धक्कादायक, एकाची उड्डाणाला तयार विमानाच्या पंखांवर चढाई, दहशतवादी हल्ल्याच्या भीतीने प्रवाशांची पाचावर धारण
मेरिकेतील लॉस वेगासमध्ये एक 41 वर्षीय व्यक्ती थेट उड्डाण घेण्याच्या स्थितीत असलेल्या विमानावर चढल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेतील लॉस वेगासमध्ये एक 41 वर्षीय व्यक्ती थेट उड्डाण घेण्याच्या स्थितीत असलेल्या विमानावर चढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर विमानतळावर एकच गोंधळ उडाला. अचानक घडलेल्या या घटनेनंतर विमानतळ प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. यानंतर संबंधित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. विमान प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. लॉस वेगास मेट्रोपोलिटन पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार शनिवारी (12 डिसेंबर) मॅकरन आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडला. एक व्यक्ती अलास्का एअरलाईन्सच्या विमानावर चढला होता (USA man climb on wing of plane during take off).
या विमानातील एरिन इवांस या प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार संबंधित व्यक्ती विमानाच्या पंखांवर जवळपास 45 मिनिटं होता. लॉस वेगासवरुन पोर्टलँडला जाणाऱ्या विमानाच्या एका वैमानिकाने विमान उड्डाणाच्या आधी एक व्यक्ती जवळ येताना पाहिलं आणि त्याने तात्काळ विमानतळ प्रशासनाला याची माहिती दिली. इवांस या प्रवाशाने या घटनेचा व्हिडीओ काढून आपल्या फेसबुकवर पोस्ट केला.
एरिन इवांस म्हणाले, “आम्ही त्या व्यक्तीला विमानाच्या पंख्यावर पाहून अगदी आश्चर्यचकीत झालो. त्याला पाहून हा दहशतवादी मोहिमेसाठी तर इथं नाही ना अशी भितीही वाटली.”
@AlaskaAir crew has been exceptional as The Original Wingman graces us with his presence. #StayHot2020 pic.twitter.com/79PHcHhJ0q
— Brooke Knight (@SkipperBK13) December 12, 2020
दरम्यान, हा प्रकार लक्षात येताच विमानतळ प्रशासनाने या प्रवाशाला तात्काळ विमानावरुन खाली उतरण्यास सांगितले. यावेळी विमानातील प्रवाशांना विमानातच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पोलिसांनी विमानतळात बेकायदेशीरपणे घुसणाऱ्या या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. तसेच तो नेमका विमानाच्या पंखावर का चढला याचा तपास केला जात आहे.
हेही वाचा :
Kerala Plane Crash : केरळ विमान दुर्घटना, बचाव कार्यातील 22 जणांना कोरोनाची लागण
सूर्यकिरण क्रॅश, दोन विमानांची हवेत धडक
बॉक्सिंगचा सामना बघून परताना विमान कोसळलं
USA man climb on wing of plane during take off