World Elephant Day : हत्ती दिनाचे महत्व अन् काय आहे इतिहास..? जाणून घ्या सर्वकाही
हत्ती दिन साजरा करण्याची मूळ कल्पना ही चित्रपट निर्माते सुश्री पॅट्रिशिया सिम्स आणि कॅनाझवेस्ट पिक्चर्स मिशेल क्लार्क आणि थायलंडचे शिवपॉर्न दरदारानंद यांनी केली होती. ही केवळ कल्पना होतीच पण खऱी सुरवात केली ती सुश्री पॅट्रिशिया यांनी. त्यांनी हत्तीवरील हल्ले रोखण्यासाठी तसेच त्यांच्या संरक्षणासाठी एलिफंट रीइंट्रोक्शन फाउंडेशनची स्थापना केली.
मुंबई : कोणताही दिवस साजरा करण्यापूर्वी त्याला असलेला इतिहास महत्वाचा आहे. (World Elephant Day) जागतिक हत्ती दिवस देखील 2011 सालापासून साजरा केला जात आहे. (Protection of elephants) हत्तींच्या संरक्षणासाठी सुश्री सिम्स यांनी एका फाउंडेशनची स्थापना केली होती. 12 ऑगस्ट रोजी याला सुरवात झाली होती. तेव्हापासून हा जागतिक हत्ती दिन साजरा केला जात आहे. हत्तीचे संवर्धन करण्याबाबत (Awareness) जनजागृती व्हावी आणि त्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनेची देवाण-घेवाण व्हावी यासाठी हा दिवस जागतिक हत्ती दिन म्हणून पाळला जातो. प्राणी मित्र हे जागोजागी हत्तीच्या संरक्षणाबद्दल धडे देतात. तर प्राण्यांबद्दल सर्वसामान्यांमध्ये कशी आत्मियता वाढेल यासंदर्भात प्रयत्न केले जातात. एवढेच नाहीतर हिंदू सणामध्ये आणि संस्कृतीमध्ये हत्तीला वेगळे असे महत्व आहे. पूर्वजांनी तर रानटी हत्तीवर पाळीव प्राण्यांचे संस्कार करुन लढाईमध्ये या हत्तींना वापरले होते.
हत्तीला अफ्रिकेचा मोठा इतिहास
भौगोलिक स्थितीनुसार हत्तींच्या संख्येमध्ये कमी-अधिक प्रमाण समोर येते. सर्वाधिक हत्तींची संख्या ही अफ्रिकेत असून 100 वर्षापूर्वी त्यांची संख्याही 30 लाखाहून अधिकची होती. काळाच्या ओघात पुन्हा हत्तीचा उपयोग माणूसही आपल्या इतर कामासाठी करु लागला होता. जगात आता आफ्रिकन अन् आशियाई हे हत्तींचे दोन प्रमुख प्रकार पाहवयास मिळत आहेत. हत्तीसारख्या अवाढव्य प्राण्याचा उपयोग अवजड वजने उचलणे, वाहून नेणे, शोभायात्रा, वाहन म्हणून केला जात आहे. मिथ्यक, जातककथा, पंचतंत्रादी माध्यमांतून हत्ती हा पुरातन काळापासून नागरजीवनाचा अविभाज्य हिस्सा असल्याचे लक्षात येते.
काय आहे हत्ती दिनाचा इतिहास?
हत्ती दिन साजरा करण्याची मूळ कल्पना ही चित्रपट निर्माते सुश्री पॅट्रिशिया सिम्स आणि कॅनाझवेस्ट पिक्चर्स मिशेल क्लार्क आणि थायलंडचे शिवपॉर्न दरदारानंद यांनी केली होती. ही केवळ कल्पना होतीच पण खऱी सुरवात केली ती सुश्री पॅट्रिशिया यांनी. त्यांनी हत्तीवरील हल्ले रोखण्यासाठी तसेच त्यांच्या संरक्षणासाठी एलिफंट रीइंट्रोक्शन फाउंडेशनची स्थापना केली. तो दिवस होता 12 ऑगस्ट 2012 आणि तेव्हापासून हा दिवस जागितक हत्ती दिन साजरा केला जात आहे. याला आता 10 वर्ष पूर्ण झाली असून हत्ती दिनाचे नेतृत्व आणि मार्गदर्शन केल्याने तब्बल ६५ वन्यजीव संघटना आणि जगभरातील अनेक लोकांनी त्यांना पाठिंबा देत आहेत.
नेमका उद्देश काय?
जागतिक दिनाचे औचित्य साधून त्या गोष्टीचे किंवा वन्यजीवाचे महत्व अधिरोखित होऊन त्याचे संवर्धन व्हावे हा त्यामागचा हेतू असतो. त्याचअनुशंगाने हत्ती दतांची शिकार होऊ नये, व्यापार रोखला जावा तसेच धोरणांमध्ये सुधारणा करुन हत्तींचे सवर्धन कसे करता येईल यावर लक्ष केंद्रीत करणे. तर काही बंदीत असलेल्या हत्तींना पुन्हा अभयराण्यात आणणे हा त्या मागचा हेतू आहे. इतर सर्व गोष्टींना आळा बसून हत्तीचे संवर्धन कसे होईल यावर लक्ष केंद्रीत करणे हा त्यामागचा सर्वात महत्वाचा उद्देश आहे.
भारतामध्ये हत्तींची संख्या टिकून
अशिया खंडातील अनेक देशामध्ये हत्तींची संख्या लक्षणीय घटत आहे. याला केवळ भारत अपवाद आहे. जगात हत्तींची संख्या ही 50 ते 60 हजार एवढी असून त्यापैकी 60 टक्के हत्ती हे एकट्या भारतामध्ये आहेत. हे केवळ हत्ती संवर्धन जनजागृतीमुळे शक्य झाले आहे. त्यामुळे गेल्या 10 वर्षात जी जनजागृतीची चळवळ उभी राहिली आहे ती अखंडपणे सुरु राहणे गरजेचे आहे.