युक्रेनमध्ये 13000 हून अधिक महिलांनी हाती घेतले शस्त्र, रशियन सैनिकांविरोधात महिला युद्धमैदानात
युक्रेन देशाच्या लष्करामध्ये महिलांचा याआधीच मोठा सहभाग राहिला आहे. 20 ते 60 या वयोगटातील गृहिणी आणि नोकरदार महिलांचा आता सैन्यातील सहभाग वाढू लागला आहे. 30 हजारांहून अधिक महिला लष्करात दाखल होत असल्याचे युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
मुंबईः रशियाकडून धोकादायक हल्ल्याची भीती असल्याने युक्रेनचे लष्करही आता युद्धासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की (Vladimir Zhelensky) यांनीही आपल्या भाषणात आमचे सैन्य आता पूर्वीपेक्षा वेगळे असल्याचे सांगितले आहे. युक्रेनची (Ukraine) ‘नवी सेना’ आता मोठ्या प्रमाणात महिलांची भरती करत आहे. देशाच्या रक्षणासाठी महिलांनी आपले घर, कुटुंब सोडून शस्त्र हाती घेतली आहेत. आता युक्रेनचे महिलांना सैन्याचे मूलभूत लढाऊ प्रशिक्षण देऊन युद्धासाठी (War) तयार करत आहे.
युक्रेन देशाच्या लष्करामध्ये महिलांचा याआधीच मोठा सहभाग राहिला आहे. 20 ते 60 या वयोगटातील गृहिणी आणि नोकरदार महिलांचा आता सैन्यातील सहभाग वाढू लागला आहे. 30 हजारांहून अधिक महिला लष्करात दाखल होत असल्याचे युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पुरुषांपेक्षाही या महिला अधिक लढाऊ असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. 2014 मध्ये जेव्हा रशियाने क्रिमियावर कब्जा घेतला तेव्हा सैन्यातील त्यांच्या महिलांनी पराक्रम दाखवले होते. त्यावेळी झालेल्या रशियाच्या हल्ल्यात युक्रेनियनचे नागरिक आणि सैन्यही मोठ्या प्रमाणात मारले गेले होते.
युक्रेनच्या सैन्यदलात 15 टक्के महिला
युक्रेन हा देश 1993 पासून आपल्या लष्करात महिलांना स्थान देत आहे. युक्रेनच्या सैन्यदलात महिलांचा सहभाग 15 टक्के आहे. सध्या त्यांच्या सैन्यामध्ये 1100 महिला या लष्करातील महत्वाच्या पदावर आहेत, तर या युद्धाच्या पार्श्वभूमी 13000 महिला युद्धतळावर तैनात आहेत. सध्या युक्रेनियन महिला सैनिक देशाच्या अशांत असलेल्या पूर्व भागात रशियन समर्थक आणि त्या बंडखोरांबरोबर लढत आहेत. डोनबास या दोन्ही भागांना रशियाकडून वेगळा देश असल्याची मान्यता दिली आहे, आणि तिथे सैन्य तैनात करण्याचे आदेशही दिले आहेत.
ज्येष्ठ महिला घेत आहेत एके-47 चे प्रशिक्षण
आता मागील आठवड्यापासून या अशांत असणाऱ्या भागात गोळीबार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. तरुण महिलांसोबत अनेक ज्येष्ठ महिलाही आता युक्रेन देशासाठी पुढे येत आहेत. मागील काही दिवसांपासून युक्रेनच्या ज्येष्ठ महिला एके-47 बंदूक कशी चालवायची याचे प्रशिक्षण युवा महिला सैनिकांकडून घेत असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
सैनिकांसाठी खंदक खोदण्याचे काम
युक्रेन आता बलाढ्य रशियालाच जाहीर आव्हान देत आहे. युक्रेनमध्ये बाबुश्खा बटालियन नावाचे ज्येष्ठ महिलांचे एक स्वतंत्र बटालियन तिथे काम करत आहे. ही बटालियन युद्धाच्या वेळी लष्करी पुरवठा, वैद्यकीय मदत आणि गुप्त बातम्यांची देवाणघेवाण करत असते. याच ज्येष्ठ महिलांच्या बटालियनने 2014 मध्ये जेव्हा क्रिमियावर रशियाने हल्ला केला तेव्हा आपल्या सैनिकांसाठी खंदक खोदण्याचे काम केले होते. तर काही दिवसांपूर्वी याच युक्रेनच्या महिला एका वादात सापडल्या होत्या. महिला सैनिकांचे पथसंचलन सुरु असताना हिल्स घालून पथसंचलन केले होते म्हणून स्त्रीवादी संघटनांनी त्यांच्या या कृत्यावर सवाल उपस्थित केला होता.
काही दिवसांपूर्वी युक्रेनच्या महिला सैनिक वादात सापडल्या होत्या. येथील परेडमध्ये महिला हिल्स परिधान करताना दिसल्या. यानंतर महिलावाद्यांनी लष्कर आणि सरकारवर प्रश्न उपस्थित केले.
संबंधित बातम्या
रशिया युक्रेन युद्धाचा थेट परिणाम होऊ शकतो भारतावर , महागड्या होतील या काही वस्तू!