video viral : लंडनच्या रॉयल गार्डना काय झाले, अचानक का चक्कर येऊन पडले, पाहा
व्हिडीओत दिसत आहे की उन्हात त्यांच्या डोळे ही दिसू शकणार नाहीत अशा उंच आणि हनुवटीला घट्ट बांधलेल्या टोप्या घालून रंगीत तालीम करीत उभे असलेले जवान शु्द्ध हरपून पडले.
लंडन : बदलत्या वातावरणामुळे जागतिक तापमानात वाढ होत आहे. उष्णतेचे आधीचे विक्रम मोडले जात आहेत. लंडनमध्ये या दिवसात पारा 30 डीग्रीवर पोहचला आहे. एवढं तापमान नेहमी गुलाबी थंडीत असणाऱ्या साहेबांच्या देशातील रॉयल गार्डना ( British Royal Gaurd ) बहुतेक मानवलं नसावं. त्यामुळे किंग चार्ल्स ( King Charles ) यांच्या जन्म दिनाच्या पूर्व संध्येला लंडनच्या एका परेडची रिहर्सल चालू असतानाच किमान तीन रॉयल गार्ड घेरी येऊन पडले. या संदर्भातील व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
व्हिडीओत दिसत आहे की उन्हात त्यांच्या डोळे ही दिसू शकणार नाहीत अशा उंच आणि हनुवटीला घट्ट बांधलेल्या टोप्या घालून रंगीत तालीम करीत उभे असलेले जवान शु्द्ध हरपून पडले. तरी त्यांचे कडक शिस्तीचे गुलाम असलेले त्यांच्या सहकारी जवानांच्या चेहऱ्यावरील माशीही हलली नाही. ते तसेच जणू काही घडलेच नाही असे तालावर आगे मूड, दायने मूड, सावधान आणि विश्राम अर्थात त्यांच्या भाषेत करीत राहीलेले दिसत आहेत. समाजमाध्यमावर शेअर केलेल्या या व्हिडीओला तीन हजार लाईक्स मिळाले आहेत.
? At least three British royal guards collapsed during a parade rehearsal in London ahead of King Charles’ official birthday as temperatures exceeded 88 degrees Fahrenheit pic.twitter.com/V0fLjROoD5
— Reuters (@Reuters) June 10, 2023
लंडन म्हणजे अतिशय थंड वातावरण, स्वेटर घालूनच घराबाहेर पडावे लागत असेल, आपल्या मुंबईत चार महिने मोसमी पाऊस पडतो. तेथे लंडनला तर वर्षांचे बारा महिने केव्हाही भुरभुरत पाऊस पडत असतो. तर अशा साहेबांच्या लंडनची वारी आपण करणार असाल तर सावधान आता लंडनमध्ये किंग चार्ल्स यांच्या अधिकृत जन्म दिनाच्या आधी रिर्हसल करणारे तीन राजघराण्याचे रॉयल गार्ड उन्हामुळे चक्कर येऊन पडल्याची घटना घडली आहे.