इस्रायलला नष्ट करणारा अणू बॉम्ब आम्ही सहा महिन्यात बनवू, इराणने दिली इस्रायलला धमकी
इस्रायलने इराणच्या आण्विक तळांवर हल्ला करण्याची योजना आखली आहे. याच दरम्यान आता इराण देखील आमच्या हल्ला केला तर याचे गंभीर परिणाम इस्रायलला भोगावे लागतील अशी धमकी दिली आहे.
इराणने 1 ऑक्टोबर रोजी इस्रायल मिसाईल हल्ला करुन सापाच्या शेपटावर पाय दिल्याचे म्हटले जात आहे. या हल्ल्यानंतर इस्रायलने इराणवर मोठा हल्ला करण्याच्या बेतात आहे. इराणच्या आण्विक तळांवर हल्ला करण्याची इस्रायलची योजना असल्याचे म्हटले जात आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इराणवर होणाऱ्या संभाव्य हल्ल्याचे लक्ष्य देखील निश्चित केले असून कोणत्याही क्षणी इस्रायलची एअरफोर्स इराणच्या आण्विक स्थळांवर हल्ला करण्याच्या बेतात असल्याचे म्हटले जात आहे. दुसरीकडे इराणचे सुप्रीम लीडर आयतुल्लाह खामनेई यांनी इस्रायल धमकी देत जर इराणवर हल्ला झाला तर याचे गंभीर परिणाम इस्रायलला भोगावे लागू शकतात.
इराणच्या अणू बॉम्ब तयार करण्याच्या क्षमतेबाबत नेहमीच चर्चा सुरु असते. इराण अणूबॉम्ब बनविण्याच्या अगदी जवळ पोहचल्याचा अमेरिकेला दाट संशय आहे. इराणचे खासदार मोहम्मद मनन रइसी यांनी इराण सहा महिन्यात अणू बॉम्ब तयार करु शकतो असा दावा केला आहे.सुप्रीम लीडरच्या सल्लागाराने देखील इस्रायलला धमकावत जर इस्रायलने आण्विक केंद्रांना लक्ष्य करण्याचे धाडस दाखवले तर त्यांना याचे मोठे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात असे म्हटले आहे.
39 खासदारांची विनंती
याच दरम्यान. इस्रायली अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नेतान्याहू यांच्यावर इराणच्या अणू भट्ट्यांवर हल्ला करण्यासाठी दबाव वाढविला आहे. इराणच्या 39 खासदारांनी सुप्रीम सिक्युरिटी काऊन्सिलच्या सुरक्षा सिद्धांतात बदल करण्याची मागणी केली आहे. इराणच्या इस्रायलशी वाढणाऱ्या तणावामुळे लवकराच लवकर बॉम्ब बनविण्यासाठी इराणच्या सुप्रीम सिक्युरिटी काऊन्सिलला विनंती केलेली आहे. इस्रायलवर हमासने गेल्यावर्षी 7 ऑक्टोबर रोजी मोठा हल्ला केल्यानंतर इस्रायलने गाझापट्टीत सैन्य घुसविले होते. या युद्धाला एक वर्षे झाले तरी या युद्धाची व्याप्ती वाढत चालली आहे. आता आता या युद्धात इस्रायल पुढचे पाऊल काय उचलते यावर मध्य पूर्वेतील हे युद्ध आणखी भडकते की शांत होते हे ठरणार आहे.