चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा एकदा (Corona virus) विस्फोट झाल्याचे दिसून येत आहे. सरकारने झीरो-कोविड पॉलिसीअंतर्गत (zero-covid policy)लावलेले कडक लॉकडाऊन मागे घेतल्यानंतर चीनमध्ये कोविडची प्रकरणे वाढताना दिसत आहे. एपिडेमिऑलॉजिस्ट एरिक फीगल-डिंगच्या यांच्या सांगण्यानुसार, चीनमधील मृतांचा (deaths in million)आकडा लाखावर पोहोचल्याची शक्यता आहे. चीनमधून समोर आलेले व्हिडिओ हे फिगल-डिंग यांच्या दाव्याची पुष्टी करत आहेत, कारण या व्हिडीओनुसार, रुग्णालये आणि स्मशानभूमीसमोर मृतदेहांचे ढीग जमा होत आहेत.
रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडिया युजर्सकडून शेअर करण्यात आले आहेत. याबाबत सरकारी अधिकाऱ्यांकडून कोणतीही पुष्टी मिळालेली नसली तरीही कोविडमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची नीट व्यवस्था लावण्यासाठी अतिरिक्त शिफ्टमध्ये काम करावे लागल्याचे शवागरातील कामगारांनी नमूद केले आहे.
⚠️THERMONUCLEAR BAD—Hospitals completely overwhelmed in China ever since restrictions dropped. Epidemiologist estimate >60% of ?? & 10% of Earth’s population likely infected over next 90 days. Deaths likely in the millions—plural. This is just the start—?pic.twitter.com/VAEvF0ALg9
— Eric Feigl-Ding (@DrEricDing) December 19, 2022
तर फीगल-डिंग यांच्या दाव्याला अमेरिकास्थित इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन (IHME) पाठिंबा दिला होता. चीनमध्ये कोविड -19 प्रकरणांचा स्फोट होऊ शकतो आणि 2023 साला पर्यंत 10 लाखांहून अधिक मृत्यू होऊ शकतात, असा अंदाज त्यांनी वर्तवला होता.
दरम्यान रुग्णालयांमधील वैद्यकीय कर्मचारी हे कोविड विरुद्धच्या लढाईच्या अग्रभागी असून त्यांचा सरकारच्या धोरणात बदल करण्याच्या निर्णयाचा फटका बसत आहे. डॉक्टर आणि नर्स यांना कोविड -19 विषाणूंचा संसर्ग होताना दिसत आहे. काही वैद्यकीय कर्मचार्यांनी सोशल मीडियावर असे पोस्ट केले आहे की,
कोविडची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतरही त्यांच्यापैकी काहींना काम करत राहण्याचे आदेश मिळाले आहेत.
1. 4 अब्ज लोकसंख्या असलेल्या या देशातील रुग्णालये ओसंडून वाहत आहेत, मेडिकल्समधील औषधे संपल्याचे चित्र दिसून येत आहे. तर कोविडचा संसर्ग होऊ नये या भीतीने किंवा काही जण आधीच आजारा पडल्याने कित्येक नागरिक घरातच असून रस्त्यांवर शुकशुकाट पसरला आहे.
काय आहे चीनची प्रतिक्रिया ?
देशभरात विषाणू सैरावैरा पसरत असताना, अधिकारी ‘ताप दवाखाने’ (fever clinics) बांधण्यासाठी धडपडत आहेत. हे दवाखाने अनेकदा रुग्णालयांशी संलग्न असतात व ते चीनमध्ये कॉमन आहेत. एखाद्या सांसर्गिक रोगाचा व्यापक प्रसार रोखण्याच्या दृष्टीने हे दवाखाने डिझाइन केलेले आहेत.
शेकडो ताप दवाखाने एकमेकांशी जोडले आहेत, असे गेल्या आठवड्यात, बीजिंग, शांघाय, चेंगडू आणि वेन्झो या प्रमुख शहरांनी जाहीर केल्याचे रॉयटर्सने सरकारी WeChat खाती आणि मीडिया अहवालांचा हवाला देऊन सांगितले.
दरम्यान कोरोनाच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शांघाय आणि इतर अनेक शहरांमधील शाळा पुढील महिन्यासाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत.
2) Summary of #CCP‘s current #COVID goal: “Let whoever needs to be infected infected, let whoever needs to die die. Early infections, early deaths, early peak, early resumption of production.” @jenniferzeng97
Dead bodies piled up in NE China in 1 night—pic.twitter.com/nx7DD2DJwN
— Eric Feigl-Ding (@DrEricDing) December 19, 2022