सुनीता विल्यम्स खरोखरच अंतराळात अडकलीय? स्टारलाइनर येताच सुनीता भावूक; काय म्हणाली?

अखेर बोइंग स्टारलाइनर पृथ्वीवर सुरक्षित परतलं आहे. मात्र, सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर अजूनही अंतराळात आहेत. त्यांना पुढच्या वर्षी अंतराळातून आणण्यात येणार आहे. त्याची नासाने तयारी सुरू केली आहे. मात्र बोइंग स्टारलाइनर पृथ्वीवर येताच सुनीताने एक भावूक संदेश पाठवला आहे. सुनीताने या मिशनसाठी काम करणाऱ्या टीमचं अभिनंदनही केलं आहे.

सुनीता विल्यम्स खरोखरच अंतराळात अडकलीय? स्टारलाइनर येताच सुनीता भावूक; काय म्हणाली?
Follow us
| Updated on: Sep 07, 2024 | 3:24 PM

बोइंग स्टारलाइनर सुरक्षितपणे पृथ्वीवर आलं आहे. स्टारलाइनरसोबत सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना आणणं रिस्की होतं. त्यामुळे फक्त स्टारलाइनरला पृथ्वीवर आणण्यात आलं. त्यात नासाला यश मिळालं आहे. पण सुनीता आणि विल्मोर अंतराळातच अडकले आहेत. ते कधी येणार याची काही शाश्वती नाही. स्टारलाइनर पृथ्वीवर यशस्वी आल्याची माहिती मिळाल्यानंतर सुनीता अत्यंत भावूक झाली. तिने अंतराळातून मेसेज पाठवला आहे. utch willi

आम्ही फ्लाइट कंट्रोल रोस्टर्स पाहत आहोत. तुम्ही लोक शेवटी कॅलिप्सो घरी नेत आहात, असं सुनीताने म्हटलं आहे. हे मिशन कंट्रोल करणाऱ्यांना उद्देशूनही तिने मेसेज केला आहे. आम्ही नेहमीच तुम्हाला पाठबळ दिलंय, असंही तिने म्हटलं आहे. तसेच या टीमचे तिने आभारही मानले आहेत. त्यामुळेच आता सुनीता आणि विल्मोर खरोखरच अंतराळात अडकलेत का? असा सवाल केला जात आहे. असं असेल तर मग सुनीता पृथ्वीवर कधी येणार? असा प्रश्नही केला जात आहे.

मुक्काम वाढला

सुनीता विल्यम्सचा अंतराळातील मुक्काम बराच वाढला आहे. आठ दिवसाच्या मिशनसाठी सुनीता अंतराळात गेली होती. आठ महिने झाले तरी ती परत आलेली नाहीये. त्यांना पुढच्या वर्षीच पृथ्वीवर आणलं जाणार आहे. या काळात ते आंतरराष्ट्री स्पेस स्टेशनमध्ये मेंटेनन्सचं काम करतील. तसेच स्वत:ला फिट ठेवण्यासाठी एक्सरसाईजही करणार आहेत. शिवाय अंतराळात होणाऱ्या विविध प्रयोगातही ते सामील होणार आहेत. अंतराळात इतर सात अंतराळवीर आहेत. त्यांच्यासोबत सुनीता आणि विल्मोर काम करणार आहेत. या दोघांना परत आणण्याची तारीख नक्की झाली नाहीये. पण स्पेसएक्स यान या दोघांनाही पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये पृथ्वीवर आणणार आहे.

मिशनचा हेतू काय?

आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर स्टारलाइनरचे हे पहिलेच उड्डाण होते. सुनीता आणि विल्मोर हे नासाच्या व्यावसायिक क्रू कार्यक्रमाचा भाग आहेत. या मिशनमध्ये या दोघांना सामील करून घेण्यात आलं होतं. अमेरिकेच्या खासगी उद्योगासोबतच्या भागीदारीत अमेरिकेतून आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनपर्यंत सुरक्षितपणे, विश्वासाने आणि कमी खर्चात मानव मिशन पाठवावं हा हेतू होता. त्यामुळेच सुनीता आणि विल्मोर यांना अंतराळात पाठवण्यात आलं होतं.

'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.
पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत जागावाटपावर शिंदेंचं मोठं वक्तव्य
पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत जागावाटपावर शिंदेंचं मोठं वक्तव्य.
जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेत फरक आहे तरी काय? तुम्हाला माहितीये?
जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेत फरक आहे तरी काय? तुम्हाला माहितीये?.
गडकरींचा गौप्यस्फोट, कोणाकडून PM पदाची ऑफर? प्रस्तावावर काय म्हणाले?
गडकरींचा गौप्यस्फोट, कोणाकडून PM पदाची ऑफर? प्रस्तावावर काय म्हणाले?.
लाडकी बहीणच्या श्रेयवादावरुन ठाकरे-पवारांनी घेरलं, ‘1500 नको, आधी...’
लाडकी बहीणच्या श्रेयवादावरुन ठाकरे-पवारांनी घेरलं, ‘1500 नको, आधी...’.
पोलिसांकडून बाप्पालाच अटक? कर्नाटकात काय घडलं? वादाचं कारण तरी काय?
पोलिसांकडून बाप्पालाच अटक? कर्नाटकात काय घडलं? वादाचं कारण तरी काय?.
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान.