Sunita Williams : अंतराळातून आल्यावर सुनीता विल्यम्स कशा दिसणार? डोळे आणि हाडं कमजोर होतील…कॅन्सरचा धोका
अलिकडेच अंतराळवीर सुनीता आणि बुच विल्मोर यांना 2 स्पेसक्राफ्टमार्फत 8200 पाऊंड जेवण, फ्यूएल आणि दूसरी गरजेच्या वस्तू आणि त्याशिवाय 3 टन का कार्गो ISS ला पाठविण्यात आला आहे.
गेल्या 85 दिवसांपासून सुनीता विल्यम्स अंतराळात अडकली आहे. भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आता थेट पुढच्या वर्षीच अंतराळातून पृथ्वीवर अवतरणार आहेत. बोईंगच्या नवीन स्टारलायनर कॅप्सुलमधून अंतराळवीरांना यानातून पृथ्वीवर आणणे धोकादायक असल्याचे नासाने अखेर मान्य केले आहे. दोन्ही अंतराळवीर 5 जून रोजी ISS ( International space station ) वर अंतराळात गेले होते. आता ते सुमारे 250 दिवस अंतराळात राहणार आहेत. केवळ आठवडाभरासाठी गेलेल्या सुनीता विल्यम्स यांना आठ महिन्यांचा काळ अंतराळात व्यतित करावा लागणार आहे. याचा त्यांच्या शरीरावर मोठा विपरीत परिणाम तर होणार आहेच शिवाय स्टारलायनर यान अंतराळवीरांशिवाय उद्या पृथ्वीवर परतणार आहे.
भारतीय वंशाची अंतराळ वीर सुनीता विल्यम्स यांना अंतराळात दोन महिन्यांहून अधिक वेळ झाला आहे. 58 वर्षीय सुनीता विल्यम्स अमेरिकन नौदलच्या पायलट असून सोसायटी ऑफ एक्सपेरिमेंटल टेस्ट पायलटची सदस्य आहेत. त्यांचा विवाह ओरेगॉनमधील फेडरल पोलिस अधिकारी मायकेल जे. विल्यम्स यांच्याशी केला होता. त्यांची आई आणि मुलगी यांनी प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. सुनीता विल्यम्स यांची ही चौथा अंतराळ प्रवास आहे. त्यांच्या अंतराळ प्रवासावर त्यांची आई पांड्या यांनी साल 2022 मध्ये ‘लिटिल टेल, बिग टेल्स’ नावाचे पुस्तक देखील लिहीले होते.
शरीरात अनेक बदल होणार
सुनीता यांना आणखी अडीचशे दिवस मुक्काम करावा लागणार आहे. यापूर्वी झालेल्या अभ्यासात जास्त दिवस जर अंतराळात घालविले तर अंतराळवीरांच्या शरीरात अनेक बदल होतात. शरीर, डोळे आणि डीएनएमध्ये देखील अनेक आश्चर्यकारक बदल होतात. त्यांना आता साल 2025 मध्ये पृथ्वीवर येण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे आठवडा भराच्या तयारीने गेलेल्या सुनीता आणि बुच विल्मोर यांना आता विविध समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अंतराळातून परत आल्यावर अंतराळवीरांच्या शरीरात कोणते धोकादायक बदल होतात ते पाहूयात…
मासंपेशीमध्ये बदल?
अंतराळातील गुरुत्वाकर्षाणाच्या कमतरेचा सुनीता यांच्या मांसपेशी कमजोर होऊ शकतील. जास्त वेळ या स्थितीत अंतराळात राहील्याने त्यांची हाडे देखील कमजोर होतील. त्याच्या हाडाची झीज दर महिन्याला एक टक्क्याने होण्याचा धोका आहे.
नजर कमजोर होणार
बऱ्याच काळ अंतराळात घालविल्यानंतर सुनीता यांना स्पेसफ्लाइट एसोसिएटेड न्यूरो ऑक्यूलर सिंड्रोमचा या आजाराचा सामना करावा लागू शकतो. यात डोळ्यांचा नसांवर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि नजर कमजोर होऊ शकते.
रेडिएशनचा धोका
अंतराळात गुरुत्वाकर्षण नसल्यासारखेच आहे.त्यात सुनीता यांना अंतराळात वातावरणच नसल्याने सुर्यापासून येणाऱ्या अति नील किरणांचा सामना करावा लागू शकतो. जास्त काळ रेडीएशनचा सामना करावा लागल्याने भविष्यात त्यांना कॅन्सर होण्याचा देखील धोका आहे.तसेच अन्य आरोग्यकारक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. शरीरातील पेशी, डीएनएमध्ये देखील परिवर्तन होऊ शकते.
फ्रॅंक याच्या नावावर रेकॉर्ड
सुनीता यांच्या आधी अंतराळात अनेक अंतराळवीर अंतराळात अनेक दिवस मुक्काम ठोकून आले आहेत. अंतराळात सर्वाधिक काळ ( 437 दिवस ) अंतराळात रहाण्याचा रेकॉर्ड रशियाच्या वालेरी यांच्या नावावर आहे. त्यानंतर अंतराळात सर्वाधिक 371 दिवस मुक्कामी राहण्याचा रेकॉर्ड अमेरिकेचे अंतराळवीर फ्रॅंक यांच्या नावावर आहे. फ्रॅंक यांच्या शरीरातील बदल तपासण्यात तेव्हा त्यांची नजर कमजोर झाली होती. डीएनएत बदल झाले होते. वजन कमी झाले होते आणि इम्युन सिस्टीममध्ये परिवर्तन झाल्याचे उघडकीस आले आहे.
सुनीताची आई आणि मुलीला काय वाटते
सुनीता यांची आई बोनी पांड्या म्हणाल्या की माझी मुलगी एक अनुभवी अंतराळवीर आहे. त्यामुळे आम्हाला तिची काही काळजी वाटत नाही. मी तिला काय सल्ला देणार ? तिला सर्व माहिती आहे काय करायचं आहे. ती चारशे दिवस याआधी अंतराळात राहिलेली आहे. सुनीता आणि बुच विल्मोर हे अंतराळवीर अंतराळात आहेत आणि त्यांच्याकडे संशोधनाचे भरपूर काम आहे.नासाची टीम तिला कधी परत आणायचे यासाठी योग्य योजना नक्की करेल. सुनीताची पृथ्वी वापसी योग्य प्रकारे करण्यासाठी थोडा वेळ लागत आहे. दोनच दिवसांपूर्वी तिने आमच्याशी गप्पा मारल्या. चिंतेची काही गरज नाही सर्वकाही सुरळीत सुरु आहे.