इराण केव्हा करणार इस्रायलवर पलटवार? महत्वाची माहिती आली पुढे

अमेरिकेने इराणला इस्रायलवर पुन्हा हल्ला न करण्याची विनंती केलेली आहे. व्हाईट हाऊस प्रवक्ता कॅरीन जीन-पियरे यांनी बुधवारी मिडीयाशी बोलताना सांगितले की इराणने इस्रायलच्या हल्ल्याला उत्तर देऊ नये. त्यांनी असे करु नये. जर त्यांनी असे केले तर आम्ही इस्रायलला स्वसंरक्षण करण्यास मदत करु असे असेही या प्रवक्त्याने म्हटले आहे.

इराण केव्हा करणार इस्रायलवर पलटवार? महत्वाची माहिती आली पुढे
Israel - iran war
Follow us
| Updated on: Oct 31, 2024 | 3:49 PM

इराण आणि इस्रायल यांच्या दरम्यान तणाव वाढला आहे. अनेक दशकांचे हे एकमेकांचे दुश्मन आता एकमेकांविरोधात थेट युद्ध करण्याच्या उंबरठ्यावर आहेत. मिडिया रिपोर्टनुसार इराण इस्रायलवर मोठ्या हल्ल्याची तयारी करीत आहेत आणि हा हल्ला अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीच्या आधी म्हणजे 5 नोव्हेंबर रोजी होऊ शकतो. तेहराणने या मिशनला ‘ऑपेरशन टु प्रॉमिस 3’ असे नाव दिले आहे. हा हल्ला इराणच्या लष्करी तळांवर झालेल्या हल्ल्याचे उत्तर असणार आहे. इराणमधील सूत्रांच्या आधारे सीएनएन या वृतसंस्थेने म्हटलेय की इराण इस्रायलच्या हवाई हल्ल्याला ‘निर्णायक आणि घातक’ उत्तर देणार आहे.

याआधी एक ऑक्टोबर रोजी इराणने ‘ऑपरेशन टु प्रॉमिस 2’ अंतर्गत इस्रायलवर 180 बॅलेस्टीक क्षेपणास्रं डागली होती. इराणने याला हमासचा प्रमुख हानिया, हेजबोला प्रमुख हसन नसरल्लाह आणि IRGC कमांडर निलफोरुशन यांच्या मृत्यूचा बदला असे म्हटले होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने 26 ऑक्टोबर रोजी इराणच्या अनेक लष्करी तळांना टार्गेट केले होते. त्यामुळे या दोन देशातील तणावात वाढ झाली आहे.

जगाची दोन गटात विभागणी होणार ?

अमेरिकेसह जगभरातील देश दोन देशांच्या तणावावर लक्ष ठेवून आहेत. कारण जर संघर्ष वाढला तर मध्य-पूर्वेचा राजकीय नकाशा बदलू शकतो.इराण आणि इस्रायल यांच्या थेट युद्ध म्हणजे जगातील बहुतांश देशांची दोन गटात विभागणी होईल. इस्रायलच्या साथीला अमेरिका, जर्मनी, इटली आणि ब्रिटन सारखे देश असतील इराणच्या बाजूने रशिया, चीन आणि नॉर्थ कोरिया सारखे देश असतील.

एक हजार मिसाईल डाग

इराणच्या संभावित हल्ल्याची वेळ एकदम महत्वाची आहे. याचा आंतरराष्ट्रीय संबंध आणि अमेरिकेच्या आगामी निवडणूकांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय समदाय दोन्ही देशांना संघर्ष मिठवायला सांगत आहे. तर इजिप्त आणि कतार गाझातील युद्ध संपावे अशा प्रयत्नात आहेत. गाझात युद्धविराम झाला आणि पॅलेस्टाईनवरील हल्ले रोखले गेले तर इराण शांत होऊ शकतो. जर इस्रायलच्या हल्ल्यात इराणी नागरिक मारले गेले किंवा इराण ऊर्जा केंद्रांना जादा नुकसान झाले तर तेहराण इस्रायलवर एक हजार बॅलिस्टीक मिसाईल डागू शकतो. तसेच इराण गल्फ शिपिंगला देखील नुकसान पोहचवू शकतो असे म्हटले जात आहे.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.