Vomiting: दर 5 मिनिटांनी होते उलटी; विचित्र आजारामुळे मुलगा त्रस्त
स्वतःच्या या स्थितीमुळे मुलगा जॉशदेखील त्रस्त असल्याचे ज्युलीने सांगीतले. मला काय झालय? मला सारखी उलटी का होतेय? बाकीची मुले सामान्य जीवन जगत असताना माझीच स्थिती इतकी खराब का?’असा अनेक प्रश्न मुलगा विचारत असल्याचे ज्युली यांनी सांगीतले. त्याला असणाऱ्या दुर्लभ आजारामुळे जॉशला दर 6 आठवड्यांनी रुग्णालयात दाखल करावे लागते.
दिल्ली : दिसायला व्यवस्थित दिसणारी अनेक माणसं गंभीर आजाराने त्रस्त असतात. एखाद्या प्रौढ व्यक्तीला आजार झाल्यास तो दुखण सहन करु शकतो. मात्र, लहान मुलाला एखादा आजार झाल्यास त्याला होणाऱ्या त्रासाची कल्पनाच न केलेली बरी. स्कॉटलंडमध्ये राहणाऱ्या एक लहान मुलगा विचित्र आजारामुळे त्रस्त आहे. या मुलाला दर 5 मिनिटांनी उलटी(Vomiting) येते. या मुलाचे आईने सोशल मिडियाद्वारे त्याच्या मुलाच्या आजाराबाबत माहिती दिली आहे. मुलाच्या प्रकृतीमुळे त्याची आई खूप त्रस्त आहे.
ज्युली असे या दु:खी मातेचे नाव आहे. त्या स्कॉटलंडच्या एडिनबर्गमध्ये राहतात. त्यांच्या मुलाला सिक्लिकल वोमेटिंग सिंड्रोम हा अत्यंत दुर्मीळ आजार आहे. या सिंड्रोममध्ये त्यांच्या मुलाला दर 5 मिनिटांनी उलटी होते.
स्वतःच्या या स्थितीमुळे मुलगा जॉशदेखील त्रस्त असल्याचे ज्युलीने सांगीतले. मला काय झालय? मला सारखी उलटी का होतेय? बाकीची मुले सामान्य जीवन जगत असताना माझीच स्थिती इतकी खराब का?’असा अनेक प्रश्न मुलगा विचारत असल्याचे ज्युली यांनी सांगीतले. त्याला असणाऱ्या दुर्लभ आजारामुळे जॉशला दर 6 आठवड्यांनी रुग्णालयात दाखल करावे लागते.
यादरम्यान त्याला अनेक प्रकारची औषधे दिली जातात. तसेच त्याला बोलतानाही मोठा त्रास होत असतो. प्रत्यक्षात त्याच्या तोंडात मोठ्या प्रमाणात सलाइवा तयार होते. अशा स्थितीत तोंडात मोठ्या प्रमाणात लाळ तयार झाल्यामुळे तो बोलू शकत नाही. जॉशच्या या सिंड्रोमचे कारण डॉक्टरांनाही समजलेले नाही. मला माझ्या मुलाच्या भविष्यासाठी मोठी चिंता वाटत असल्याचे ज्युली यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. या रोगावर उपचार नाही
सिक्लिकल वोमेटिंग सिंड्रोमचे कारण आणि उपचार अद्याप समोर आलेला नाही. जॉशला अखेर नेमके काय होतेय हे ज्युलीला पूर्वी समजत नव्हते. जॉशला डॉक्टरांकडे नेल्यावर तिला आजाराबद्दल कळले. परंतु या आजारावर कुठलाच उपचार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जॉशला विविध प्रकारची औषधे दिली जातात. यातील एखादे औषध प्रभावी ठरेल अशी अपेक्षा यामागे असते. तोंडात लाळ तयार होत असल्याने तो फारसे बोलू शकत नाही. यामुळे तो स्वतःचे विचार लिहूनच मांडत असतो.