Video: ही तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात? यूक्रेनमध्ये प्रचंड मोठा स्फोट, शहरं रिकामी होतायत, रशियाला कसं रोखणार?

म्हणजेच ज्या देशाला युद्ध करायचंच आहे तो देश स्वत:च्याच भूमीवर हल्ला घडवून आणतो आणि त्याचं खापर मात्र शत्रू राष्ट्रावर फोडतो आणि त्याचा बदला म्हणून मग तो त्या शत्रू राष्ट्रावर हल्ला करतो. तिथूनच युद्धाची ठिणगी पडते. रशियाही सध्या अशाच फॉल्स फ्लॅग मार्चच्या माध्यमातून यूक्रेनवर हल्ला करत असल्याचं अमेरीकेचं म्हणणं आहे.

Video: ही तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात? यूक्रेनमध्ये प्रचंड मोठा स्फोट, शहरं रिकामी होतायत, रशियाला कसं रोखणार?
यूक्रेन-रशियातली युद्धस्थिती दाखवणारा हा बोलका फोटोImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 8:13 AM

Russia Ukraine Crisis: रशिया यूक्रेनवर आता हल्ला करणार नाही असं वाटत असतानाच पूर्व यूक्रेनचं शहर असलेल्या डोनेस्कमध्ये एका गाडीत मोठा स्फोट झालाय. एवढच नाही तर तेलाच्या पाईपलाईनला आग लावण्यात आलीय. डोनेस्क शहर रिकामं केलं जातंय. एटीएमच्या बाहेर लोकांच्या रांगा लागल्यात आणि लोक शहरं रिकामं करताना दिसतायत. विशेष म्हणजे हे शहर फुटीरतावाद्यांच्या ताब्यात आहे ज्यांना रशियाचा पाठिंबा आहे. त्यामुळेच हा हल्ला नेमका कुणी केला याबाबत साशंकता व्यक्त केली जातेय. पण फॉल्स फ्लॅग अभियानातून यूक्रेनवर ही हल्ल्याची सुरुवात तर नाही अशी शंका बोलली जातेय.

पूर्व यूक्रेनमध्ये नेमकं काय चालू आहे? डोनेस्कमध्ये ज्या गाडीत स्फोट झाला ती गाडी क्षेत्रीय सुरक्षा प्रमुख डेनिस सिनेंकोव यांची असल्याची माहिती समोर येतेय. पण हा हल्ला नेमका कुणी केला हे मात्र अजूनही समोर आलेलं नाही. रशियाच्या सरकारी न्यूज चॅनल्सनं डोनेस्कच्या ह्या घटनेचे काही व्हिडीओ मात्र प्रसारीत केलेले आहेत. ह्या व्हिडीओत स्फोट होताना स्पष्ट दिसतोय एवढच नाही तर अनाथ मुलांना पहिल्यांदा स्थलांतरीत केलं जातंय. एवढच नाही तर युद्धाच्या भीतीनं डोनेस्क शहरच ओस पडत असल्याचं दिसतंय. काही ठिकाणी लोकांनी एटीएमसमोरही रांगा लावल्याचं व्हिडीओत स्पष्ट दिसतंय. सध्या तरी पूर्व यूक्रेनमध्ये नेमकी काय स्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी असे दोन्ही बाजूचे व्हिडीओज हेच पुरावे आहेत.

फॉल्स फ्लॅग अभियान काय आहे? अनेक युद्धात काही वेळेस हे अभियान चालवल्याचा इतिहास आहे. म्हणजेच ज्या देशाला युद्ध करायचंच आहे तो देश स्वत:च्याच भूमीवर हल्ला घडवून आणतो आणि त्याचं खापर मात्र शत्रू राष्ट्रावर फोडतो आणि त्याचा बदला म्हणून मग तो त्या शत्रू राष्ट्रावर हल्ला करतो. तिथूनच युद्धाची ठिणगी पडते. रशियाही सध्या अशाच फॉल्स फ्लॅग मार्चच्या माध्यमातून यूक्रेनवर हल्ला करत असल्याचं अमेरीकेचं म्हणणं आहे. कारमध्ये जो स्फोट झालाय त्याला रशिया हा यूक्रेनला जबाबदार धरतोय. जर पूर्व यूक्रेनवर रशिया समर्थक फुटीरतावाद्यांचा कब्जा आहे तर मग गाडीला यूक्रेन कसं उडवेल असा सवाल यूक्रेनकडून विचारला जातोय.

अमेरीकेचं काय म्हणनं आहे? अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरीका यूक्रेन बॉर्डरवर स्वत:चं सैन्य पाठवणार नाही पण यूक्रेनला पूर्ण पाठिंबा असेल असं स्पष्ट केलंय. नाटो देशांच्या फौजा मात्र यूक्रेनला पूर्ण मदत करतील. एवढच नाही तर रशियानं हल्ला केलाच तर त्याच्यावर कडक निर्बंध लावले जातील याची आठवणही बायडेन पुन्हा पुन्हा रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना करुन देतायत.

हे सुद्धा वाचा:

आज तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडणार? काय आहे रशिया-यूक्रेनचा संघर्ष? जाणून घ्या फोटोस्टोरीतून

अमेरिकी सैन्य अफगाणिस्तानातून जीव वाचवून पळालं, व्लादिमीर पुतीन यांची अमेरिकेवर खरमरीत टीका, रशिया-अमेरिका वाद पुन्हा पेटणार?

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.