मक्केत नेमके कशामुळे मृत्यूपावले 550 हून अधिक हजयात्री, उष्माघात की अन्य कारण
मोठ्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि आरोग्य बिघडू नये म्हणून हजसाठी आरोग्य शिबिरे सुरू करण्यात आली असल्याचे सौदीचे आरोग्य मंत्री फहद बिन अब्दुल रहमान यांनी मंगळवारी सांगितले.
जगभरातील मुस्लीम धर्मियांची सर्वात मोठी मानली जाणारी सौदी अरेबियाती हजयात्रे उष्णतेचा अगदी कहर झाल्याने मृत्यूचे अगदी तांडवच झाले. मक्केत तापमानाचा पारा 52 डिग्रीपर्यंत पोहचल्याने प्रचंड तापमानाने 550 हून अधिक हजयात्रेकरुंचा मृत्यू पावल्याची धक्कादायक मृत्यूने जग सुन्न झाले आहे. हा आकडा प्रचंड धक्कादायक आहे. त्यामुळे सौदी अरबाच्या एकूण तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विविध देशाच्या नागरिकांच्या मृत्यूमुळे सौदी अरबच्या आरोग्य मंत्रालयाने उष्णतेच्या लाटेने 2700 हून अधिक श्रद्धाळु आजारी पडल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हजयात्रेतील मृत्यूचा हा मोठा आकडा पाहून यास केवळ प्रचंड तापमान जबाबदार आहे की आणखी काही कारणे यामागे आहेत.
मक्का हज यात्रेत इतके मृत्यू नेमके कशामुळे झाले यावर आता जगभरात सवाल केले जात आहेत. मंगळवारी अरब अमिरातीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की मरणाऱ्यांमध्ये एकट्या इजिप्तचे नागरिक होते. त्यांचा मृत्यू उष्णतेच्या लाटेने झाला असल्याचे म्हटले जात आहे. इजिप्तमधून आलेल्या बहुतेक यात्रेकरूचा मृत्यू उष्णतेने झाला आहे. केवळ एकाचा मृत्यू गर्दीत टक्कर झाल्याने झाला आहे. एएफपीच्या बातमीनूसार मरणाऱ्या विविध देशांच्या नागरिकांची एकूण संख्या 577 इतकी झाली आहे.
मक्केत का झाला 550 हाजींचा मृत्यू
पहिले कारण :
मक्केतील मृत्यूला सर्वात मोठा कारण वाढते तापमान मानले जात आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे बदललेल्या हवामानाचा फटका हज यात्रेला बसला आहे. सौदी अरबमध्ये केलेल्या एका अभ्यासात धार्मिक स्थळाच्या तापमानात दर दशकात 0.4 डिग्री सेल्सियस वाढत आहे. सौदी अरब अमिरातीच्या राष्ट्रीय हवामान विभागाच्या मते सोमवारी मक्केतील ग्रॅंज मस्जिदचे तापमान 51.8 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहचले होते. गेल्यावर्षी हजयात्रेत 240 तिर्थकरुंचा मृत्यू झाला होता. यात सर्वाधिक इंडोनेशियातील नागरिक होते. यावर्षी सौदी अरेबियातील अधिकाऱ्यांनी छत्र्यांचा वापर करण्याचा, हायड्रेटेड राहाण्याचा आणि तीव्र ऊन्हापासून स्वत:चा बचाव करण्याचा आग्रह केला होता. यावर्षी हजयात्रेत सुमारे 18 लाख हजयात्रेकरूंनी सहभाग घेतला होता ज्यातील 16 लाख परदेशातून आले होते.
दुसरे कारण :
मृत्यूंचा धोका वाढण्यामागे आणखी एक कारण होते. ते म्हणजे येथील नोंदणीकृत नसलेल्या हजयात्रेकरूंची संख्या मानले जात आहे. अधिक महागडी हाज व्हीसा प्रक्रिया परडवत नसल्याने काहीजण गैरमार्गाने प्रवेश करीत असतात. त्यांना एअरकंडीशन्डच्या सुविधेचा फायदा घेता आला नाही. त्यामुळे उष्णेचा झळ सहन करावी लागली. नोंदणी नसलेल्या हाजींच्या वाढत्या संख्येमुळे मृत्यूची संख्या वाढल्याचे इजिप्तच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
हजच्या अगोदर लाखो नोंदणीकृत नसलेल्या हजयात्रेकरूंना मक्का येथून बाहेर काढण्यात आल्याचे सौदी अधिकाऱ्यांनी सांगितले. इंडोनेशिया आणि इराणसह इतर देशांतील नागरिकांचे देखील मृत्यू झाले असले तरी ते मृत्यू नेमके उष्माघाताशी संबंधित आहेत की नाही याची माहीती या देशांनी दिली नसल्याचे म्हटले जात आहे.
तिसरे कारण :
नोंदणी नसलेल्या यात्रेकरूंमुळे छावणीतील परिस्थिती बिघडली. त्यामुळे अनेक सेवेवर ताण येऊन त्या ठप्प झाल्या आहेत. बरेच लोक अन्न, पाणी किंवा एअरकडीशंड सेवेपासून दूर राहीले आणि त्यांचा उष्णतेमुळे मृत्यू झाला असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.