अमेरिकेचीही ‘मास्कमुक्ती’कडे वाटचाल, लस टोचून घेतलेले नागरिक मास्कशिवाय फिरु शकणार

विविध व्याधींनी त्रस्त असलेल्या नागरिकांची लसीकरण मोहिमेत विशेष खबरदारी घेतली जात आहे. या मोहिमेला चांगले यश मिळू लागल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आता लस टोचून घेतलेल्या नागरिकांना घराबाहेर मास्कशिवाय फिरण्यास मुभा दिली आहे. (US to move towards 'mask-free', vaccinated citizens will be able to go without masks)

अमेरिकेचीही 'मास्कमुक्ती'कडे वाटचाल, लस टोचून घेतलेले नागरिक मास्कशिवाय फिरु शकणार
अमेरिकेचीही 'मास्कमुक्ती'कडे वाटचाल
Follow us
| Updated on: Apr 28, 2021 | 12:00 AM

न्यूयॉर्क : संपूर्ण जगभर कोरोनाच्या संकटाला सामोरे जात आहे. या संकटावर मात कशी करायची, असा यक्षप्रश्न जगापुढे असताना अमेरिकेनेही मास्कमुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे. देशात कोरोना लसीकरणाला मोठ्या प्रमाणावर गती देण्यात आली आहे. ज्या लोकांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक आहे, तसेच ज्या लोकांपासून इतरांना संसर्गाचा धोका आहे, अशा लोकांसाठी अमेरिकेत प्राधान्याने कोरोना लसीकरण पूर्णत्वास नेले जात आहे. विविध व्याधींनी त्रस्त असलेल्या नागरिकांची लसीकरण मोहिमेत विशेष खबरदारी घेतली जात आहे. या मोहिमेला चांगले यश मिळू लागल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आता लस टोचून घेतलेल्या नागरिकांना घराबाहेर मास्कशिवाय फिरण्यास मुभा दिली आहे. (US to move towards ‘mask-free’, vaccinated citizens will be able to go without masks)

हे नागरिक सार्वजनिक ठिकाणी मास्कशिवाय फिरू शकतात

ज्या नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले असतील, त्या नागरिकांना मोठ्या गर्दीची ठिकाणे वगळता इतरत्र तोंडाला मास्क लावण्याची गरज नसेल. ज्या नागरिकांनी कोरोना लस टोचून घेतली नसेल ते नागरिकही काही परिस्थिती वगळता मास्कशिवाय बाहेर जाऊ शकतात. अमेरिकेच्या रोग नियंत्रण केंद्राकडून आज हा महत्त्वपूर्ण खुलासा करण्यात आला आहे. मागील वर्षभर कोरोना संसर्गामुळे नागरिकांना तोंडावर मास्क लावणे बंधनकारक झाले आहे. आता लसीकरणामुळे कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात येण्याची चिन्हे आहेत. त्यात मास्कशिवाय फिरण्यास मुभा मिळाल्याने अमेरिकेच्या नागरिकांनी समाधानाची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोरोना महामारीमुळे विस्कळीत झालेली जनजीवनाची घडी हळूहळू पूर्वपदावर येण्याची आशा पल्लवित झाली आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोना विषाणूने 5 लाख 70 हजार लोकांचा बळी घेतला आहे.

रोग नियंत्रण केंद्राची गेल्या वर्षीची भूमिका

अमेरिकेच्या रोग नियंत्रण केंद्राने (सीडीसी) गेल्या वर्षी कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पावले उचलली होती. अमेरिकन नागरिकांना घराबाहेर पडताना मास्क बंधनकारक करण्यात आला होता. तसेच एकमेकांपासून सहा फुटांचे शारिरीक अंतर ठेवण्याचा सल्ला देण्यात आला होता. आता कोरोना लसीकरणानंतर सीडीसीने आपल्या भूमिकेत बदल केला आहे. सध्याच्या घडीला अमेरिकेत निम्म्याहून अधिक वयस्कर लोकांनी कोरोनाचा किमान एक डोस घेतला आहे. तसेच एक तृतीयांशहून अधिक जनतेने कोविड प्रतिबंधक लसीचे पूर्ण डोस घेतले आहेत. बर्मिंघमच्या अलबामा विद्यापीठातील संसर्गरोग विशेषज्ञ डॉ. माइक साग यांनी रोग नियंत्रण केंद्राच्या निर्णयाचे स्वागत केले. हा निर्णय म्हणजे स्वातंत्र्याची वापसी आहे. हे सामान्य जनजीवनाकडे टाकलेले पाऊल आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. साग यांनी दिली आहे.

याआधी ईस्त्रायल बनलाय मास्कमुक्त देश

जगात सर्वात आधी मास्कमुक्त देश बनण्याचा मान ईस्त्रायलने मिळवला आहे. ईस्त्रायलच्या आरोग्य प्रशासनाने आठवडाभरापूर्वी मास्कमुक्तीची घोषणा केली होती. तेथेही कोरोना लसीकरणाला प्रचंड गती देण्यात आली. अपेक्षित लसीकरण पूर्ण झाल्यानंतर सरकारने नागरिकांना मास्कशिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास परवानगी दिली आहे. (US to move towards ‘mask-free’, vaccinated citizens will be able to go without masks)

इतर बातम्या

”कोरोनापासून बचावासाठी दारूची दुकाने बंद करा, 30 हजार कोटींपेक्षा जास्त जीव वाचणार”

कोरोना संकटात प्रशासनानं आघाडीवर राहून सहकार्य करावं, राज्यपालांची सर्व विद्यापीठांनी सूचना

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.