संपूर्ण जगाला पेट्रोल पुरवणाऱ्या सौदीतील पाणी 11 वर्षात संपणार!
रियाध : आपल्याकडे सौदी अरेबिया म्हटलं की तिथल्या तेलाची चर्चा जास्त होते. पण सध्या पाण्याची चर्चा सौदीसाठी जास्त महत्वाची ठरत आहे. कारण, तेल उत्पादनात गर्भश्रीमंत असलेल्या सौदीत पुढील 11 वर्षांनंतर पाण्याचा थेंबही शिल्लक राहणार नाही असं म्हंटलं जातंय. त्यामुळेच सौदीत आता पाण्यावर पाण्यासारखा खर्च केला जातोय. जगभराला पेट्रोल आणि डिझेल पुरवणाऱ्या सौदीला पाणी कोण पुरवणार, […]
रियाध : आपल्याकडे सौदी अरेबिया म्हटलं की तिथल्या तेलाची चर्चा जास्त होते. पण सध्या पाण्याची चर्चा सौदीसाठी जास्त महत्वाची ठरत आहे. कारण, तेल उत्पादनात गर्भश्रीमंत असलेल्या सौदीत पुढील 11 वर्षांनंतर पाण्याचा थेंबही शिल्लक राहणार नाही असं म्हंटलं जातंय. त्यामुळेच सौदीत आता पाण्यावर पाण्यासारखा खर्च केला जातोय. जगभराला पेट्रोल आणि डिझेल पुरवणाऱ्या सौदीला पाणी कोण पुरवणार, असा प्रश्न उपस्थित होतोय.
तेल उत्पादनात गर्भश्रीमंत असलेलं सौदी…इथं ना नदी आहे, ना तलाव. इथे विहिरी आहेत, पण त्या केवळ तेलाच्या. इथल्या पाण्याच्या विहिरी कधीच्याच कोरड्या पडल्या. परिणामी इथलं पाण्याचं दुर्भिक्ष वाढलंय. सौदी तेल विकून प्रचंड पैसा कमावतो. पण यातला बराचसा हिस्सा समुद्राचं पाणी पिण्यालायक करण्यासाठी खर्च होतो. त्यासाठी सौदी अरेबिया वॉटर कन्वर्जन कॉर्पोरेशन अर्थात एसडब्लूसीसी त्यावर काम करते.
सौदीत पाण्यावर पाण्यासारखा खर्च
सौदीमध्ये इंधनाचा सुकाळ पण पाण्याचा दुष्काळ अशी परिस्थिती आहे. देशात ना नदी, ना तलाव केवळ तेलाच्या विहिरी आहेत. दिवसाला 30.36 लाख क्यु.मी. समुद्रजल पेयजल बनवलं जातं. पेयजलासाठी दिवसाचा खर्च 80.6 लाख रियाल (सौदीचं चलन) एवढा आहे. पाण्यापासून 1 क्यु.मी. मीठ वेगळं करण्याचा खर्च 2.57 रियाल एवढा आहे.
सौदीचं अरबी वृत्तपत्र अल वतनच्या रिपोर्टनुसार खाडीच्या देशांमध्ये प्रति व्यक्ती पाण्याचा वापर जगभरात सर्वाधिक आहे. सौदीत प्रतिव्यक्ती 265 लीटर पाण्याचा वापर होतो, जो की युरोपिय युनियनच्या देशांपेक्षा दुप्पट आहे. इथल्या पाणी वापरावर तोडगा कढण्यासाठी अनेक उपाय योजले गेले. त्यासाठी सौदीने 2015 मध्येच पाण्याच्या व्यावसायिक वापरावरील कर वाढवला होता. वाचा – पेट्रोल दरवाढीमागचा सर्वात मोठा व्हिलन ‘ओपेक’ कोण?
सौदीत दरवर्षी डिसेंबर-जानेवारीत वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडतो. पण फक्त एखाद-दुसरा दिवस. म्हणजे वर्षात एखादा-दुसरा दिवस पाऊस पडतो. अर्थात हे सगळं विंटर स्टॉर्मच्या रुपात घडतं आणि त्याने ग्राऊंड वॉटरवर काहीच फरक पडत नाही. केवळ सौदीतच नव्हे तर अख्ख्या मध्य पूर्वेत पाण्याची टंचाई आहे. पाण्याच्या कमतरतेमुळेच सौदीला गव्हाचं उत्पादन घेणं बंद करावं लागलं.
पाण्याच्या निर्मितीसाठी जगभर डिसॅलिनेशनचा उपाय प्रसिद्ध आहे. वर्ल्ड बँकेनुसार, मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेतील देशांमध्ये डिसॅलिनेशनची प्रक्रिया इतर जगाच्या तुलनेत निम्मी आहे. जगातल्या 150 देशांमध्ये समुद्रातील पाण्यातून मीठ वेगळं करुन त्याचा वापर केला जातो. आता सौदीतील जनतेसाठी समुद्रातील पाण्यापासून मीठ वेगळं करणं हा एकमेव उपाय शिल्लक आहे आणि तोच त्यांचा तारणहार ठरू शकतो.