कोण आहेत त्या चार तरुणी? ज्यांना अख्ख पाकिस्तान सर्च करतय; गुगलवर सर्वाधिक शोध, भारतासोबत कनेक्शन
2024 वर्षाचा हा शेवटचा महिना सुरू आहे, लवकरच आपण नव्या वर्षात पदार्पण करणार आहोत. चालू वर्षी चार तरुणी अशा आहेत, ज्यांना पाकिस्तानमध्ये सर्वाधिक सर्च करण्यात आलं. त्यातील दोन तरुणींचं भारतासोबत कनेक्शन आहे.
आपण लवकरच आता नव्या वर्षात पदार्पण करणार आहोत. नवं वर्ष सुरू होण्यासाठी आता अवघे 18 दिवस उरले आहेत. चालू वर्षी अशा अनेक घटना घडल्या ज्या आपल्या कायम लक्षात राहातील. तसेच काही विक्रम देखील मोडीत निघाले, त्याच्या जागी नवे विक्रम स्थापीत झाले. यावर्षी भारताचा शेजारी असलेला पाकिस्तान देश याना त्या कारणामुळे कायम चर्चेत राहिला. आता पुन्हा एकदा पाकिस्तान चर्चेमध्ये आला आहे.
त्याच कारण म्हणजे अशा चार तरुणी ज्यांना पाकिस्तानी नागरिकांनी सर्वाधिक सर्च केलं आहे. पाकिस्तानी नागरिकांनी गुगलवर ज्या दहा लोकांना सर्वाधिक सर्च केलं त्या लोकांमध्ये या तरुणींचा समावेश होतो. विशेष म्हणजे यातील दोन तरुणींचं प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या भारतासोबत देखील कनेक्शन आहेत. पाहूयात त्या चार तरुणी नेमक्या कोण आहेत?
कोण आहेत त्या चार तरुणी?
गुगल सर्च रिपोर्टनुसार पाकिस्तानी नागरिकांनी ज्या चार तरुणींना सर्वाधिक सर्च केलं त्यांचं नाव आहे. सना जावेद, हरीम शाह, जोया नासीर आणि मिनाहील मलिक या चार तरुणींना पाकिस्तानमध्ये सर्वाधिक सर्च करण्यात आलं. पाकिस्तानी नागरिकांनी ज्या दहा लोकांना सर्वाधिक सर्च केलं त्या दहा लोकांमध्ये या चार तरुणींचा नंबर लागतो.
सना जावेद – जीचं नाव आता सना शोएब मलिक असं झालं आहे. सना जावेदला या वर्षी पाकिस्तानी नागरिकांनी गुगलवर मोठ्या प्रमाणात सर्च केलं. सना जावेद ही एक पाकिस्तानी अभिनेत्री आहे, तीने सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या घटस्फोटानंतर शोएब मलिक याच्यासोबत लग्न केलं.
हरीम शाह – पाकिस्तानी नागरिकांनी चालू वर्षात गुगलवर ज्या लोकांना सर्वाधिक सर्च केलं त्यामध्ये हरीम शाहचा देखील समावेश होतो ती एक रिल स्टार आणि युट्यूबर आहे.
जोया नासीर – भारताच्या चांद्रयान मोहिमेबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानं जोया नासीर पहिल्यांदा जगासमोर आली. तिला पाकिस्तानमध्ये सर्वाधिक सर्च करण्यात आलं. वादग्रस्त व्यक्तिमत्त्व अशी तिची पाकिस्तानमध्ये ओळख आहे.
मिनाहील मलिक – मिनाहील मलिक ही देखील एक रिल स्टार आहे. इन्स्टाग्रामवर तिचा मोठा फॅन ऑलवर आहे. तिला देखील पाकिस्तामध्ये सर्वाधिक सर्च करण्यात आलं.