बायडन- मोदींची फोनवर चर्चा, अमेरिकेच्या संरक्षण सचिवांची तातडीची बैठक, 135 कंपन्यांच्या सीईओंची भारताला मदतीची तयारी

अमेरिकेचे संसक्षण सचिव ब्लिंकेन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अमेरिकेतील 135 कंपन्यांचे सीईओंनी भारताला मदत करण्यासाठी तयार असल्याचं जाहीर केलं आहे. 135 top US CEOs meeting with Blinken

बायडन- मोदींची फोनवर चर्चा, अमेरिकेच्या संरक्षण सचिवांची तातडीची बैठक, 135 कंपन्यांच्या सीईओंची भारताला मदतीची तयारी
Follow us
| Updated on: Apr 27, 2021 | 1:47 PM

नवी दिल्ली: कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना भारताला करावा लागत आहे. देशभरात दररोज तीन लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर, व्हेंटिलेटर्सच्या तुटवड्याला भारताला सामोरं जावं लागत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फोन वरुन चर्चा झाली आहे. जो बायडन यांनी भारताला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर अमेरिकेचे संरक्षण सचिव ब्लिंकेन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अमेरिकेतील 135 कंपन्यांचे सीईओंनी भारताला मदत करण्यासाठी तयार असल्याचं जाहीर केलं आहे. (US Secretary of State Blinken meeting along with 135 US CEOs they promise to rush help to India after conversation of Joe Biden And Narendra Modi)

135 कंपन्यांच्या सीईओची मदतीची तयारी

भारताला कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थिती मदत करण्यासाठी तयार असल्याची माहिती अमेरिकेतील 135 सीईओंनी दिली. यूपीएस, यूनायटेड डेल्टाकडून स्वंयसेवी तत्वावर व्हेंटिलेटर्स पाठवली जाणार आहेत. ज्याचं वितरण अ‌ॅमेझॉनकडून करण्यात येईल. गुगल, आयबीएम, जे.पी.मोर्गन, नुवीन लॅब्स, फेडेक्स वॉलमार्ट, कोक, जॉन्सन अँड जॉन्सन , फायझर यांना भारतातील परिस्थितीचा जगाच्या आरोग्य व्यवस्थेवर आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो, याची जाणीव आहे. अमेरिका भारताला मिलिटरी मोबाईल हॉस्पिटल आणि आयसीयू पाठवणार आहे.

अ‌ॅस्ट्राझेनका लसीचा साठा आणि कच्चा माल पाठवणार

अमेरिकन सरकार अ‌ॅस्ट्राझेनका लसीचा साठा आणि लस निर्मितासाठी कच्चा माल भारताला पाठवेल, अशी माहिती देण्यात आलीय. तर, ऑक्सिजन संबंधी उपकरणांचा अतिरिक्त साठा युद्धपातळीवर भारतीय रुग्णालयांकडे पाठवण्यात आला आहे. गुगल भारतातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत आहे. लॉकहीड मार्टीन कंपनी भारताला हेलिकॉप्टर आणि कार्गो विमानं पाठवेल. त्याचा वापर छोट्या खेड्यांमध्ये वैद्यकीय उपकरणं पोहोचवण्यासाठी होणार आहे. अमेरिका भारतासमोर उद्भवलेल्या अभूतपूर्व संकटाच्या काळात मनापासून मदतीचा हात घेऊन उभा आहे. आम्ही आर्थिक मदत, उपकरणांची मदत देखील करण्यासाठी तयार आहोत, अशी चर्चा बैठकीत झाली.

सार्वजनिक आणि खासगी क्षेत्र एकत्र येऊन या स्पिरीटनं काम करतेय हे यापूर्वी पाहिलेलं नाही. अमेरिकेचं धैर्य, बुद्धिमत्ता आणि आर्थिक संपन्नता याचा वेगवान पद्धतीनं भारताला मदत करण्यासाठी वापरत आहोत. आता आपल्याला समन्वयानं वेगवान पद्धतीनं काम करुन मदतीचं काम पार पाडायचं आहे. कोरोना विषाणू संसर्गाला अटकाव केला पाहिजे. कोरोना विषाणू संसर्गाचं भारतीय रुप मे अखेर संपूर्ण जगभरात पसरु शकतं, ते आपल्याला रोखता आलं पाहिजे, अशी चर्चा अमेरिकेचे संरक्षण सचिव ब्लिकेंन आणि 135 कंपन्यांचे सचिव यांच्यामध्ये झाली.

संबंधित बातम्या:

‘भारतात बेड्स आणि ऑक्सिजनचा तुटवडा’, बिघडलेल्या परिस्थितीवर आंतरराष्ट्रीय माध्यमं काय म्हणतात? वाचा…

भारतात Corona Vaccine ‘मोफत’ तरीही लोक दुबईला का जातात? प्रवासासाठी चार्टर्ड प्लेनचा खर्च 35 ते 55 लाख रुपये

(US Secretary of State Blinken meeting along with 135 US CEOs they promise to rush help to India after conversation of Joe Biden And Narendra Modi)

Non Stop LIVE Update
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.