आता घर बसल्या स्वतःच कोरोना चाचणी करा, USFDA ची ‘सेल्फ टेस्ट किट’ला मंजुरी
आता तुम्हाला कोरोना चाचणी करण्यासाठी रुग्णालयात किंवा प्रयोगशाळेत जाण्याची गरज राहणार नाही.
वॉशिंग्टन : आता तुम्हाला कोरोना चाचणी करण्यासाठी रुग्णालयात किंवा प्रयोगशाळेत जाण्याची गरज राहणार नाही. जगभरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कुणालाही घर बसल्या आपली कोरोना चाचणी करता येईल यावर संशोधन सुरु होतं. यातच आता अमेरिकेच्या फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने जगातील पहिली ‘सेल्फ कोविड टेस्ट किट’ला मंजुरी दिली आहे. या किटमुळे कुणालाही घर बसल्या आपली कोरोना चाचणी करता येणार आहे. या किटच्या चाचणीचा अहवाल केवळ 30 मिनिटांमध्ये येतो (USFDA approves first self Corona test kit of World).
अमेरिकेच्या ल्यूकिरी हेल्थ या कंपनीने ही सेल्प टेस्ट किट विकसित केली आहे. या किटचा उपयोग आणीबाणीच्या स्थितीत करता येणार आहे. या किटच्या मदतीने स्वतःच आपल्या नाकातील स्वॅब सम्पल घेऊन चाचणी करता येईल. 14 वर्षांवरील कोणतीही व्यक्ती घर बसल्या सहजपणे ही चाचणी करु शकणार आहे.
अमेरिकेच्या फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने दिलेल्या माहितीनुसार, ही जगातील अशी पहिली किट आहे ज्याचा उपयोग करुन घरबसल्या कोरोना चाचणी होणार आहे. या किटचा उपयोग करण्यासाठी डॉक्टर किंवा हेल्थ वर्करची गरज असणार नाही. मात्र, जर तुम्ही 14 वर्षांपेक्षा कमी वयाचे असाल तर तुम्हाला हेल्थ वर्करच्या मदतीने ही चाचणी करावी लागेल.
अमेरिकेतील USFDA म्हणजेच फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन तेथील आरोग्य विभागाशी संबंधित संस्थांवरील नियंत्रक संस्था आहे. ही संस्था औषधांच्या विक्रीसाठी मंजुरी देखील देते. अमेरिकेत आयात होणाऱ्या 13 टक्के आणि निर्यात होणाऱ्या 19 टक्के उत्पादनांवर USFDA चं नियंत्रण आहे.
संबंधित बातम्या :
मोठी बातमी : शेवटच्या चाचणीत फायझरची लस 95 टक्के परिणामकारक, लवकरच बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता
केवळ लसीच्या बळावर कोरोनावर मात करणं शक्य नाही!, जागतिक आरोग्य संघटनेचा दावा
देशातली पहिली कोरोना लस ‘कोव्हॅक्सिन’ची तिसऱ्या टप्प्यात चाचणी सुरू, 26 हजार स्वयंसेवकांचा समावेश
संबंधित व्हिडीओ :
USFDA approves first self Corona test kit of World