नवी दिल्ली : दी वॉल्ट डिसने कंपनी सध्या इंटरटेनमेंट इंडस्ट्रीत दिग्गज कंपन्यांपैकी एक आहे. वॉल्ट यांना भाऊ रॉय यांच्यासोबत मिळून १६ ऑक्टोबर १९२३ ला डिसने कार्टून स्टुडिओ नावाची कंपनी सुरू केली. सुरुवातीला त्यांच्या कंपनीला नुकसान झाले. त्यांची हालत इतकी खराब झाली की, त्यांना जेवणासाठीसुद्धा पैसे नव्हते. परंतु, वॉल्ट यांनी पराभव पत्करला नाही. त्यांनी स्वप्न त्यांनी पूर्ण करून दाखवलं. मे १९२८ मध्ये त्यांचे कार्टून मिकी माऊसने जगात यश प्राप्त केले. आजही लोकं मिकी माऊसचे दिवाने आहेत. यंदा ही कंपनी १०० वर्षांची झाली. जाणून घेऊया डिसने कंपनीच्या यशाचे रहस्य.
वॉल्ट डिसने जेव्हा २२ वर्षांचे होते तेव्हा त्यांना आळसी आणि बिनकामी असल्याचे सांगून काढण्यात आले होते. परंतु, वॉल्ट यांनी उत्साह कायम ठेवला. जेव्हा ते २५ वर्षांचे होते तेव्हा त्यांनी गॅरेजला स्टुडिओत रुपांतरित केले. पाच वर्षांनंतर त्यांनी एलिस कार्टूनलँड आणि ओसवर्लड दी रेबीट या अॅनिमेशनमध्ये यश मिळवले. त्यानंतर वॉल्ट यांनी मागे वळून पाहिले नाही. यशाची सिडी चढत राहिले.
वॉल्ट कान्सस स्टुडिओत बसले होते. तेव्हा त्यांच्या टेबलवर उंदीर चढला. ते बघून त्यांना कल्पना सुचली. त्यानंतर त्यांनी मिकी माऊस कार्टून बनवला. सध्या डिसने कंपनीचा थीम पार्क आणि मर्चंडाईसचा व्यवसाय आहे. डिसने कंपनीच्या उत्पन्नाबाबत सांगायचे झाल्यास २०१९ ला ही कंपनी ९१ हजार कोटी रुपयांची होती. कंपनीचा महसूल ५ लाख कोटी रुपये होता.
२०१५ ला हॉट स्टार सुरू झाले. दोन वर्षांनंतर २०१७ ला डिसने कंपनीने खरेदी केले. आता डिसने प्लस हॉट स्टार भारतातील सर्वात मोठा ओटीटी प्लॅटफार्म झाला आहे. डिसने कंपनी आता मीडिया नेटवर्क, पार्क एक्सपेरिएन्स अँड प्रोडक्ट, स्टुडिओ इंटरटेनमेंट डायरेक्ट टू कंझुमर अँड इंटरनॅशनल या क्षेत्रात काम करते. थीम पार्कला २०१८ पर्यंत १५ कोटी ७३ लाख लोकं पाहून आलेत.