Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुतीन यांची सर्वात मोठी चाल, खून, चोरी किंवा षडयंत्र, काहीही केलं तरी आजन्म संरक्षण

खादा गुन्हा किंवा गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी व्लादिमीर पुतीन यांच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली जाऊ शकत नाही, अशी तरतूद या कायद्यात आहे. | Vladimir Putin

पुतीन यांची सर्वात मोठी चाल, खून, चोरी किंवा षडयंत्र, काहीही केलं तरी आजन्म संरक्षण
ब्लादिमीर पुतीन
Follow us
| Updated on: Dec 23, 2020 | 3:49 PM

मॉस्को: रशियाचे (Russia) राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी मंगळवारी एका नव्या कायद्याला मंजुरी दिली. त्यानुसार आता राष्ट्राध्यक्षपदावरुन पायउतार झाल्यानंतरही व्लादिमीर पुतीन यांच्यावर कोणताही खटला दाखल केला जाऊ शकत नाही किंवा त्यांना अटक करण्यासही मज्जाव असेल. या कायद्यामुळे पुतीन यांच्या अमर्याद सामर्थ्यात आणखीनच वाढ झाली आहे. (Russian President Vladmir Putin signed legislation for Lifetime Immunity)

या कायद्यामुळे व्लादिमीर पुतीन यांना कोणत्याही गुन्ह्यापासून आजीवन संरक्षण मिळेल. तसेच एखादा गुन्हा किंवा गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी व्लादिमीर पुतीन यांच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली जाऊ शकत नाही, अशी तरतूद या कायद्यात आहे. पुतीन कुटुंबीय कोणत्याही कायद्याच्या अखत्यारित येणार नाहीत. रशियन सरकारकडून मंगळवारी हे विधेयक ऑनलाईन माध्यमांवर प्रकाशित करण्यात आले.

या कायद्यामुळे पुतीन यांना आणखी कोणते अधिकार मिळणार?

व्लादिमीर पुतीन रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतरही ते आजन्म सिनेटर राहतील. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हेगारी खटला चालवता येणार नाही.

सन 2000 पासून रशियात पुतीन यांची सत्ता

यंदा रशियात जनमत चाचणीद्वारे संविधानात संशोधन करण्यात आले. त्यामुळे व्लादिमीर पुतीन यांचा 2036 पर्यंत राष्ट्राध्यक्षपदी राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुतीन यांनी सन 2000 मध्ये रशियाची सूत्रे हाती घेतली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्राध्यक्षपदावरील आपली पकड कधीही ढिली होऊन दिलेली नाही.

काही दिवसांपूर्वीच व्लादिमीर पुतीन यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे पुतीन राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा देतील, अशी चर्चा होती. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता ही शक्यता पूर्णपणे फोल ठरल्याचे दिसत आहे.

पुतीन यांची गंभीर आजाराशी झुंज?

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना पार्किसन्सचा आजार झाल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी रंगली होती. त्यामुळे पुतीन 2021 मध्ये राष्ट्राध्यक्षपद सोडणार असल्याच्या चर्चा रशियात सुरु आहेत. मात्र, अद्याप या सगळ्याची अधिकृतरित्या पुष्टी होऊ शकलेली नाही.

संबंधित बातम्या:

पुतीन यांची गंभीर आजाराशी झुंज, रशियाचं अध्यक्षपद सोडण्याची शक्यता

… म्हणून मोदी आणि पुतीन यांच्या बैठकीत अमेठीची चर्चा

पुतीन यांचा फोन तर जिनपिंगचं पत्र, मोदींना जगातील दिग्गज नेत्यांच्या शुभेच्छा (tv9marathi.com)

(Russian President Vladmir Putin signed legislation for Lifetime Immunity)

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.