा प्रयत्न
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् रासपच्या उमेदवाराकडून आत्महत्येचा प्रयत्न.
तुम्ही एकदाही घरी पाठवलं नाही पण आता..,पवारांची राजकारणातून निवृत्ती?
तुम्ही एकदाही घरी पाठवलं नाही पण आता..,पवारांची राजकारणातून निवृत्ती?.
माझ्या विरोधात षडयंत्र अन्..., अजित दादांच्या उमेदवार सरोज अहिरे भावूक
माझ्या विरोधात षडयंत्र अन्..., अजित दादांच्या उमेदवार सरोज अहिरे भावूक.
'उठाव केला तेव्हा शंभूराज दोन पाऊलं माझ्या पुढं..', शिंदे म्हणाले...
'उठाव केला तेव्हा शंभूराज दोन पाऊलं माझ्या पुढं..', शिंदे म्हणाले....
धनुष्यबाण अन् शिवसेना कोणाची? सभेतून शिंदेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
धनुष्यबाण अन् शिवसेना कोणाची? सभेतून शिंदेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर.
पवारांसमोर चिमुकल्याचं तुफान भाषण, 'लाडक्या बहिणींनो दाजींला सांगा...'
पवारांसमोर चिमुकल्याचं तुफान भाषण, 'लाडक्या बहिणींनो दाजींला सांगा...'.
'लाडक्या बहिणीं'साठी तुमचा हा भाऊ 10 वेळा जेलमध्ये जायला तयार पण...'
'लाडक्या बहिणीं'साठी तुमचा हा भाऊ 10 वेळा जेलमध्ये जायला तयार पण...'.
राज ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांच प्रत्युत्तर, शिंदेंवर जनतेचा विश्वास..
राज ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांच प्रत्युत्तर, शिंदेंवर जनतेचा विश्वास...
फडणवीसांच्या लाडक्या ताईंना... रश्मी शुक्लांवरुन राऊतांची सरकारवर टीका
फडणवीसांच्या लाडक्या ताईंना... रश्मी शुक्लांवरुन राऊतांची सरकारवर टीका.